Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

मुरूडमधील शिबिरात 64 जणांचे रक्तदान

मुरुड : प्रतिनिधी रक्तदान ही सामाजिक चळवळ बनल्यास रक्तदात्यांमध्ये वृद्धी होईल. गरजवंतांना सहजपणे रक्त उपलब्ध होऊन त्यांचे प्राण वाचू शकतील, असे प्रतिपादन नगराध्यक्ष स्नेहा पाटील यांनी येथे केले. पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या वाढदिवसानिमित्त येथील संजिविनी आरोग्य सेवा संस्थेने शुक्रवारी (दि.12) संस्थेच्या कार्यालयात रक्तदान शिबिर आयोजित केले होते, त्यात नगराध्यक्ष …

Read More »

कर्जत वाकसच्या उपसरपंचपदी भाजपच्या रंजना भागीत

कर्जत : बातमीदार तालुक्यातील वाकस ग्रुपग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदावर भारतीय जनता पक्षाच्या रंजना विठ्ठल भागीत यांची बिनविरोध निवड झाली आहे. नेरळ जवळील वाकस ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच असलेल्या जगे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी सरपंच सुलक्षणा संजय तांबोळी यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. त्यावेळी उपसरपंच पदासाठी भारतीय …

Read More »

फळसगाव-पाचाड रस्ता रुंदीकरणात शेतजमिनींचे नुकसान

नुकसानभरपाईच्या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष महाड : प्रतिनिधी माणगाव तालुक्यातील निजामपूर ते किल्ले रायगड या मार्गाचे रुंदीकरण सुरु करण्यात आले असून, या रुंदीकरणात ज्यांच्य जमिनी गेल्या आहेत, त्या शेतकर्‍यांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे. मात्र या मागणीकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. किल्ले रायगडाकडे येण्यासाठी माणगाव तालुक्यातील निजामपूर येथून पाचाड आणि पुढे …

Read More »

वीज वितरण कंपनीने तोडली सिद्धेश्वर, खांडसई शाळांची वीज

पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील सिद्धेश्वर (बुद्रुक) ग्रामपंचायतीने  वीज बिल भरण्यासाठी मुदतवाढ मिळण्याची लेखी विनंती करूनही महावितरणने ग्रामपंचायत हद्दीतील सिद्धेश्वर आणि खांडसई गावातील मराठी शाळांची वीज जोडण्या तोडण्याची तत्परता दाखविली. कोरोनाच्या संकटात सर्वसामान्यांचे अर्थचक्र कोलमडून पडले आहे. मात्र महावितरणच्या वाढीव वीजबिलांनी ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे. सध्या वीज देयके न दिलेल्यांचे …

Read More »

खांबेरे ग्रामपंचायतीच्या वतीने महिलांसाठी कार्यशाळा

रोहे : प्रतिनिधी तालुक्यातील खांबेरे ग्रामपंचायतीच्या वतीने 15 वा वित्त आयोगाच्या माध्यमातून आयोजित केलेल्या मोफत व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळेला ग्रामपंचायत हद्दीतील महिला व युवतींनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. खांबेरे ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या या  व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळेत इंटिमेशन दागिने बनविणे, ब्रॉचेस तयार करणे याचे प्रशिक्षण देण्यात आले. सरपंच गिता वारगुडे, उपसरपंच जयश्री …

Read More »

वीज केबलसाठी रस्त्याची साइडपट्टी खोदली

पोशीर ग्रामस्थांनी काम पाडले बंद; पुन्हा काम सुरू केल्यास आंदोलन कर्जत : बातमीदार नेरळ – कळंब रस्त्याची साईडपट्टी खोदून तीव्र क्षमते (22केव्ही)ची भूमिगत विद्युत वहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून तेथे कोणत्याही उपाययोजना करण्यात येत नसल्यामुळे पोशीर ग्रामस्थांनी  हे काम बंद पाडले आहे. स्थानिक ग्रामस्थांनी आतापर्यंत किमान 20वेळा …

Read More »

मत्स्य पर्यटनवाढीसाठी मत्स्य व्यवसाय विभागाची पावले

परदेशी धर्तीवर समुद्रकिनारी सुरू करणार वाहनातून फूड स्टॉल अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात समुद्र, धार्मिक, ऐतिहासिक पर्यटनात वाढ होत असताना आता मत्स्य पर्यटनालाही वाव देण्यासाठी मत्स्य व्यवसाय विकास विभागाने पावले उचलली आहेत. जिल्ह्यात येणारा पर्यटक हा निसर्गाचा आनंद घेत असताना येथील ताज्या मासळीवरही चांगलाच ताव मारत असतो. मत्स्य विभागाने मत्स्य …

Read More »

मच्छीमारांना डिझेल परतावा देण्याबाबत दुर्लक्ष!

अवकाळी पाऊस व वादळी वार्‍यामुळे स्थानिक मच्छिमार हैराण असतानाच सध्या त्यांना मासळीच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. मच्छिमारांना   किमान सात दिवस खोल समुद्रात जाऊन मच्छिमारी करावी लागते, या कालावधीसाठी बोटींवर असणार्‍या कामगारांना मजुरी देणे, बर्फाचा साठा करणे, डिझेल, बोटींवर सात दिवसाचे अन्नधान्य, किराणा माल, रॉकेल आदी स्वरूपाच्या गोष्टींची पूर्तता करण्यासाठी …

Read More »

महावितरणने वीज जोडण्या तोडल्याने कर्जत-कळंब भागातील आदिवासीवाड्या अंधारात

कर्जत : बातमीदार थकीत वीज बिल न भरल्याने कर्जत तालुक्यातील कळंब ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील तीन आदिवासी वाड्यांमधील  45घरांच्या वीज जोडण्या तोडण्यात आल्या आहेत. या कारवाईचा निषेध करून, सर्व आदिवासींच्या वीज जोडण्या त्वरित पुर्ववत कराव्यात, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू, असा इशारा कळंब भागातील कार्यकर्ते शिवराम बदे यांनी महावितरणला दिला आहे. कळंब …

Read More »

पाटणेश्वर देवस्थानच्या विकासासाठी कटिबद्ध भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांची ग्वाही

पेण : प्रतिनिधी  श्री क्षेत्र पाटणेश्वर देवस्थानासाठी काम करू तेवढे कमीच आहे. त्यामुळे पाटणेश्वर क्षेत्राचा विकास या पुढेही मोठ्या प्रमाणात करणार आहोत. येथील रस्त्याचे  काम आणि तलाव सुशोभीकरणासाठी आमदार निधीचा वापर करणार असल्याचे प्रतिपादन भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी येथे केले. पेण तालुक्यातील पाटणेश्वर येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ वैकुंठ …

Read More »