पेण : प्रतिनिधी पेण येथील साईसेवक आध्यात्मिक सामाजिक विकास संस्थेच्या वतीने पेण ते शिर्डी पायी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. मंगळवारी (दि. 7) ही दिंडी पेणमधून रवाना झाली आहे. या पदयात्रेत अनेक तरुण सहभागी झाले आहेत. यंदाचे संस्थेचे हे 6 वे वर्ष असून मंगळवारी सकाळी पेणमधील साईमंदिरात बाबांची आरती करून ही …
Read More »पोलादपूर नगरपंचायतीच्या 58 उमेदवारी अर्जांपैकी 43 अर्ज वैध
पोलादपूर : प्रतिनिधी नगरपंचायत पोलादपूरच्या 17 प्रभागांमध्ये अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 58 उमेदवारी अर्ज दाखल झाले. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पोलादपूर नगरपंचायतीच्या 4 नामाप्र प्रभागांमध्ये या वेळी निवडणूक होणार नसल्याने 14 उमेदवार आपोआपच रिंगणाबाहेर गेले आहेत. उर्वरित 14 प्रभागांतील 15 अर्ज अवैध झाल्याने …
Read More »मुरूड-माझेरी रस्ता बनलाय जीवघेणा!
मुरूड : प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील राजपुरी ग्रामपंचायत हद्दीतील माझेरी रस्ता हा जिल्हा परिषद अंतर्गत यामधून येत आहे. या रस्त्यावरून रोज शेकडो वाहने ये-जा करीत असतात, मात्र या रस्ताची अवस्था बिकट बनली आहे. या रस्त्यामुळे वाहनचालकांसह पादचारी प्रवाशांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देण्यास या खात्यातील …
Read More »रायगडातील ओबीसींच्या 21 जागांवरील निवडणुका स्थगित
अलिबाग : प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) आरक्षणाला दिलेल्या स्थगितीच्या निर्णयानुसार जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींच्या एकूण 21 ओबीसी प्रभागांतील निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. आता 6 नगरपंचायतींमध्ये 81 जागांसाठी निवडणूक होणार आहे. रायगड जिल्ह्यातील खालापूर 1, तळा 4, माणगाव 4, म्हसळा 4, पोलादपूर 4, …
Read More »मृगगडाने घेतला मोकळा श्वास
पाली : प्रतिनिधी मृगगड किल्ला रायगड जिल्ह्यासह सुधागड तालुक्याच्या इतिहासाचा एक अभेद्य साक्षीदार आहे. नियमित श्रमदान मोहिमेचा भाग म्हणून रविवारी (दि. 5) दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे येथे स्वच्छता व संवर्धन मोहीम आयोजित केली होती. या मोहिमेचे नेतृत्व प्रशांत डिंगणकर यांनी केले. आडवाटेतील हा किल्ला सुंदर निसर्गासह अतिशय महत्त्वपूर्ण वास्तूंनी सजलेला आहे. तो …
Read More »17 जागांसाठी 62 उमेदवारी अर्ज दाखल
ओबीसी जागा वगळून 13 जागांसाठी निवडणूक माणगाव : प्रतिनिधी येत्या 21 डिसेंबर रोजी माणगाव नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीत 17 वार्डांतून 17 जागांसाठी 62 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. हे सर्व अर्ज बुधवारी (दि. 8) झालेल्या छाननीत वैध ठरले असल्याची माहिती निवडणुकीचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राहुल इंगळे …
Read More »कर्जत भालिवडीमध्ये वनमजुराला मारहाण
कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील वनविभागाच्या कर्जत पूर्व क्षेत्रात असलेल्या हुमगाव बिटमधील वनजमिनीवर सिमेंट बांधकाम करून भणीत बांधण्यात आली आहे. ती भिंत पाहण्यास गेलेल्या वनविभागाच्या कर्मचार्यांवर वनजमिनीमध्ये सिमेंट बांधकाम करणार्या स्थानिकाने हल्ला केला आणि त्यांना जखमी केले. वनमजुराला रक्तबंबाळ करून स्थानिक रहिवासी थांबला नाही, तर त्याने वनमजुरावर लोखंडी हत्यार घेऊन …
Read More »पेणमध्ये 21 लाखांचा गुटखा पकडला; चालक ताब्यात
पेण ः प्रतिनिधी अवैधरीत्या गुटखा वाहतूक करणार्या आरोपीला पोलिसांनी टेम्पो व मालासह मुंबई-गोवा महामार्गावर खारपाडा गावच्या हद्दीत पकडले. या कारवाईत 21 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. शासनाने प्रतिबंध केलेला गुटखा घेऊन जुन्नरमधील काटेड येथील चालक विपुल विलास चिपळ हा विक्री करण्यासाठी चालला होता. त्याचा टेम्पो 6 डिसेंबर रोजी सायंकाळी …
Read More »राजिपची ’शिवतीर्थ’ धोकादायक
अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्यालयाची इमारत ‘शिवतीर्थ’ धोकादायक असल्याचा अहवाल लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे स्ट्रक्चरल अभियंता डॉ. सचिन पोरे यांनी दिला आहे. त्यामुळे ही इमारत आता पाडावी लागणार आहे. ‘शिवतीर्थ’ इमारतीचे बांधकाम 1978मध्ये सुरू करण्यात आले. 1982 साली ही इमारत बांधून पूर्ण झाली. गेली 42 वर्षे …
Read More »मालवाहू गाडीचे इंजिन बिघडले मिनीट्रेनचा सहा तास खोळंबा
कर्जत : बातमीदार मध्य रेल्वे प्रशासनाने मिनीट्रेनची नेरळ-माथेरान-नेरळ अशी प्रवासी वाहतूक सुरू करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी नॅरोगेज ट्रॅकची दुरुस्ती सुरू आहे, मात्र सोमवारी (दि. 6) या कामासाठी आवश्यक असलेले साहित्य घेऊन गेलेल्या मालवाहू ट्रेनच्या इंजिनात बिघाड झाला आणि ही ट्रेन नॅरोगेजवर तब्बल सहा तास थांबून राहिली. नॅरोगेज ट्रॅक …
Read More »