वाढता उष्मा आणि चार्याच्या अभावामुळे गुरांची फरफ ट होत आहीे. सध्या उन्हाचा तडाखा सर्वत्र वाढला आहे. मानवाबरोबरच प्राण्यांनाही उष्माचा त्रास मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. अशातच जनावरांसाठी हिरव्या व सुक्या चार्यांचा देखील अभाव निर्माण झाला आहे. त्यामुळे मोकाट जनावरांना खाण्यासाठी अन्न पाण्याची कमतरता भासू लागली आहे. ही मोकाट गुरे सध्या …
Read More »महाड तालुक्यात बेकायदेशीर रेती उत्खनन
महाड : प्रतिनिधी महाड आणि परिसरात गेली कांही महिन्यापासून बेकायदेशीर वाळू उत्खनन सुरूच असून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत वाळू चोरी केली जात आहे. विशेष म्हणजे वाळू उत्खनन महाड शहराच्या लगतच होत असल्याने प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष यामुळे उघड होत आहे. यातून शासनाचा महसूल नक्की कोण बुडवतोय असा प्रश्न निर्माण होत आहे. …
Read More »पाली-खोपोली राज्यमहामार्ग वाहतूक कोंडीच्या कचाट्यात
सलग सुट्ट्यांमुळे लोंढा वाढला; प्रवासी, पर्यटक त्रस्त पाली : प्रतिनिधी पाली-खोपोली राज्यमहामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसागणिक अत्यंत गंभीर होताना दिसत आहे. सलग सुट्ट्यामुळे अनेकांनी फिरायला जाण्याचा बेत केला. मुंबई व पुण्यावरून आलेल्या असंख्य पर्यटकांमुळे शुक्रवारी (दि. 15) पाली फाटा ते एडलेब इमॅजिका या जवळपास तीन किमी अंतरापर्यंत वाहनांच्या लांब रांगा …
Read More »मुरूड समुद्रकिनारी तेलाचा तवंग
मुरूड : प्रतिनिधी येथील समुद्रकिनारी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात तेल वाहून आले असून या तेल तवंगामुळे समुद्रकिनारा विद्रुप झाला आहे. मुरूड शहराला अडीच किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला असून या संपूर्ण किनार्यावर तेलाचे गोळे दिसत आहेत. ज्या ठिकाणी दगडी संरक्षक भिंत आहे, फक्त तिथे तेल दिसून येत आहे. खोल समुद्रातून वाहून …
Read More »बोरघाटात रिक्षा उलटून दोघांचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर बोरघाटात शुक्रवारी (दि. 15) पहाटे एका रिक्षेचा गंभीर अपघात होऊन दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून रिक्षाचालक गंभीर जखमी आहे. त्याला खोपोलीत उपचारानंतर पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खंडाळ्याकडून खोपोलीच्या दिशेने रिक्षा येत असताना बोरघाटातील शिंग्रोबा मंदिराजवळच्या अवघड वळणावर चालकाचे …
Read More »रोहा पोलीस ठाण्यात घडलेल्या घटनेतील दोषींवर कारवाई करा
अन्यथा तीव्र आंदोलन; दत्तू वाघ यांचा इशारा रोहे : प्रतिनिधी पत्नीच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी रवी वाघमारे याने गुरुवारी पहाटे रोहा येथील पोलीस कोठडीत आत्महत्या केली. घटनेतील दोषींवर कारवाई करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य आदिम कातकरी जमाती संघटनेचे अध्यक्ष दत्तू वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिला. रोहा तालुक्यातील …
Read More »मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा
माणगावात चार किमीपर्यंत वाहतूक कोंडी; पोलिसांची दमछाक माणगाव : प्रतिनिधी गुरुवारपासून सलग चार दिवस सुट्ट्या लागल्याने मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. माणगावात परिसरातील महामार्गावर शुक्रवारी (दि. 15) सकाळपासूनच वाहनांच्या सुमारे चार ते पाच किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांची पुरती दमछाक झाली. बायपासचे …
Read More »केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया शनिवारी किल्ले रायगडावर
शिवपुण्यतिथीनिमित्त करणार अभिवादन महाड : प्रतिनिधी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 342व्या पुण्यतिथीनिमित्त श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ व स्थानिक उत्सव समिती महाड यांच्या वतीने किल्ले रायगडावर शनिवारी (दि. 16) शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची प्रमुख उपस्थिती लाभणार …
Read More »सुधागडची पॉवरलिफ्टर सुश्मिता देशमुखने राष्ट्रीय विक्रमासह जिंकले सुवर्णपदक
सुधागड : प्रतिनिधी ठाण्यातील विटाव्यात राहणारी मूळची सुधागड तालुक्यातील वाघोशी गावची सुकन्या पॉवरलिफ्टर सुश्मिता सुनील देशमुख हिने केरळमधील अल्पुझा येथे झालेल्या सब ज्युनिअर-सिनिअर मास्टर क्लासिक पॉवर लिफ्टींग स्पर्धेत सुवर्णपद जिंकले. यासोबतच तिने राष्ट्रीय विक्रम स्वतःच्या नावावर केला. कल्याणच्या कारभारी जिमची खेळाडू असलेल्या सुश्मिताने राष्ट्रीय स्पर्धेत सिनियर गटामध्ये 52 किलो वजनी …
Read More »रायगड जिल्ह्यात गुंजला जयभीमचा नारा
अलिबाग : प्रतिनिधी महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती गुरुवारी (दि. 14) रायगड जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भव्य मिरवणुका काढण्यात आल्या. कोविडमुळे दोन वर्षे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करता आली नव्हती. परंतु यंदा कोविडची बंधने काढण्यात …
Read More »