Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

बेकायदा सोन्याची वाहतूक; 37 लाखांचे सोने जप्त

महाड : प्रतिनिधी बेकायदा सोने जवळ बाळगून वाहतूक करणार्‍या चिपळूण येथील चालकासह पाच जणांना महाड तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 37 लाख 52 हजार रुपये किमतीचे सोने जप्त केले आहे. चिपळूण येथून बेकायदा सोने जवळ बाळगून वाहतूक केली जाणार असल्याची खबर महाड तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर सोमवारी (दि. 24) गस्त घालून …

Read More »

जीवन घडविण्यासाठीही आपल्या मतांचा कौल घ्या -नितीन पाटील

कर्जत, रोहा, नेरळ येथे राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात कर्जत : प्रतिनिधी मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावलाच पाहिजे. प्रलोभनांना न भुलता योग्य उमेदवाराला मतदान केल्यास चांगला लोकप्रतिनिधी निवडून येऊन त्याच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा व्यक्त करता येते. त्याचप्रमाणे  काय योग्य? काय अयोग्य? हे ठरवून आपले मत आपल्यालाच देऊन योग्य निर्णय घ्या. तुम्हाला आयुष्यात …

Read More »

शिर्कीचाळ येथे शॉर्टसर्किटमुळे घराला आग; लाखोंचे नुकसान

पेण : पेण तालुक्यातील शिर्कीचाळ नंबर 2 येथील सागरवाडी येथील यशवंत पाटील यांच्या घरात शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले असून सुमारे दोन लाख तीन हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सागरवाडी येथे यशवंत पाटील, सुमन पाटील व भूषण पाटील यांचे सामूहिक मालकीचे घर असून कुटुंबातील सर्व …

Read More »

मच्छीमारांना उद्ध्वस्त करण्याचा शासनाचा घाट : आमदार महेश बालदी

अलिबाग : प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाने पर्ससीन मच्छीमारसोबत सर्वच मच्छीमारांना उद्ध्वस्त करण्याचा घाट घातला आहे. अस्मानी संकटापेक्षा सुलतानी पेशाचा त्रास या मच्छीमार बांधवांना सहन करावा लागत आहे, अशी टीका आमदार महेश बालदी यांनी केली. शासनाने पर्ससीन मच्छीमारीवर बंदी घातल्याने मच्छीमार आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाच्या या जाचक धोरणाविरोधात रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर …

Read More »

भाजपच्या भटके-विमुक्त सेलचा उत्तर रायगड जिल्हा दौरा उत्साहात

खोपोली : रामप्रहर वृत्त भाजप भटके-विमुक्त मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष बबन बारगजे यांनी पक्षवाढीसाठी आपल्या सहकार्‍यांसोबत उत्तर रायगड जिल्हा दौरा केला. या दौर्‍यात खोपोली येथील पदाधिकार्‍यांसोबत संवाद साधला व येणार्‍या काळामध्ये संघटन वाढीसाठी कसे काम करावे याचे मार्गदर्शन केले. खोपोली मंडळाचे अध्यक्ष संतोष लोहार यांचा अपघात झाला असल्याने त्यांच्या घरी …

Read More »

विक्रम मिनीडोअर चालक संघटनेचा पेणमध्ये एल्गार

लेखी आश्वासनानंतर आरटीओ टाळे ठोको आंदोलन स्थगित पेण : प्रतिनिधी आपल्या प्रलंबित मागण्याची पूतर्ता करावी, या मागणीसाठी रायगड जिल्हा विक्रम मिनीडोअर चालक-मालक संघटनेने सोमवारी (दि. 24) पेण आरटीओ कार्यालयाला टाळे ठोको महसूल बंद आंदोलन केले. या वेळी परिवहन आयुक्तांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले. बदली वाहन आदेशावर …

Read More »

श्रीवर्धनच्या समुद्रात नौकेला जलसमाधी; चार जण बचावले; लाखोंचे नुकसान

श्रीवर्धन : प्रतिनिधी जीवना बंदर येथील श्रीकृष्ण सहकारी मत्स्य व्यावसायिक संस्थेच्या लक्ष्मी विजय नौका (आयएनडी एमएच 3 एमएम 4193) रविवारी (दि. 23) समुद्रात बुडाली. नौकेतील चार खलाशी बचावले, मात्र लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. समद्रामध्ये होत असलेल्या छोट्या-मोठ्या वादळामुळे मच्छीमारी धोक्यात आली आहे. रविवारी दुपारनंतर येथील समुद्रात सोसाट्याचे वारे वाहायला सुरुवात …

Read More »

भाजपकडून नाना पटोले यांच्या प्रतिमेचे दहन

अलिबाग : बातमीदार पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणारे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रतिमेचे अलिबाग येथे  दहन करून भारतीय जनता पक्ष  दक्षिण रायगड जिल्ह्यातर्फे त्यांचा निषेध करण्यात आला.  अलिबाग येथील भाजप कार्यालयासमोर भाजप कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांच्याविरोधात घोषणा देण्यात आल्या व त्यांच्या प्रतिमेचे दहन केले. भाजप …

Read More »

पेणमधील दादर गावातील विकासकामांचे आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

पेण : प्रतिनिधी तालुक्यातील दादर येथील विविध विकासकामांचे सोमवारी (दि. 24) आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यापुढील जिल्हा परिषद सदस्य दादर गावातीलच होणार असून, गावात लवकरच अस्थी विसर्जन घाटासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही आमदार रविशेठ पाटील यांनी या वेळी दिली. पेण तालुक्यातील दादर गावाच्या …

Read More »

रा. स्व. संघ जनकल्याण समितीच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

खोपोली : प्रतिनिधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती व राष्ट्रीय हितसंवर्धक मंडळ खोपोली शाखा, यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 23) येथील लोहाणा समाज सभागृहात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 94 जणांनी रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन रा. स्व. संघ जिल्हा बौद्धिक प्रमुख आनंद जोशी (पनवेल) व लोहाणा समाज …

Read More »