Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

माथेरानमध्ये अनधिकृतपणे टेंटचा होतोय वापर

पर्यावरण खात्याचे दुर्लक्ष माथेरान : रामप्रहर वृत्त माथेरान हे एक पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील पर्यटन क्षेत्र आहे. येथील वनसंपदा व पर्यावरण राखण्यासाठी वनविभाग, हरित लवाद, पर्यावरण सनियंत्रण समितीसारख्या समित्या कार्यरत आहेत. त्यामुळेच माथेरानमधील जंगलांमध्ये हल्ली आढळून येणारे टेंट (तंबू) हा येथील चर्चेचा विषय ठरत आहे. हे असेच सुरू राहिले तर त्याचा येथील …

Read More »

हजारो सापांचा रस्त्यावर चिरडून हकनाक बळी

पाली : प्रतिनिधी पावसाळ्यात सर्वत्र सरपटणारे जीव मोठ्या प्रमाणावर दिसून आले, पावसाळा नुकताच संपला आहे. या हंगामात साप, सरडे इत्यादी सरपटणारे प्राणी भक्ष्य व उष्णतेसाठी रस्त्यावर बाहेर फिरतात. खाद्य गोळा करण्यासाठी त्यांच्या हालचाली वाढत आहेत. मग बर्‍याच वेळा हे प्राणी रस्त्यावर येऊन वाहनांखाली चिरडून त्यांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. …

Read More »

मूर्तिकारांची कला अप्रतिम

नगराध्यक्षा प्रितम पाटील यांचे गौरवोद्गार पेण : प्रतिनिधी गणेशमूर्तीचे माहेरघर म्हणजेच रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात श्री गणेश मित्र मंडळ कुंभार आळी आणि येथील गणपती कारखानदारांनी राज्यस्तरीय गणेशमूर्ती प्रदर्शन व स्पर्धेचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन पेणच्या नगराध्यक्षा प्रितम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी कलाकारांना प्रोत्साहन देताना नगराध्यक्षा …

Read More »

ग्रामीण भागात रास्तधान्य सहज मिळण्याचा मार्ग मोकळा

रायगड जिल्ह्यात 252 नवीन दुकानांसाठी जाहीरनामे अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा पुरवठा विभागाने जिल्ह्यासाठी नवीन 252 रेशन दुकाने सुरू करण्यासाठी जाहीरनामे काढले आहेत. यात शहरी भागातील 23; तर ग्रामीण भागातील 229 दुकानांचा समावेश आहे. नवीन दुकानांसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत संस्थांना अर्ज करता येतील. जिल्ह्यात दोन हजार महसुली गावे आहेत. त्यात चार …

Read More »

पालीकरांवर अघोषित पाणीटंचाईचे संकट

अंबा नदीच्या पाणी पातळीत घट पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्याचे मुख्यालय व अष्टविनायकाचे प्रख्यात धार्मिक स्थळ असलेल्या पालीत वर्षानुवर्षे पाणीटंचाईची समस्या गंभीर आहे. पालीकरांना येथील अंबा नदीतून पाणीपुरवठा होतो. पावसाळा संपल्यावर येथून काही अंतरावर असलेल्या बलाप गावाजवळील अंबा नदीच्या के.टी. बंधार्‍याचे दरवाजे, फळ्या (पत्रे) लावून अंबा नदीचे पाणी अडविले जाते, …

Read More »

बालवैज्ञानिक विवेक कोळीने बनविला सर्वात कमी वजनाचा उपग्रह

पाली : प्रतिनिधी डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन व स्पेस झोन इंडिया अंतर्गत पेलोड क्युब्ज चॅलेंज 2021 या प्रकल्पाद्वारे सुधागड तालुक्यातील विवेक प्रदीप कोळी या बालवैज्ञानिकाने सर्वात कमी वजनाचा उपग्रह जेएसपीएम कॉलेज पुणे येथील कार्यशाळेत बनविला. फेब्रुवारी महिन्यात तमीळनाडू रामेश्वरम येथून हा उपग्रह यशस्वी लाँचिंग करण्यात आला. त्यानंतर विवेकच्या …

Read More »

वीटभट्टी मुलांसाठी भरली शाळा

बालदिनी सुरू झाला उपक्रम कर्जत : बातमीदार आदिवासी कातकरी समाजातील कुटुंबं वीटभट्टी कामगार म्हणून स्थलांतरण करतात, त्यामुळे त्या आदिवासी कातकरी यांच्या मुलांचे शिक्षण थांबते. अशा मुलांनी शिकले पाहिजे यासाठी कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणारी भाविका भगवान जामघरे ही तरुणी त्या मुलांसाठी शाळा सुरू करून शिकवणी वर्ग घेणार आहे. आज बालदिनी वीटभट्टीवरील …

Read More »

नेरळमधील चौकांना फलक आणि वाहनांचा गराडा

कर्जत : बातमीदार नेरळ गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे आणि त्याचा प्रयत्य नेरळ गावातील विविध चौकांना देण्यात आलेल्या नावांवरून येतो. नेरळ ग्रामपंचायतीने त्या सर्व महापुरुष, हुतात्मे, संत यांची नावे या चौकांना दिली आहेत आणि त्याच नेरळ ग्रामपंचायतीला आता त्याचा विसर पडला आहे. दरम्यान, नेरळ गावातील बहुतेक चौकांना जाहिरात फलक आणि वाहनांचा …

Read More »

एसटी कर्मचार्यांच्या आंदोलनाला भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा पाठिंबा

पाली : प्रतिनिधी एसटी महामंडळ बरखास्त करून राज्य सरकारमध्ये  विलिनीकरण करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संप व आंदोलनाला भ्रष्टाचार निर्मूलन समिती रायगड यांच्याकडून पाठिंबा देण्यात आला. तसेच सुधागड पालीचे तहसीलदार दिलीप रायन्नावर यांच्यामार्फत मुख्यमंत्री व परिवहन मंत्र्यांना पाठिंब्याचे निवेदन देण्यात आले. या वेळी रायगड जिल्हाध्यक्ष प्रशांत …

Read More »

माथेरानमधील रोजगाराचे प्रश्न घेऊन भाजपचे शिष्टमंडळ राजधानी दिल्लीत

कर्जत ः बातमीदार माथेरान शहर आणि परिसराच्या विकासासाठी महत्त्वाचे प्रश्न घेऊन माथेरानमधील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीसाठी गेले होते. त्यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री, तसेच केंद्रीय भूपृष्ठमंत्री यांची भेट घेऊन माथेरानमधील रोजगाराचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याची मागणी केली. भाजप नेते व जिल्ह्यातील उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी आणि …

Read More »