Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

फणसाडमधील वणवे रोखण्यासाठी विहूर ग्रामस्थांचे श्रमदान

मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील फणसाड अभयारण्य आगीपासून संरक्षित रहावे, यासाठी विहूर ग्रामस्थांनी वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली श्रमदान करुन जंगल परिसरात वाढलेली झुडपे, सुके गवत, झाडाच्या सुक्या फांद्या, पालापाचोळा गोळा करून त्याची योग्य ती विल्हेवाट लावली. फणसाड अभयारण्य आगीपासून संरक्षीत रहावे, अभयारण्यातील वृक्ष, वन्यजीव, पक्षी यांचे अस्तित्व व सुरक्षितता टिकून रहावी यासाठी …

Read More »

सुधागडात कडधान्ये पिकाला साड्यांच्या कुंपणाचे संरक्षण

पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यात बहुतांश ठिकाणी कडधान्याची शेती केली जाते. या कडधान्य पिकाचे शेळी व गुरांपासून संरक्षण करण्यासाठी काही शेतकरी आपल्या शेताला साड्यांचे कुंपण करत आहेत. पाली-खोपोली मार्गाच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात साड्यांचे  कुंपण लावलेली शेती आढळते. पक्क्या भिंतीचे किंवा लोखंडी जाळी व तारांचे कुंपण करणे परवडत नसल्याने सर्वसाधारणपणे …

Read More »

एक्स्प्रेस वेवरून टँकर कोसळला

दोन जण किरकोळ जखमी खोपोली : प्रतिनिधी ब्रेक निकामी झाल्यामुळे मुबंई-पुणे एक्सप्रेस वेवरून जाणारा टँकर शुक्रवारी (दि. 14) पहाटेच्या सुमारास 50 फूट खाली जुन्या महामार्गावर कोसळला. सुदैवाने यातील चालक आणि क्लिनर बचावले असून, ते किरकोळ जखमी झाले आहेत. पुण्याहून मुबंईकडे चाललेला टँकर बोरघाटातील  दत्तवाडीजवळ आला असता त्याचे ब्रेक निकामी  झाले. …

Read More »

लोखंडी प्लेट तुटल्याने बंधार्यातील पाणी गेले वाहून

कर्जत बोरगाव येथील शेतकरी हवालदिल कर्जत : बातमीदार तालुक्यातील पोश्री नदीवरील बोरगाव येथे याच वर्षी बांधलेल्या सिमेंट बंधार्‍यात भरपूर पाणी साठले होते, मात्र त्यासाठी लावलेल्या लोखंडी प्लेट गुरुवारी (दि. 13) रात्री तुटल्या आणि बंधार्‍यातील सर्व पाणी वाहून गेले. या बंधार्‍याच्या पाण्यावर किमान 50 एकर जमिनीवर भाजीपाला शेती केली आहे. त्या …

Read More »

गोळेगणी येथे आंबापीक शेतीशाळा

होण्डा कंपनीतर्फे यांत्रिकीकरणाचे सादरीकरण पोलादपूर : प्रतिनिधी कृषी विभाग यांच्या वतीने आत्मा योजनेंतर्गत पोलादपूर तालुक्यातील गोळेगणी येथे आंबा पीक शेतीशाळा घेण्यात आली. त्याला शेतकर्‍यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शेतीशाळेत होंडा कंपनीच्या शेतीविषयक विविध उपकरणांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. तालुका कृषी अधिकारी सुरज पाटील यांनी महाडीबीटी पोर्टलवर शेतकर्‍यांनी ऑॅनलाइन अर्ज करून अनुदानाचा …

Read More »

कर्जत-कल्याण राज्यमार्गाची डागडुजी करा

अन्यथा आंदोलन; भाजपचा इशारा कर्जत : बातमीदार तालुक्यातील  कर्जत-कल्याण राज्य महामार्ग अनेक ठिकाणी खराब झाला आहे. त्या रस्त्याची दुरुस्ती करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा भारतीय जनता पक्षाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन वर्षापूर्वी कर्जत-कल्याण राज्य महामार्गाचे कर्जत तालुक्यातील काम केले आहे. हा रस्ता …

Read More »

प्रदेश युवक काँग्रेसचा सरचिटणीस उमेश ठाकूरसह दोन साथीदारांना बेड्या

अलिबाग : प्रतिनिधी आपल्या अवैध रेती व्यवसायाबाबत तक्रारी करणार्‍याची बदनामी करण्याच्या हेतूने त्याच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट उघडून त्यावरून महिलेला अश्लील व्हिडीओ आणि मेसेजेस पाठवल्याप्रकरणी प्रदेश युवक काँग्रेसचा सरचिटणीस अ‍ॅड. उमेश ठाकूर याला अलिबाग पोलिसांनी अटक केली आहे. उमेश ठाकूर रुग्णालयात दाखल असून त्याची मेडिकल कस्टडी घेण्यात आली आहे. अ‍ॅड. …

Read More »

पोलिसांशी हुज्जत घालणे पडले महागात; पालीत वाहतुकीचे नियम मोडणार्‍याला पाच हजाराचा दंड

पाली : प्रतिनिधी पोलिसांबरोबर हुज्जत घालणार्‍या वाहनचालकाला पाली येथील कनिष्ठ न्यायालयाने पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे वाहतुकीचे नियम मोडणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. पालीसह सुधागड तालुक्यात वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांची तपासणी सुरू आहे. यादरम्यान वाहनचालकांची कागदपत्रे व लायसन्स तपासले जात आहेत. पाली-खोपोली मार्गावरील गणेश हॉटेलजवळ बिरप्पा कलप्पा पुजारी (वय 38) …

Read More »

पाली येथील अंबा नदीत मेलेल्या कोंबड्या व मासे

पाली : प्रतिनिधी पालीतील अंबा नदी पुलाजवळ नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मेलेल्या कोंबड्या व मासळी टाकलेली आढळली. त्यामुळे नदीचे पाणी दूषित झाले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सुधागड तालुक्यातील पाली गावाला पाणीपुरवठा करणारी अंबा नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. कधी कारखान्याचे दूषित पाणी, तर कधी घाण व केरकचरा यामुळे नदी प्रदूषित …

Read More »

शहरातील गोडाऊन अन्यत्र हलवावे; म्हसळाकरांची मागणी अद्यापही लालफितीत

म्हसळा : प्रतिनिधी शहरातील नागरी वस्तीत शासकीय धान्य गोडाऊन असून ते अन्यत्र हलवावे किंवा गोदामाला अन्य मार्गाने रस्ता द्यावा, अशी मागणी म्हसळ्याच्या पहिल्या  नगराध्यक्षांनी केली होती, मात्र ही मागणी महसूल विभागाने अजूनही अनुत्तरित ठेवली आहे. म्हसळ्यातील कन्याशाळा परिसरांत 50 ते 52 वर्षापूर्वी अन्न नागरी पुरवठा विभागाने शासकीय गोडाऊन उभारले आहे. …

Read More »