अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींच्या 21 जागांसाठी 60 उमेदवार आपले भवितव्य अजमावत आहेत. त्यासाठी सहा नगरपंचायतीमध्ये मंगळवारी (दि. 18) मतदान होणार आहे. 19 तारखेला मतमोजणी होईल. जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका डिसेंबर महिन्यात पार पडल्या. मात्र ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे या सहा नगरपंचायतींमधील ओबीसी प्रवर्गासाठी राखीव 21 जागांसाठीची …
Read More »कर्जतमध्ये ई-श्रमकार्ड शिबिर
कर्जत : बातमीदार शहरातील रोजंदारी कामगारांची नोंदणी करण्यासाठी आरपीआय (आठवले गट), उन्नती फाउंडेशन व कॉमन सर्विस सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने कर्जतमध्ये नुकताच ई श्रमकार्ड शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 159 जणांची नोंदणी करण्यात आली. कर्जत शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ घेण्यात आलेल्या या शिबिराचे उद्घाटन नगरसेवक राहुल डाळिंबकर …
Read More »तांबाटी येथे आरोग्य तपासणी शिबिर
खोपोली : प्रतिनिधी कातकरी उत्थान कार्यक्रमांतर्गत खालापूर तहसील कार्यालय व तांबाटी ग्रुपग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आणि चौक येथील साई हॉस्पीटलच्या सहकार्याने नुकतच तांबाटी गावातील प्राथमिक शाळेत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. त्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशानुसार व प्रांताधिकारी अजित नैराळे यांच्या मार्गर्शनाखाली घेण्यात आलेल्या …
Read More »मुरूड, माणगाव तालुक्यांत कोरोना रुग्णसंख्येत भर
मुरूड : प्रतिनिधी मुरूड तालुक्यात रविवारी (दि. 16) एका दिवसात 14 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली तर माणगाव तालुक्यात 83 नवे कोरोनाग्रस्त आढळले. मुरुड तालुका कोरानामुक्त म्हणून ओळखला जात होता. परंतु गेल्या दोन दिवसांत कोरानाबांधितांमध्ये झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. सध्या ओमायक्रॉनचे रुग्ण नसले तरी कोरानाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. …
Read More »फणसाड अभयारण्यातील पक्षीसंख्येत वाढ; भीमपंखी फुलपाखरासह दुर्मिळ अष्टपाद प्राण्यांचेही दर्शन
मुरूड : प्रतिनिधी वनविभाग आणि ग्रीन वर्कस् ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने जानेवारी महिन्यात तीन दिवस मुरूड तालुक्यातील फणसाड अभयारण्यात पक्षीगणना केली. त्यामध्ये अभयारण्यातील पक्षीसंख्येत वाढ दिसून आले. या वेळी अभयारण्यात दुर्मिळ अष्टपाद प्राण्यांही आढळले. वन कर्मचारी आणि ग्रीन वर्कस् ट्रस्ट या संस्थेचे कार्यकर्ते यांनी एकत्रितरित्या जानेवारी महिन्यात तीन दिवस फणसाड …
Read More »विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल; विकासाचा निधी तसाच पडून; पोलादपूर नगरपंचायत निवडणुकीत भाजपला सक्षम पर्याय म्हणून संधी देण्याचे आवाहन
पोलादपूर ः प्रतिनिधी केंद्र सरकारने राज्याला जनतेच्या विकासासाठी विविध योजना, उपक्रमांच्या माध्यमातून निधी देऊ केला आहे, मात्र राज्य सरकारने हा निधी वळता करून घेतलेला नाही. महाविकास आघाडी सरकारमधील मंडळींना राज्य चालवायचेच नाही. त्यामुळे केंद्र कोंडी करतेय असे भासवत केवळ राजकीय आकसाने अब्जावधीचा निधी पडून असल्याचा घणाघाती आरोप राज्य विधान परिषदेचे …
Read More »आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत 51 लाखांची यंत्रसामग्री
चौक : उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत 51 लाखांची यंत्रसामग्री खालापूर तालुक्यातील चौक ग्रामीण रुग्णालयात देण्यात आली असून त्याचे लोकार्पण शनिवारी (दि. 15) झाले. चौक हा ग्रामीण विभाग असून येथे मोठ्या प्रमाणात आदिवासी व गरीब गरजू लोकांची वस्ती आहे. त्यांना योग्य ते उपचार …
Read More »पेण अर्बन बँकेमध्ये अडकलेल्या पैशांसाठी कर्जतमध्ये सह्यांची मोहीम
कर्जत ः बातमीदार पेण अर्बन बँकेत शेकडो ठेवीदार, खातेदारांचे पैसे अडकले आहेत. गेली 11 वर्षे बँक संघर्ष समितीच्या माध्यमातून आंदोलने केली जात आहेत. या लढ्याचा एक भाग म्हणून शनिवारी (दि. 15) कर्जतमध्ये सह्यांची मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत तब्बल 1300 नागरिकांनी सह्या करून आपला पाठिंबा दिला. केंद्र सरकारने नव्याने केलेल्या …
Read More »रायगड पोलीस दलात कोरोनाचा शिरकाव ; 60 जणांना लागण
अलिबाग : प्रतिनिधी रायगड पोलीस दलात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर शिरकाव झाला आहे. जिल्ह्यातील सहा पोलीस अधिकारी आणि 54 कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांचाही समावेश आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे …
Read More »रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयात सात जण कोरोना पॉझिटिव्ह
अलिबाग : शासकीय कार्यालयांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली असून अलिबाग येथील पोलीस जिल्हा अधीक्षक कार्यालयातील सात जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात अधिकारी, कर्मचार्यांचा समावेश आहे. मुंबईला लागून असलेल्या रायगड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव झपाट्याने वाढत आहे. दिवसाला दीड ते दोन हजार नवीन रुग्ण आढळत आहेत. रुग्णवाढ रोखण्यासाठी …
Read More »