पाली : प्रतिनिधी कोरोना काळात शाळा, महाविद्यालये बंद होती, ऑक्टोबर महिन्यापासून पाचवीपासून पुढील इयत्तांच्या शाळा नियमित सुरू झाल्या खर्या, मात्र एसटी संपाने विद्यार्थ्यांच्या अध्ययनाला ब्रेक लागला आहे. शासनाच्या सेवेत समाविष्ट करून घ्यावे, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांना अनेक समस्या व अडचणींना सामोरे जावे …
Read More »रायगडात ‘अवकाळी’
पिकांचे नुकसान, बळीराजा हवालदिल अलिबाग ः प्रतिनिधीअवकाळी पावसाने ऐन दिवाळीत थैमान घातल्यानंतर पुन्हा बारा दिवसांनी डरकाळी फोडीत जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत नासाडी केली. हातात आलेले भाताचे पीक पुन्हा पावसाने ओले केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने भातशेतीचे पीकही उत्तम तयार झाले. ऐन पावसाळ्यात पुरात शेती अडचणीत आली तरीदेखील …
Read More »खालापुरातील भात खरेदी केंद्र बंद; भाजपचा आंदोलनाचा इशारा
खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील भात खरेदी केंद्र अद्याप सुरू झाले नसून, प्रशासनदेखील त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. तालुक्यात दोन दिवसांत हमीभाव भात खरेदी केंद्र सुरू करावे, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा भारतीय जनता पक्षाने बुधवारी (दि. 17) खालापूर तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिला आहे. साधारणपणे शासनाचे भात खरेदी केंद्र 1 ऑक्टोबरला …
Read More »आपल्याच जागांबाबत राजिप अनभिज्ञ
सर्वसाधारण सभेत धक्कादायक कबुली; सदस्य हैराण अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्हा परिषदेच्या मालकीच्या किती जागा आहेत याची माहिती खुद्द जिल्हा परिषदेकडेच नसल्याची धक्कादायक माहिती बुधवारी (दि. 17) सर्वसाधारण सभेत समोर आली. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.रायगड जि. प.ची सर्वसाधारण सभा बुधवारी ‘शिवतीर्थ’मधील कै. ना. ना. पाटील सभागृहात झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी जि. …
Read More »अलिबागच्या लायन्स हेल्थ फाउंडेशनचा नेत्ररोगाविरुद्ध लढा; सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे सोगावमध्ये भूमिपूजन
अलिबाग : प्रतिनिधी लायन्स हेल्थ फाउंडेशन अलिबागने मोतीबिंदू आणि नेत्ररोगांविरुद्ध जो लढा उभारला आहे, तो अभूतपर्व आहे. रायगड जिल्ह्याच्या कानाकोपर्यातील 65 हजार लोकांची नेत्रतपासणी, सहा हजार नेत्रशस्त्रक्रिया, त्यातील 4500 मोफत नेत्रशस्त्रक्रिया, महात्मा फुले जन आरोग्य योजना, पंतप्रधान जन आरोग्य योजना हा लायन्स हेल्थ फाउंडेशनचा चार वर्षांतील आलेख कौतुकास्पद आणि अभिमानास्पद …
Read More »क्षयरोग शोधमोहिमेस सहकार्य करावे; जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुरेश देवकर यांचे आवाहन
अलिबाग : जिमाका क्षयरोग्यांना शोधण्यासाठी आरोग्य विभागाने रायगड जिल्ह्यात विशेष सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम हाती घेतली असून, नागरिकांनी या मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुरेश देवकर यांनी जिल्हा क्षयरोग कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केले. रायगड जिल्ह्यात जानेवारी ते 31 ऑक्टोबर 2021 अखेर दोन हजार 794 क्षयरुग्ण …
Read More »रायवाडीत रास्ता रोको आंदोलन; अलिबाग-मुरूड रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी
रेवदंडा : प्रतिनिधी अलिबाग व मुरूड मुख्य रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते दिलीप जोग यांनी या रस्त्यावरील रायवाडी येथे रास्ता रोकोचे आंदोलन केले. जागोजागी खड्डे पडून अलिबाग-मुरूड या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याची दुरुस्ती करावी, यासाठी दिलिप जोग यांनी 12 एप्रिल 2021 रोजी रास्ता रोको आंदोलनाचा …
Read More »राज्यस्तरीय गणेशमूर्ती स्पर्धेत पेणच्या मृगज कुंभार यांची मूर्ती ठरली सरस
पेण : प्रतिनिधी येथील श्री गणेश मित्र मंडळ आणि गणपती कारखानदार यांच्या संयुक्त विद्यमाने पेणमध्ये राज्यस्तरीय गणेशमूर्तींचे प्रदर्शन आणि स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये पेण तालुक्यातील मूर्तिकार मृगज कुंभार या मूर्तिकाराने प्रथम क्रमांक पटकावला. तर नितीन पेडणेकर (पेण) याने द्वितीय आणि आकाश लिहे (ठाणे) यांनी तृतीय क्रमांक पटकविला. …
Read More »डोलकाठीचा गरूडध्वज ढाक डोंगरावरून आणला; कर्जत देऊळवाडीची यात्रा यंदाही रद्द, भैरीनाथाचे दर्शन मिळणार
कर्जत : प्रतिनिधी देऊळवाडी किरवली येथील कार्तिक पौर्णिमेच्या उत्सवासाठी परंपरेनुसार डोलकाठीच्या टोकाला बांधण्यासाठी ढाक डोंगरावरील भैरी मंदिरातून गरुडध्वज आणला, मात्र यंदाही कोरोनाच्या संकटामुळे कार्तिक पौर्णिमेची यात्रा रद्द करण्यात आली असून, भाविकांना सर्व शासकीय नियम पाळून दर्शन घेता येणार आहे. सकाळी गरुडध्वजाची पूजा ज्येष्ठ वारकरी नारायण बडेकर यांच्या हस्ते मंदिरात करण्यात …
Read More »शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या राज्याध्यक्षपदी राजेश सुर्वेंची फेरनिवड; नाशिकच्या अधिवेशनात नवीन कार्यकारिणी जाहीर
अलिबाग : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग या शिक्षक संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष राजेश सुर्वे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. नाशिक येथे झालेल्या अधिवेशनात नवीन कार्यकारिणी जाहीर झाली. सन 2018मध्ये या संघटनेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. त्या वेळी राजेश सुर्वे यांच्या खांद्यावर संघटनेची धुरा सोपवण्यात आली होती. तीन …
Read More »