Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

अलिबागमध्ये आदिवासी कातकरी बांधवांना दाखले, रेशनकार्ड वाटप

अलिबाग : जिमाका शासन आणि जिल्हा प्रशासन आदिवासी समाजाच्या कायम पाठीशी असून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वजण सर्वतोपरी प्रयत्नशील आहेत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी शनिवारी (दि. 29) कुरूळ येथे केले. कातकरी उत्थान अभियानांतर्गत कुरुळ (ता. अलिबाग) ग्रामपंचायत सभागृहात शनिवारी आदिवासी कातकरी समाजातील बांधवांना दाखले, रेशनकार्ड वाटप करण्यात आले. त्यावेळी …

Read More »

नांदगाव मराठी शाळेतील डिजिटल क्लासरुमचे उद्घाटन

मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील नांदगाव येथील मराठी प्राथमिक शाळा नं.1 मध्ये डिजीटल क्लासरुमचे उद्घाटन सरपंच वैशाली विनोद पवार व उपसरपंच अस्लम हुसेन हलडे यांच्या हस्ते करण्यात आले. नांदगाव ग्रामपंचायतीने दिलेल्या चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून सदर क्लासरुमचे काम करण्यात आले आहे. ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, शिक्षक, शिक्षिका या वेळी उपस्थित होत्या. शाळा …

Read More »

एसटीअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, आर्थिक नुकसान; महाड-सांदोशी बस सुरू करण्याची पालकांची मागणी

महाड : प्रतिनिधी किल्ले रायगड परिसरात असलेल्या गावांमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून एकही एसटी बस गेली नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान होत आहे. एसटीने उपलब्ध कर्मचार्‍यांच्या सहकार्याने या भागात बसची एक फेरी सुरु करावी, अशी मागणी केली जात आहे. एसटी कर्मचार्‍यांचा संप अद्याप सुरूच असल्याने दुर्गम, खेड्यापाड्यातील ग्रामस्थांचे मोठे हाल …

Read More »

रायगडातील शाळा सोमवारपासून होणार सुरू

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील शाळांची घंटा येत्या सोमवार (दि. 31) पासून वाजणार आहे. जिल्ह्यातील पहिली ते बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत. रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी शाळा सुरू करण्याला मान्यता दिली असून तसे आदेश जारी केले आहेत. मात्र पनवेल महापालिका क्षेत्रातील शाळा सुरू होणार नाहीत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी …

Read More »

नेरळच्या डिस्कव्हर रिसॉर्टमधील निलंबित कामगारांचे उपोषण स्थगित

कर्जत : बातमीदार तालुक्यतील नेरळ धामोते येथील डिस्कव्हर रिसॉर्टच्या व्यवस्थापकाने काही कामगारांना अचानक कामावरून कमी केले होते. आपल्याला न्याय मिळावा, यासाठी निलंबित काही कामगारांनी रिसॉर्टसमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. उपोषणच्या तिसर्‍या दिवशी शुक्रवारी (दि. 28) त्या कामगारांना व्यवस्थापनाने पुन्हा कामावर घेतले आहे. डिस्कव्हर रिसॉर्टमध्ये काम करणार्‍या 17 कामगारांना व्यवस्थापकाने …

Read More »

पन्नास टक्के उपस्थितीची परवानगी द्यावी

मंडप डेकोरेटर्स संघटनेतर्फे मुरूड तहसीलदारांना निवेदन मुरूड : प्रतिनिधी मंडप, कार्यालय, हॉल, लॉन्समधील कार्यक्रमांना पन्नास टक्के उपस्थितीची परवानगी द्यावी, अशा मागणीचे निवेदन मुरूड तालुका मंडप डेकोरेटर्स संघटनेने  तहसीलदार रोशन शिंदे यांना दिले. कोरोनामुळे सामाजिक, वैवाहिक, धार्मिक व राजकीय कार्यक्रमांना स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे टेन्ट, मंडप, कॅटरिंग, बैंक्वेट हॉल, डीजे …

Read More »

रायगड किल्ला पर्यटकबंदीमुळे स्थानिक व्यावसायिकांवर संक्रांत

महाड : प्रतिनिधी कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने शासनाने पर्यटन स्थळांवर पर्यटनास बंदी घातली आहे. मात्र समुद्र किनारे आणि इतर ठिकणे सुरु असताना केवळ  गड, किल्ले पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे किल्ले रायगडावर पर्यटक येत नसल्याने येथील छोट्याछोट्या विक्रेत्यांवर आणि व्यवसायीकांवर उपासमारीची वेळ आली आहे. किल्ले रायगड परिसरातील रायगडवाडी, …

Read More »

बुडालेली लक्ष्मीविजय नौका काढली बाहेर

 श्रीवर्धन जीवना कोळीवाडा, भरडखोल येथील शेकडो मच्छीमारांच्या प्रयत्नांना यश श्रीवर्धन  : प्रतिनिधी येथील समुद्रात रविवारी दुपारनंतर बुडालेल्या लक्ष्मी विजय नौकेला बाहेर काढण्यात जीवना कोळीवाडा व भरडखोल येथील मच्छीमारांना यश आले आहे. श्रीवर्धन जीवना बंदर येथील श्रीकृष्ण सहकारी  मत्स्यव्यावसायिक संस्थेच्या अनिकेत लक्ष्मण रघुवीर  यांची लक्ष्मीविजय (खछऊ चक 3 चच् 4192) नौका  …

Read More »

शेतकर्यांना नुकसानभरपाई द्या; अन्यथा आंदोलन करू!

शेतकरी संघर्ष समितीचा नागोठणे रिलायन्स व्यवस्थापनाला इशारा पाली : प्रतिनिधी रसायनमिश्रित सांडपाणी वाहिनी फुटून शिहू चोळे विभागातील शेतकर्‍यांचे सातत्याने नुकसान होत आहे, या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना विनाविलंब नुकसानभरपाई द्यावी; अन्यथा कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करू, असा इशारा शेतकरी संघर्ष समिती व नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी नागोठणे येथील रिलायन्स कंपनीला शुक्रवारी (दि. 28) निवेदनाद्वारे दिला. …

Read More »

पर्यटकांना वाचवणारे पोलीस शिपाई प्रशांत लोहार यांचा मुरूडमध्ये सत्कार

मुरूड : प्रतिनिधी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मुरूडमधील   पद्मदुर्ग व्यवसायिक कल्याणकारी मंडळाने पर्यटकांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणार्‍या पोलीस शिपाई प्रशांत लोहार यांचा सत्कार केला. काशीद समुद्र किनारी बुडत असणार्‍या पुणे येथील तीन पर्यटकांना वाचवण्यासाठी प्रशांत लोहार यांनी शर्थीचे प्रयत्न करून जीवरक्षक व स्पीड बोटीची मदत घेत त्यांचे प्राण वाचवले होते. …

Read More »