Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

आयबीएस परीक्षेत शेलू गावातील तरुण देशात 95वा

कर्जत : बातमीदार तालुक्यातील शेलू गावातील समीर अशोक डुकरे यांनी कृषी अर्थशास्त्राची पदवी मिळविताना आयबीएस परीक्षेत देशात 95वा क्रमांक प्राप्त केला आहे. त्यांची  तत्काळ महाराष्ट्र बँकेच्या अ‍ॅग्रिकल्चर फिल्ड मॅनेजर पदावर नियुक्ती झाली आहे. समीर डुकरे यांनी शेलू गावात प्राथमिक, तर दहावीपर्यंतचे शिक्षण शेलू बांधिवली येथील माध्यमिक शाळेत आणि बारावीपर्यंतचे शिक्षण …

Read More »

कर्जत तालुक्यात बिबट्याचा संचार; जनावरांवर हल्ला; ग्रामस्थ धास्तावले; वनविभागाकडून गस्त

कर्जत : बातमीदार तालुक्यातील शिरसे येथे मागील महिन्यात बिबट्याच्या पिल्लाचे दर्शन झाल्यानंतर मागील तीन दिवस आसल आणि बेकरे भागात बिबट्याचे दर्शन झाले. त्याने काही जनावरांना आपले लक्ष्य केल्याने कर्जत तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, बेकरे, जुम्मापट्टी भागात ग्रामस्थांनी गस्त घालण्यास सुरुवात केली आहे, तर वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा आणण्याची …

Read More »

रायगडात पारा घसरला; कडाक्याच्या थंडीने भरली हुडहुडी!

अलिबाग : प्रतिनिधी रायगडकर गेली काही दिवस गुलाबी आणि कडाक्याच्या थंडीचा अनुभव घेत असताना शनिवारपासून हवामानात अचानक बदल झाल्याने पारा कमालीचा खाली घसरला. परिणामी रायगडकर पुन्हा गारठले आहेत. थंडी ही आरोग्याला पोषक मानली जाते, परंतु कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच. गुलाबी थंडी हवीहवीशी वाटते, पण बोचरी थंडी त्रासदायक ठरते. गेल्या दोन …

Read More »

महाड एमआयडीसीत वाहतूक नियोजनाचा अभाव

महाड औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांत येणारी अवजड वाहने औद्योगिक परिसरातील रस्त्यांच्या दुतर्फा उभी केली जात असल्याने प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडीचा आणि अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. महाड औद्योगिक क्षेत्राला ट्रक टर्मिनल (वाहनतळ)ची आवश्यकता आहे. मात्र या समस्येकडे एमआयडीसी प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. महाड एमआयडीसीमध्ये असलेल्या कारखान्यातील मालाची आवक-जावक करण्यासाठी विविध ठिकाणाहून …

Read More »

मुरूड समुद्रकिनार्यावर भरतीबरोबर आले शेवाळ

मुरूड : प्रतिनिधी शहरातील सागरी किनार्‍यावर आज जिथे पाहावे तिथे शेवाळच दिसून येत आहे. नवाबाचा राजवाडा ते शहरातील कोळीवाडा परिसर हा तीन किमीचा सागरी किनारा आहे. आज या संपूर्ण परिसरात जिथे तिथे मोठ्या प्रमाणात शेवाळ नजरेस पडत होते. जोरदार भरतीमुळे खोल समुद्रात उलथापालथ होऊन तळाशी असणारे शेवाळ उखडून ते किनार्‍यावर …

Read More »

रायगडातील सहा विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

बालविज्ञान परिषदेसाठी तीन प्रकल्पांची राष्ट्रीय स्तरावर निवड पाली : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील तीन प्रकल्पांची नुकतीच राष्ट्रीय स्तरावर बाल विज्ञान परिषदेत निवड झाली आहे. राष्ट्रीय स्तरावरील बालविज्ञान परिषदेचे आयोजन फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात गुजरात सायन्स सिटीमार्फत ऑनलाईन पद्धतीने केले जाणार आहे. भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे दरवर्षी राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद …

Read More »

पोल्ट्रीमुळे बीडखुर्द परिसरात दुर्गंधी

प्रजासत्ताक दिनापासून बेमुदत उपोषणाचा ग्रामस्थांचा इशारा खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील बीडखुर्द ग्रामपंचायतीच्या हद्दीतील एका पोल्ट्रीफार्मच्या दुर्गंधीमुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. या पोल्ट्री व्यवसायिकावर कारवाई करावी, अन्यथा प्रजासत्ताक दिनापासून (दि. 26) बेमुदत उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी खालापूर तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिला आहे. बीडखुर्द ग्रामपंचायतीच्या हद्दीतील ही पोल्ट्री बंद करण्याचा ठराव 25 …

Read More »

भाजपच्या वतीने एसटी कर्मचार्यांना धान्यवाटप

महाड : प्रतिनीधी महाड भाजपच्या वतीने एसटी कामगारांना धान्यवाटप करण्यात आले. गेले दोन महिने महाराष्ट्रातील एसटी कार्मचार्‍यांचा संप सुरू आहे, गिरणी कामगाराप्रमाणेच हा कामगारदेखील देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे. पगार नाही, शेती नाही, दुसरा रोजगार नाही, त्यामुळे या कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा वेळी भाजप या कामगारांसाठी धावून आले …

Read More »

‘कोशिंबळे’तील पाण्यावर केमिकल सदृश तवंग

नागरिकांत भीती, पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले माणगाव : प्रतिनिधी काळ नदीवरील कोशिंबळे धरणातील पाण्यावर सध्या केमिकल सदृश तवंग आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. निजामपूर शहराला होणारा पाणीपुरवठा काळ नदीवर उभारण्यात आलेल्या पाणीयोजनेतून केला जातो. या पाणी योजनेपासून काही अंतरावर कोशिंबळे गावाजवळ काळ नदीवर धरण बांधलेले आहे. त्या धरणाचे पाणी …

Read More »

मराठी संत साहित्य संमेलनाला प्रारंभ

खालापूर : प्रतिनिधी महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित दहाव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचा शनिवारी (दि. 22) खालापूर तालुक्यातील देवन्हावे येथील नोव्हाटेल इमॅजिका या ठिकाणी प्रारंभ झाला. राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात त्यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचा मान यंदा रायगड जिल्ह्याला मिळाला दोन …

Read More »