Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

प्रतीक जुईकर बनला रायगडातील पहिला थेट आयएएस अधिकारी

कर्जत ः बातमीदारकर्जत येथील प्रतिक चंद्रशेखर जुईकर याने रायगड जिल्ह्यातील पहिला थेट आयएएस अधिकारी होण्याचा मान मिळवला आहे. प्रतिकने केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) परीक्षा उत्तीर्ण होत मुलाखतीचा अडथळाही पार केला आहे. या यशानंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.प्रतिक जुईकर हा मूळचा अलिबाग तालुक्यातील शहाबाज चौकीचा पाडा येथील राहणारा आहे. कर्जत …

Read More »

रायगड जिल्ह्यात गौरा गणपतींचे आगमन

अलिबाग : प्रतिनिधी राज्यात अनंतचतुर्दशीला गणेशोत्सवाची सांगता झाली असली तरी रायगड जिल्ह्यात शुक्रवारी (दि. 24)   साखर चौथीच्या म्हणजेच गौरा गणपतींचे आगमन झाले.   दीड दिवसांच्या मुक्कामानंतर शनिवारी (दि. 25) या गणपतीना निरोप दिला जाईल. गौरा गणपातीची प्रथा फक्त रायगड जिल्ह्यातच आहे. रायगड जिल्ह्याच्या उत्तर भागात हा साखरचौथ   गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा …

Read More »

खालापूर विभागीय पोलीस अधीक्षक कार्यालयात कोरोनाचा शिरकाव

खालापूर : प्रतिनिधी खोपोली, खालापुरातील कोरोना रुग्णसंख्या शून्यावर आली असतानाच गुरुवारी (दि. 23) कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणार्‍या खालापूर उपविभाग पोलीस कार्यालयात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने हे कार्यालय बंद करण्यात आले. मात्र त्याची अधिकृत माहिती मिळवण्यासाठी कार्यालयात दूरध्वनी केला असता संपर्क होऊ शकला नाही.  खाजगी लॅबमध्ये केलेल्या तपासणीत बुधवारी खालापूर विभागीय …

Read More »

चाकूचा धाक दाखवून चोरी करणार्यास कर्जतमध्ये बेड्या

कर्जत : प्रतिनिधी चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम, पॅनकार्ड, एटीएम कार्ड असा ऐवज बळजबरीने चोरणार्‍या चोराला कर्जत पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अधिक तपासात त्याच्यावर कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात सहा गुन्हे नोंद असल्याची माहिती उघडकीस आली आहे. कर्जत भिसेगाव येथील संतोष अरुण भोसले (वय 40) हे पहाटे नोकरीनिमित्त मुंबईकडे जात असताना  …

Read More »

विजय इस्टेटविरोधात गुन्हा दाखल

1200 सदनिकाधारकांच्या फसवणुकीचा आरोप कर्जत : बातमीदार तालुक्यातील वाकस येथे 100 एकर जमिनीवर उभ्या राहत असलेल्या विजय इस्टेट या गृहसंकुलात सदनिका बुक करणार्‍या शेकडो ग्राहकांची फसवणूक झाली आहे.त्यातील काही ग्राहकांनी तक्रार दिल्यानंतर नेरळ पोलीस ठाण्यात विजय इस्टेट ग्रुपचे मालक अतीव गाला यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.  कर्जत तालुक्यातील वाकस …

Read More »

रोह्यातील चिंचवली शाळेत भरले रानभाज्यांचे प्रदर्शन

रोहे : प्रतिनिधी राष्ट्रीय पोषण आहार महासप्ताहानिमित्त रोहा तालुक्यातील चिंचवली तर्फे आतोणे येथील प्राथमिक शाळेत शुक्रवारी (दि. 24) रानभाज्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. चिंचवली आदिवासीवाडीतील मुलांनी पालकांसोबत जंगलात जाऊन रानभाज्या आणल्या व या प्रदर्शनात सहभाग नोंदवला होता. या प्रदर्शनात तेरी, अळू, माट, लाल माट, कोहळ, टाकळा, भवरीचे पाने, कुरडू आदी …

Read More »

सुधागडातील वावळोलीत ग्रामसफाई मोहीम

ग्रामस्थांनी घेतली स्वच्छतेची प्रतिज्ञा पाली : प्रतिनिधी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सिद्धेश्वर (ता. सुधागड) ग्रामपंचायत हद्दीतील वावळोली येथे ग्रामसफाई मोहीम राबविण्यात आली. या वेळी उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांनी स्वच्छतेची प्रतिज्ञा घेतली. पंचायत समिती सुधागड, ग्रामपंचायत सिद्धेश्वर, प्राइड इंडिया व सुकन्या ग्रामसंघ यांच्या संयुक्तवतीने ही ग्रामसफाई मोहीम राबविण्यात आली. या वेळी …

Read More »

रोह्यात महिला बचत गटांना मार्गदर्शन

धाटाव : प्रतिनिधी रोहा तालुक्यातील रोठ ब्रुदुक ग्रामपंचायत आणि बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने रोठ ब्रुदुक गावातील महिला बचत गटांसाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. बँकेचे शाखा व्यवस्थापक चित्तरंजन कुमार यांनी या शिबिरात विविध योजनांची माहिती दिली. रोठ ब्रुदुक गावातील बचत गटांच्या महिला प्रतिनिधी या शिबिरात सहभागी झाल्या …

Read More »

युनिसेफ, सीएसीआर संस्थांची पूरग्रस्तांना मदत

माणगाव : प्रतिनिधी युनिसेफ आणि सीएसीआर या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने महाड तालुक्यातील काळीज आदिवासीवाडीमधील पूरबाधित कुटुंबांना नुकताच हायजिन किट आणि ताडपत्रीचे वाटप करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांनाही शालोपयोगी साहित्य देण्यात आले.  बॅक टू होम ही संकल्पना घेऊन युनिसेफ आणि सीएसीआर या संस्थांनी महाड आणि पोलादपूर तालुक्यातील पूरग्रस्तांसाठी पुन्हा एकदा मदतकार्य …

Read More »

रायगड जिल्ह्यात वाहनविक्रीत घट

अलिबाग : प्रतिनिधी करोनाचा प्रादूर्भाव आणि टाळेबंदी याचा फटका रायगडातील वाहन विक्री व्यवसायाला बसला आहे. जिल्ह्यात गेल्या दिड वर्षात वाहन विक्रीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे वाहन विक्रीतून जमा होणार्‍या महसुलातही  घट झाली आहे. रायगड जिल्ह्यात पेण उपप्रादेशिक परिवहन कार्यालया अंतर्गत वाहनांची नोंदणी केली जाते. दरवर्षी साधारणपणे 27 ते 28 …

Read More »