माती भरावाऐवजी पूल उभारण्याची ग्रामस्थांची मागणी महाड : प्रतिनिधी किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणीवाडी परिसरातील जमिनीला 2005पासून सातत्याने भेगा पडत आहेत. पावसाळ्यात या परिसरात दरड कोसळण्याचा तसेच संपूर्ण हिरकणीवाडीच जगाच्या नकाशावरुन गायब होण्याचा धोका असतो. रायगड रोप वेकडे जाणार्या रस्त्यावर गेल्या काही वर्षापासून पडलेल्या भेगा आजदेखील वाढत असल्याचा अनुभव स्थानिक …
Read More »पालीत माघी गणेशोत्सवाला प्रारंभ
यात्रेसह विविध उपक्रम रद्द पाली : प्रतिनिधी अष्टविनायकांपैकी पाली (ता. सुधागड) येथील बल्लाळेश्वर देवस्थानच्या माघी गणेशोत्सवाला शुक्रवार (दि. 12) पासून सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन नियम व अटी शर्थीचे पालन करून उत्सव साजरा होत आहे. येत्या सोमवारी (दि. 15) माघी गणेशोत्सव असून, पालीतील बल्लाळेश्वर देवस्थानच्या जन्मोत्सवाला शुक्रवारपासून सुरूवात झाली …
Read More »समुद्रात प्लास्टिक टाकण्याचा डाव फसला
बंदर निरीक्षकांकडून बोटमालकाला तंबी; कचर्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे निर्देश मुरूड : प्रतिनिधी मच्छिमारी करताना जाळ्यात अडकलेला प्लास्टिक कचरा राजपुरी येथील एका बोटीतून खोल समुद्रात टाकण्याचा प्रयत्न आगरदांडा जेट्टी परिसरात सुरू होता. मात्र स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे व मेरी टाइम बोर्डाचे बंदर निरीक्षक यशोधन कुलकर्णी यांनी वेळीच दखल घेतल्याने प्लास्टिक कचरा समुद्रात …
Read More »पावसाळी पाणी जाण्याचा मार्ग अडवणारी मोरी काढून टाकावी; मुरूड मनसेकडून थेट मुख्यमंत्र्यांना निवेदन
मुरुड : प्रतिनिधी स्थानिक नागरिकांना विचारात न घेता मुरूड नगर परिषदेने शहरातील शेगवाडा परिसरात चुकीच्या पद्दतीने मोरी बांधली आहे. त्यामुळे पाणी वाहून जाण्याचा नैसर्गिक मार्ग बंद झाला असून पावसाळ्यात घरात पाणी घुसून येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकरणी लक्ष घालून शहरातील लोकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी …
Read More »पाणीपुरवठा सुरळीत करावा
रोहा प्रांताधिकार्यांची एमआयडीसी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला सूचना रोहे : प्रतिनिधी तालुक्यातील 26गाव पाणी पुरवठा योजनेतून सुरळीत पाणी पुरवठा व्हावा, यासाठी संबंधीत गावांतील ग्रामस्थांनी शासनाकडे निवेदन दिले आहे. या अनुषंगाने रोहा प्रांत अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी गुरुवारी (दि. 11) प्रांत कार्यालयात एमआयडीसी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पंचायत समिती यांचे अधिकारी व …
Read More »बीएसएनएलला साडेतीन लाखांचा दंड
नेरळ-कळंब रस्त्याच्या साइडपट्टी खोदकामप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाची कारवाई कर्जत : बातमीदार तालुक्यातील माथेरान-नेरळ-कळंब या रस्त्यालगतची साईडपट्टी खोदून बीएसएनएलची केबल टाकली जात आहे. या रस्त्याची मालकी असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने विनापरवाना खोदकाम केल्या प्रकरणी बीएसएनएलला साडे तीन लाखाचा दंड आकारला आहे. माथेरान-कळंब राज्यमार्गावरील नेरळ-कळंब भागात रस्त्याच्या बाजूने बीएसएनएलची केबल टाकण्यासाठी साइडपट्टी …
Read More »दक्षता देसाई ‘टीन इंडिया महाराष्ट्र’ची मानकरी
अलिबाग येथेरंगला सोहळा अलिबाग ः प्रतिनिधीयंदाची मिस टीन इंडिया महाराष्ट्र सौंदर्य स्पर्धा गुरुवारी (दि. 11) सायंकाळी अलिबाग येथे पार पडली. या वेळी गुणवत्तेच्या जोरावर दक्षता देसाई यंदाची ‘टीन इंडिया महाराष्ट्र’ची मानकरी ठरली आहे. आता ती टीन इंडिया स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करेल. नेहा पाटील उपविजेती, तर तनिशा चौगुलेने तृतीय क्रमांकाचा बहुमान …
Read More »छबिनोत्सव आणि शिवजयंतीस बिनशर्त परवानगी द्या!
महाड भाजपची मागणी महाड ः प्रतिनिधीमहाडचे आराध्यदैवत श्री विरेश्वर महाराज यांचा छबिनोत्सव आणि देशाचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंती तसेच गावागावांतील सर्व धार्मिक कार्यक्रमांना बिनशर्त परवानगी द्यावी, अशी मागणी महाड भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत शुक्रवारी (दि. 12) तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.महाडचे आराध्यदैवत श्री विरेश्वर महाराज यांचा छबिनोत्सव …
Read More »मुरूडमधील शिबिरात 64 जणांचे रक्तदान
मुरुड : प्रतिनिधी रक्तदान ही सामाजिक चळवळ बनल्यास रक्तदात्यांमध्ये वृद्धी होईल. गरजवंतांना सहजपणे रक्त उपलब्ध होऊन त्यांचे प्राण वाचू शकतील, असे प्रतिपादन नगराध्यक्ष स्नेहा पाटील यांनी येथे केले. पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या वाढदिवसानिमित्त येथील संजिविनी आरोग्य सेवा संस्थेने शुक्रवारी (दि.12) संस्थेच्या कार्यालयात रक्तदान शिबिर आयोजित केले होते, त्यात नगराध्यक्ष …
Read More »कर्जत वाकसच्या उपसरपंचपदी भाजपच्या रंजना भागीत
कर्जत : बातमीदार तालुक्यातील वाकस ग्रुपग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदावर भारतीय जनता पक्षाच्या रंजना विठ्ठल भागीत यांची बिनविरोध निवड झाली आहे. नेरळ जवळील वाकस ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच असलेल्या जगे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी सरपंच सुलक्षणा संजय तांबोळी यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. त्यावेळी उपसरपंच पदासाठी भारतीय …
Read More »