Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

पेणच्या शेतकर्‍यांनी घेतले कलिंगडाचे भरघोस उत्पादन

उन्हाच्या तडाख्यामुळे मागणीत वाढ पेण : प्रतिनिधी रणरणत्या ऊन्हात थंडगार, रशरशीत आणि सर्वसामान्यांना परवडणारे फळ म्हणजे कलिंगड. वाढत्या उष्म्यामुळे कलिंगडाला मोठी मागणी असून ती पेणमधील शेतकरी पूर्ण करताना दिसत आहेत. पेणमध्ये भातशेतीची कामे उरकल्यानंतर शेतकरी भाजीपाला, वाल व अन्य पिकांबरोबर जोडधंदा म्हणून कलिंगडाचेही उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतात. तालुक्यातील तरणखोप, बळवली, …

Read More »

दुरुस्तीच्या कामासाठी आंबेत पूल दोन महिन्यांकरिता राहणार बंद

अलिबाग : प्रतिनिधी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (महाड) कार्यकारी अभियंत्यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार म्हाप्रळ-आंबेत-पुरार रस्त्यावरील सावित्री खाडीवरील आंबेत पूल दुरुस्तीच्या कामाकरिता सर्व प्रकारच्या वाहतुकीस पुढील दोन महिन्यांकरिता बंद ठेवण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी 4 मार्चपासून दोन महिन्यांकरिता हा पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद करण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी …

Read More »

नेरळ रेल्वेस्थानकातील वायफाय सेवा बंद

कर्जत : बातमीदार तालुक्यातील नेरळ रेल्वे स्थानकामधील वायफाय सेवा बंद आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी असलेली वायफाय सेवेचे संच स्थानकात अस्ताव्यस्त अवस्थेत पडून आहेत.त्यामुळे नेरळ रेल्वे स्थानकातून प्रवास करणार्‍यांना वायफाय सेवेपासून वंचित राहावे लागत आहे. मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील नेरळ जंक्शन हे महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. याच स्थानकातून माथेरानला मिनीट्रेन जात असते. …

Read More »

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्यास शिक्षा

माणगाव विशेष सत्र न्यायालयाचा निकाल माणगाव, पाली : प्रतिनिधी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या आरोपी मोहन धोंडू शिर्के  (रा. शिळोशी, ता. सुधागड) याला माणगाव विशेष सत्र न्यायालयाने आठ वर्ष कारावास व  15 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सुधागड तालुक्यातील शिळोशी येथील अल्पवयीन  मुलगी (7 वर्ष 3 महिने) 1 एप्रिल 2021 …

Read More »

माणगावला पाणीटंचाईची साडेसाती!

 तालुक्यातील 24 गावे, 36 वाड्या तहानलेल्या माणगाव : प्रतिनिधी मार्च महिन्या अखेरपासूनच माणगाव तालुक्यातील गावांना पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. वर्षानुवर्षे पाणीपुरवठा कृती आराखड्यात येणारी ही गावे पाणीटंचाईपासून मुक्त कधी होणार? असा प्रश्न नागरिकातून  उपस्थित केला जात आहे. या वर्षी माणगाव तालुक्यातील 24 गावे व 36 वाड्यातील ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी …

Read More »

खंडाळे ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

 अनधिकृत बांधकाम हटविण्याची मागणी अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील खंडाळा ग्रामपंचायत हद्दीत वहिवाटीच्या रस्त्यात असलेले अनधिकृत बांधकाम हटवावे,  या मागणीसाठी खंडाळा ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवार (दि. 23)पासून आमरण  उपोषणाला बसले आहेत. अलिबाग तालुक्यातील खंडाळे ग्रामपंचायत हद्दीत  प्राथमिक शाळा ते पाचकळशी आळीपर्यत रस्ता गेला आहे. या रस्त्याच्या टोकापासून ग्रामस्थांची शेती आहे. पूर्वापार …

Read More »

नागोठणे येथे अनन्यसाधारण व्यक्तिमत्व सन्मान सोहळा

‘दै. राम प्रहार‘ चे समाधान पाटील यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार प्रदान नागोठणे : प्रतिनिधी महाराष्ट्र राज युवा पत्रकार संघाचे नागोठणे शाखेतर्फे सोमवारी (दि. 21) विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणार्‍या व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रमुख राज वैशंपायन यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाचा हेतू विषद केला. …

Read More »

रानवडी येथे ऐतिहासिक पुस्तकांचे प्रदर्शन

धैर्य सामाजिक संस्थेचा उपक्रम पोलादपूर : प्रतिनिधी धैर्य सामाजिक संस्थेच्या रानवडी (ता. पोलादपूर) येथील पुस्तकांची शाळा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विद्यार्थी आणि ग्रामस्थांसाठी ऐतिहासिक पुस्तकांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. स्वराज्य संकल्पक श्री शहाजी राजे भोसले महाराजसाहेब ते पानिपतच्या युध्दापर्यंतचा मराठ्यांचा पराक्रम असा कालखंड म्हणजे स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर …

Read More »

खोपोली भाजप महिला मोर्चातर्फे विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान

खोपोली : प्रतिनिधी जागतिक महिला दिनानिमित्त खोपोली शहर भाजप महिला मोर्चा तर्फे सोमवारी (दि. 22) शहरातील कृष्णा व्हॅली सोसायटीच्या प्रांगणात सुनिता चव्हाण, रोहिणीताई टिळक, सुनिता पाटणकर या कर्तृत्ववान महिलांना सन्मानित करण्यात आले. महिलांनी आता कुटुंब सांभाळून सर्व क्षेत्रात पुढे आले पाहिजे, असे प्रतिपादन अ‍ॅड. विद्याताई डोंगरे यांनी या वेळी केले. …

Read More »

हागणदारीमुक्त अभियानासाठी कर्जत नगर परिषद प्रयत्नशील

पब्लिक टॉयलेटमध्ये महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था कर्जत : बातमीदार स्वच्छ सर्वेक्षण अभियानात कचरा मुक्त शहर बरोबर हागणदारी मुक्त शहराच्या नामांकनमध्ये तिसरे स्थान मिळविण्यासाठी कर्जत नगरपालिका सज्ज झाली आहे.त्यासाठी शहरातील पब्लिक टॉयलेटमध्ये महिला वर्गासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येत असून त्यात सॅनिटरी पॅडसाठी व्हेंडिंग मशीन आणि प्रक्रिया करणारी मशीन बसविण्याचे काम सुरू आहे. …

Read More »