Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

पेणमध्ये अद्ययावत मच्छीमार्केट उभारणार -आमदार रविशेठ पाटील

पेण : प्रतिनिधी कोळी समाज अतिशय कष्टाळू असून येथील महिला सकाळपासून मच्छीविक्री करीत असतात.  या कष्टकरी समाजासाठी भविष्यात पेणमध्ये नवीन अद्यावत मच्छीमार्केट उभारणार असल्याची ग्वाही आमदार रविशेठ पाटील यांनी दिली. पेण कोळीवाडा येथील मच्छीमार्केटच्या कामाचे भूमिपूजन आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. नवीन मच्छीमार्केटसाठी …

Read More »

मुरूडमधील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी 14 उमेदवारी अर्ज दाखल

मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील आठ ग्रामपंचायतीमधील सदस्य पदांच्या 21 रिक्त जागांसाठी 13 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान, राजपुरी, सावली, चोरढे या ग्रामपंचायतीमधील पोटनिवडणुकीसाठी एकही उमेदवारी अर्ज न दाखल झाल्याने त्याठिकाणी निवडणूक होणार नाही. मुरूड तालुक्यातील वावडुंगी, सावली, एकदरा, राजपुरी, मजगाव, उसरोली, चोरढे, कोर्लई या आठ ग्रामपंचायतीमधील सदस्य पदांच्या 21 …

Read More »

कर्जत उपजिल्हा रुग्णालय परिसरातील तीन इमारती धोकादायक

कर्जत : बातमीदार येथील उपजिल्हा रुग्णालय परिसरातील तीन  इमारतींना शासनाने धोकादायक ठरवले आहे. त्या इमारती रिकाम्याही करण्यात आल्या आहेत. या धोकादायक इमारती जमीनदोस्त कराव्यात, असे आदेश असूनदेखील संबंधीत विभाग कोणत्याही प्रकारची कार्यवाही करीत नाही. दरम्यान, त्या धोकादायक इमारती जमीनदोस्त कराव्यात आणि संभाव्य धोका टाळावा अशी मागणी सम्यक विद्यार्थी संघटनेने केली …

Read More »

अनधिकृत बांधकामाविरोधात तांबडी ग्रामस्थ आक्रमक

खोपोली नगरपलिकेला दिला आत्मदहनाचा इशारा खोपोली : प्रतिनिधी नगरपालिका हद्दीतील तांबडी या वसाहतीमध्ये नदाफ नावाच्या रहिवाशाने अनधिकृत घराचे बांधकाम सुरू केले आहे. सदरची जागा वहिवाटीची असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी या जागेवरील अनधिकृत बांधकामाला तीव्र विरोध दर्शवित आत्मदहनाचा इशारा दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. खोपोली नगरपालि का हद्दीतील वासरे …

Read More »

रायगड किल्ल्याला भेट ही माझ्यासाठी एक प्रकारे तीर्थयात्राच -राष्ट्रपती रामनाथ कोविंद

महाड, अलिबाग ः प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य अलौकिक होते. 17व्या शतकात त्यांनी दूरदृष्टी दाखवत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. आज 21व्या शतकातही त्यांचे कार्य नव्या पिढीला प्रेरणादायी ठरतेय. त्यामुळे किल्ले रायगडला भेट देणे ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. आज  या किल्ल्याची केलेली यात्रा मी तीर्थक्षेत्र मानतो, असे उद्गार देशाचे …

Read More »

मुरूडमधील टपरीधारकांना दिलासा; भाडे माफ कराण्याचे उपविभागीय अधिकार्‍यांचे आदेश

मुरूड : प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या मुरूड समुद्रकिनार्‍यावरील टपरीधारकांचे वार्षिक भाडे नगर परिषदेने माफ करावे, असे आदेश उपविभागीय अधिकार्‍यांनी दिले आहेत. त्यामुळे या टपरीधारकांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. मुरूड समुद्रकिनारी असलेल्या 44 टपरीधारकांचे निसर्ग चक्रीवादळात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शासनातर्फे नुकसानग्रस्त टपर्‍यांचे पंचनामे केले गेले. मात्र त्यांना अद्याप …

Read More »

रावे गावाचे नंदनवन करणार -वैकुंठ पाटील

पेण : प्रतिनिधी आमदार रविशेठ पाटील यांची जन्मभूमी असलेल्या रावे गावाचे नंदनवन करणार असल्याची ग्वाही रायगड जिल्हा परिषदेचे माजी विरोधीपक्ष नेते तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी गुरुवारी (दि. 25) रावे येथे दिली. आमदार रविशेठ पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून दहा लाख रुपये खर्चून रावे गावातील मराठी शाळा ते …

Read More »

अवकाळी पावसाने वैरणीचा प्रश्न ऐरणीवर; पेंढा भिजल्याने मुक्या जनावरांचे हाल, बळीराजा चिंतातूर

पाली ़: प्रतिनिधी अवकाळी व परतीच्या पावसाने भात पिकाचे नुकसान केले. तसेच झोडणी व मळणीनंतर शेतात रचलेला पेंढादेखील भिजविला. कुजलेला आणि बुरशी आलेला हा पेंढा जनवारांच्या खाण्यायोग्य राहिला नाही. त्यामुळे मुक्या जनावरांच्या चार्‍याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सुधागड तालुक्यातील बहुतांश ठिकाणी मागील आठवड्यात अवकाळी व परतीचा पाऊस पडला. काही …

Read More »

भाजपाच्या ओबीसी जागर अभियान रॅलीचे कर्जत शहर आणि नेरळमध्ये स्वागत

कर्जत : बातमीदार भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी जागर अभियान रॅलीचे कर्जत शहर आणि नेरळ गावात स्वागत करण्यात आले. कर्जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे तर नेरळ गावातील हुतात्मा हिराजी पाटील चौकात या रॅलीचे भाजप कार्यकर्त्यांनी स्वागत केले. भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांनी राज्यातील ओबीसी …

Read More »

ओबीसी जागर अभियान रथयात्रेचे खोपोलीमध्ये स्वागत

खोपोली : प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाज आरक्षणापासून वंचित राहत आहे, या पार्श्वभूमीवर भाजपच्या ओबीसी सेलच्या वतीने ओबीसी जागर अभियान रथाचे आयोजन करण्यात आले आहे. या रथाचे बुधवारी (दि. 24) सायंकाळी खोपोलीच्या शिळफाटा येथे आगमन झाले. माजी नगराध्यक्ष सोहनराज राठोड यांनी या रथाचे स्वागत केले. राज्यातील ठाकरे सरकारच्या …

Read More »