खोपोली, खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली हद्दीत शुक्रवारी (दि. 25) सकाळी सिमेंट भरलेला आयशर टेम्पो सुरक्षा कठडा तोडून दरीत कोसळला. या अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला. सिमेंट गोण्या भरलेला टेम्पो (एमएच-46,डिएम-7806) शुक्रवारी सकाळी बोरघाटातून मुंबईच्या दिशेने जात होता. खोपोलीजवळ ढेकू गावच्या हद्दीत आयशर टेम्पोने (एमएच-02,एफजी-1183) या सिमेंटच्या …
Read More »कचरामुक्तीसाठी रायगड जि. प. प्रशासन सरसावले
अलिबाग ़: प्रतिनिधी वाढत्या नागरिकीकरणामुळे डम्पिंग ग्राऊंड व कचर्याच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. ही समस्या कायमच सोडविण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. डम्पिंग व कचरा मुक्त गावांसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून घन कचरा व्यवस्थापनासाठी कंपोस्टींग मशीनचा पुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी एक कोटी 10 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. …
Read More »मोरी रुंदीकरणासाठी तेलवडे ग्रामस्थांचे आज ‘रास्ता रोको’
मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील दस्तुरी नाका ते तेलवडे गावादरम्यान असलेल्या मोरीच्या रुंदिकरणास तातडीने मंजुरी द्यावी; अन्यथा शनिवारी (दि. 26) दुपारी रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा तेलवडे ग्रामस्थांनी दिला आहे. मुरूड शहरानजीक असणार्या दस्तुरी नाका ते तेलवडे गाव या दरम्यान मोरी बांधण्यात आली आहे. पावसाच्या पाण्याबरोबर वाहून आलेले छोटेमोठे वृक्ष या …
Read More »रायगडात केवळ पाच अधिकारी वाहताहेत शिक्षण विभागाचा भार
52 मंजूर पदांपैकी तब्बल 47 पदे रिक्त अलिबाग ़: प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागात राज्य शासनाची 47 पदे रिक्त आहेत. केवळ पाच अधिकारी जिल्ह्यातील शिक्षण विभागाचा भार वाहत आहेत. प्राथमिक विभाग शिक्षणाधिकारी पद रिक्त आहे. तसेच 15 पैकी 13 गटशिक्षणाधिकारी पदे रिक्त आहेत. अधिकार्यांची पदे रिक्त असल्यामुळे …
Read More »पेब किल्ल्यावर स्वच्छता मोहीम
शिवक्रांती सामाजिक संस्थेचे श्रमदान कर्जत : बातमीदार शिवक्रांती सामाजिक संस्थेच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या कर्जत आणि मुरबाड येथील कार्यकर्त्यांनी विकटगड अर्थात पेब किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबविली. संस्थेचे कर्जत विभाग अध्यक्ष अविनाश भोईर, सचिव अमोल पाटील आणि खजिनदार रसिका डुकरे तसेच मुरबाड विभाग खजिनदार समीर घरत यांनी नेरळ येथील हुतात्मा भाई …
Read More »पेणमध्ये शाळापूर्व अभियान प्रशिक्षण शिबिर
पालकांनी केले उपक्रमाचे कौतुक पेण : प्रतिनिधी महाराष्ट्र शासन, एनसीईआरटी पुणे, प्रथम संस्था व पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पेण उर्दू शाळा क्र. 5 मध्ये विद्यार्थ्यासाठी दोन दिवशीय शाळापूर्व प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. गटशिक्षणाधिकारी अरुणादेवी मोरे यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. कोविड काळामध्ये बालवाड्या बंद होत्या. त्यामुळे झालेले शैक्षणिक नुकसान (लर्निंग …
Read More »कर्जत शहरात सायकल रॅली
कर्जत : बातमीदार माझी वसुंधरा अभियानानिमित्त कर्जत नगर परिषदेच्या वतीने शहरात पर्यावरण रॅली काढण्यात आली होती. कर्जत शहरातील अनेक सायकलपटूंनी या रॅलीत सहभागी होऊन नागरिकांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. कर्जत शहरातील नागरिकांनी पर्यावरण संवर्धनासाठी पुढे यावे, यासाठी नगर परिषदेने सायकल रॅलीचे आयोजन केले होते. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे …
Read More »साखर संघ छत्रपती शिवाजी महाराज चषकाचा मानकरी
पोलादपूर : प्रतिनिधी पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर आयोजित क्रिकेट स्पर्धेत गावातीलच गणेश मालुसरे मित्र मंडळाने विजेतेपद पटकाविले. अनिकेत समर्थ महाड संघ उपविजेता ठरला. स्पर्धेत मालिकावीर केतन म्हात्रे, उत्कृष्ट फलंदाज सुरज करकरे, उत्कृष्ट गोलंदाज जयदीप बोडीवले, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक राहुल कदम ठरले. असोसिएशन गटातून हळदुले …
Read More »दणक्यावर दणके
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस विधिमंडळ सभागृहात बोलायला उभे राहिल्यानंतर जवळपास तासभराच्या भाषणात त्यांनी महाविकास आघाडीच्या कारभाराचे असे काही वाभाडे काढले की सत्ताधारी आहेत की, नाहीत असा प्रश्न पडावा. या राज्याला सध्या कोणीही वाली नाही, सामान्य नागरिकांचे प्रश्न विद्यमान सत्ताधारी सोडवू शकत नाहीत. किंबहुना लोकांचे प्रश्न सोडवण्यात त्यांना काडीचाही रस नाही …
Read More »कुंडलिका नदीकिनारी साचले कचर्याचे ढिगारे; रोहा नगर परिषदेचे दुर्लक्ष
धाटाव : प्रतिनिधी शहरातील कचरा थेट नदीपात्रात टाकण्यात येत असल्याने रोह्यातील कुंडलिका नदीचे डम्पिंग ग्राऊंड झाले आहे. त्यामुळे जलप्रदुषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. रोहा शहरातील कचरा कुंडलिका नदी किनार्यावर टाकण्यात येत आहे. हा कचरा हळूहळू नदीमध्ये मिसळतो. त्यामुळे जलप्रदुषणाबरोबरच आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाल आहे. कुंडलिका नदीकिनारी अष्टमी रोडलगत विकसीत करण्यात …
Read More »