Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

मुरूड भूमीअभिलेख कार्यालयात कर्मचार्‍यांची वानवा

फी भरण्यासाठी जावे लागते सेतू कार्यालयात; नागरिकांना नाहक त्रास मुरूड : प्रतिनिधी येथील भूमी अभिलेख कार्यालयात कर्मचार्‍यांची वानवा असल्यामुळे मुरूडमधील लोकांची कामे रखडत आहेत. त्यामुळे लोकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. मुरुड भूमी अभिलेख कार्यालयात एकूण 19 कर्मचार्‍यांची पदे मंजूर आहेत. मात्र सध्या येथे दोन मुख्य लिपिक, चार लिपिक …

Read More »

सुधागडमध्ये लग्नसोहळ्यात दारू आणि डिजेवर बंदी

21 गणपती पंचक्रोशी मराठा समाजाचा एकमुखी निर्णय पाली : प्रतिनिधी लग्नसोहळ्यात दारू व डिजेला बंदी असा निर्णय सुधागड तालुक्यातील सिध्देश्वर येथील 21 गणपती मंदिरात बुधवारी (दि. 23) झालेल्या 11 गाव मराठा समाजाच्या सभेत सर्वानुमते घेण्यात आला. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. वाढती महागाई तसेच कोरोनामुळे  रोजगारावरही गदा आल्याने आर्थिक …

Read More »

कर्जतमधील भिसेगाव-चारफाटा रस्त्याला अनेक विघ्ने; काम ठप्प

कर्जत : बातमीदार शहरातील भिसेगाव ते चारफाटा या सुमारे 400 मीटर लांबीच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण व रुंदिकरण करण्यात येत आहे. त्यासाठी या रस्त्याने होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. मात्र गेल्या पावसाळ्यापासून हे काम अर्धवट अवस्थेत आहे. दरम्यान, या रस्त्याच्या एका बाजूला सिमेंटकाँक्रीटचा थर टाकला आहे, मात्र दुसर्‍या बाजूला फक्त खोदकाम …

Read More »

शहीद दिनानिमित्त ठिकठिकाणी हुतात्म्यांना अभिवादन

मुरूड : प्रतिनिधी येथील सामाजिक कार्यकर्ते मोहन करंदेकर यांच्या निवासस्थानी बुधवारी (दि. 23) शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरु यांना आदरांजली वाहण्यात आली.करंदेकर त्यांच्या निवासस्थानी सलग 40 वर्षापासून शहिद दिनाचे आयोजित करण्यात येत आहे. करंदेकर दाम्पत्य दिवसभर निर्जळी उपवास पाळून शहीद दिन साजरा करतात. बुधवारी सकाळी शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्यासह …

Read More »

पोलादपुरात शिवजयंती मिरवणुकीत अफजल खान वधाचे पथनाट्य

पोलादपूर : प्रतिनिधी येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळा तर्फे सोमवारी (दि. 21) तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. या वेळी पोलादपूर शहरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीत शंकरराव गोपाळराव महाडीक इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अफझलखान वधाच्या पोवाड्यावर आधारित पथनाट्य सादर केले. त्याचे शिवप्रेमींनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. अनेक शिवप्रेमींनीही विविध देखावे सादर करून या …

Read More »

महाडमध्ये कातकरी उत्थान अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

महाड : प्रतिनिधी रायगड जिल्हाधिकारी व महाड तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील भावे येथे आयोजित केलेल्या कातकरी उत्थान अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी विविध दाखल्यांचे वाटप तसेच लसीकरण  करण्यात आले. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाड तालुक्यातील भावे येथे कातकरी उत्थान अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. …

Read More »

बैलगाडी शर्यतीतील अपघातांना जबाबदार कोण?

बैलगाडी शर्यती ही महाराष्ट्रातील परंपरा आहे. पंरतु या शर्यतींमध्ये होणारे अपघात, बैलांना होणारी मारहाण यामुळे बैलगाडी शर्यतींना बंदी घालण्यात आली होती. त्याविरोधत लोक न्यायालयात गेले. न्यायालयाने अटी आणि शर्तींवर बैलगाडी शर्यतींना परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्यात बैलगाडी शर्यतींना पुन्हा सुरूवात झाली. रायगड जिल्ह्यातदेखील मोठ्या प्रमाणावर बैलगाडी शर्यती होऊ लागल्या आहेत. …

Read More »

पेण पानेड येथे एकाची हत्या; आरोपी अटकेत

पेण ः प्रतिनिधी तालुक्यातील पानेड आदिवासी वाडीवर कौटुंबिक वादातून एकाची हत्या करण्यात आली. पोलिसांनी आरोपीला काही तासांतच ताब्यात घेतले. पानेड येथील आदिवासी वाडीवर एका वीटभट्टीवर सोनी लाला पवार रा. कामार्ली व त्यांचे पती लाला गोपीनाथ पवार हे काम करतात. सोमवारी (दि. 21 मार्च) रात्री 9 वाजण्याच्या सुमारास लाला पवार त्यांच्या …

Read More »

पेणच्या शेतकर्‍यांनी घेतले कलिंगडाचे भरघोस उत्पादन

उन्हाच्या तडाख्यामुळे मागणीत वाढ पेण : प्रतिनिधी रणरणत्या ऊन्हात थंडगार, रशरशीत आणि सर्वसामान्यांना परवडणारे फळ म्हणजे कलिंगड. वाढत्या उष्म्यामुळे कलिंगडाला मोठी मागणी असून ती पेणमधील शेतकरी पूर्ण करताना दिसत आहेत. पेणमध्ये भातशेतीची कामे उरकल्यानंतर शेतकरी भाजीपाला, वाल व अन्य पिकांबरोबर जोडधंदा म्हणून कलिंगडाचेही उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतात. तालुक्यातील तरणखोप, बळवली, …

Read More »

दुरुस्तीच्या कामासाठी आंबेत पूल दोन महिन्यांकरिता राहणार बंद

अलिबाग : प्रतिनिधी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (महाड) कार्यकारी अभियंत्यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार म्हाप्रळ-आंबेत-पुरार रस्त्यावरील सावित्री खाडीवरील आंबेत पूल दुरुस्तीच्या कामाकरिता सर्व प्रकारच्या वाहतुकीस पुढील दोन महिन्यांकरिता बंद ठेवण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी 4 मार्चपासून दोन महिन्यांकरिता हा पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद करण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी …

Read More »