Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

मनसे अध्यक्ष राजेश तरे यांनी मुरूड आगारातील एसटी कर्मचार्यांची घेतली भेट

मुरूड : प्रतिनिधी राज्य शासनाच्या सेवेत समाविष्ट करावे, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील सर्व एसटी कर्मचारी संपावर गेले असून, गुरुवारी पाचव्या दिवशीही त्याचा संप सुरूच आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण परिवहन कर्मचारी सेनेचे अध्यक्ष राजेश ग. तरे यांनी शुक्रवारी आपल्या सहकार्‍यांसमवेत मुरूड आगारातील संपकरी कर्मचार्‍यांची  भेट घेऊन त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला. …

Read More »

केंद्राप्रमाणे राज्यानेही पेट्रोल, डिझेलवरील कर कमी करावेत

महाड भाजपची मागणी, तहसीलदारांना निवेदन सादर महाड : प्रतिनिधी वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने एक पाऊल पुढ टाकत पेट्रोल, डिझेलवरील करांमध्ये सुट दिली असून आता राज्य सरकारनेसुध्दा कर कमी करावेत, अशी मागणी महाड भाजपच्या वतीने शुक्रवारी (दि. 12) करण्यात आली. वाढत्या किमतीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने उत्पादन शुल्क कमी …

Read More »

द्रुतगती मार्गावर कारच्या धडकेत वृद्ध महिला जखमी

खोपोली : प्रतिनिधी नातीला उलटी झाली म्हणून तिचे डोके धरून उभ्या असलेल्या अश्विनी अशोक कदम (वय 64, रा. कुलाबा मुंबई) यांना पाठीमागून आलेल्या कारची जोरदार धडक बसली. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर झालेल्या या अपघातात अश्विनी कदम गंभीर जखमी झाल्या आहेत. द्रुतगती मार्गावरून प्रवास करीत असताना अश्विनी कदम यांच्या नातीला मळमळ झाल्यासारखे …

Read More »

पेणमध्ये गणेशमूर्तींचे राज्यस्तरीय प्रदर्शन

पेण : प्रतिनिधी येथील कुंभार आळीतील गणेशमूर्ती कारखानदार आणि श्री गणेश मित्र मंडळाच्या वतीने 13 आणि 14 नोव्हेंबर रोजी पेणमधील शासकीय क्रीडा संकुलच्या सभागृहात राज्यस्तरीय गणेशमूर्ती प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. राज्यातील निवडक शंभर मूर्तिकारांना या प्रदर्शनात आपल्या मूर्तीचे सादरीकरण करण्याची देण्यात आली आहे.  सुप्रसिद्ध मूर्तिकार विशाल शिंदे आणि करण …

Read More »

मुरूडचे प्रभारी बीडीओ सुभाष वाणी यांनी पदभार स्वीकारला

मुरूड : प्रतिनिधी येथील ग्रामपंचायत विस्तार अधिकारी सुभाष वाणी यांनी गुरुवारी (दि. 11) मुरूडच्या गट विकास अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला. या वेळी पंचायत समितीच्या सर्व कर्मचार्‍यांनी सुभाष वाणी यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. मुरूडचे गटविकास अधिकारी अनिकेत पाटील हे एक महिन्याच्या सुट्टीवर गेल्याने त्या पदाचा कार्यभार ग्रामपंचायत विस्तार अधिकारी …

Read More »

प्रवाशांची लूट थांबवण्यासाठी प्रशासन सरसावले

अलिबाग : प्रतिनिधी एसटी कर्मचार्‍यांच्या संप काळात खाजगी वाहनचालक प्रवाशांकडून भरमसाठ भाडे आकारत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. प्रवाशांची गैरसोय आणि लूट थांबवण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. एसटी, आरटीओ आणि पोलीस यांची पथके तयार करण्यात आली आहेत. ही पथके प्रवासी उचलण्याच्या महत्वाच्या ठिकाणी गस्त घालून खाजगी वाहतुकीवर नजर ठेवून आहेत. …

Read More »

भाजप किसान मोर्चा कर्जत तालुका अध्यक्षपदी शिरीष कदम

कर्जत : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष किसान मोर्चा कर्जत तालुक्याची कार्यकारिणी जाहीर झाली आहे. या नवनियुक्त पदाधिकार्‍यांचा नियुक्तीपत्र प्रदान कार्यक्रम गुरुवारी (दि. 11) झाला. या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र प्रदान करून पुढील यशस्वी वाटचालीकरिता सदिच्छा दिल्या.भाजप किसान मोर्चाच्या कर्जत तालुका अध्यक्षपदी शिरीष कदम, …

Read More »

शेतकर्यांचे भात हमीभावाने खरेदी करा

भाजप किसान मोर्चाची मागणी; कर्जत तहसीलदारांना निवेदन कर्जत : रामप्रहर वृत्त कर्जत तालुक्यातील शेतकर्‍यांचे भात हमीभावाने खरेदी केंद्रावर खरेदी करा, अशी मागणी भाजप किसान मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात कर्जत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. शेतकर्‍यांचे भात हमीभावाने कर्जत तालुक्यातील अनेक केंद्रावर खरेदी केली जाते. परंतु अनेक शेतकर्‍यांनी तकार …

Read More »

कर्जतमध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिर

आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती कर्जत : रामप्रहर वृत्त आर झुनझुंनवाला व लोटस फाऊंडेशन, कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शास्त्रक्रिया आणि चष्मे वाटप गुरुवारी (दि. 11) आयोजित करण्यात आले होते.  भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. कर्जत तालुक्यातील किरवली …

Read More »

संगीत मैफिलीने अलिबागकर मंत्रमुग्ध

अलिबाग ़: प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष दक्षिण रायगड जिल्हा आणि सांस्कृतिक विभाग यांच्यातर्फे आयोजित दीपसंध्या या  कार्यक्रमात बुधवारी (दि. 10) सायंकाळी उदयोन्मुख गायक ओमकार प्रभुघाटे आणि कल्याणी शेट्ये यांनी  गाणी सादर करून अलिबागकर रसिकांना मंत्रमुग्ध केले. अलिबाग येथील भाजप मुख्यालयासमोर या संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. त्याला अलिबागकर रसिकांनी …

Read More »