Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

रोहा धाटाव परिसरात रात्रीच्या वेळी वीज गायब

महावितरणचा अजब कारभार धाटाव : प्रतिनिधी रोहा तालुक्यातील धाटाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी वीज गायब होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. महावितरणने या भागात अखंडित वीजपुरवठा करावा, अशी मागणी ग्राहकांमधून केली जात आहे. महावितरणने आधीच वाढीव वीज बिले  देऊन सामान्य ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे. बिले भरूनदेखील वारंवार वीजपुरवठा …

Read More »

पोलादपुरात खवल्या मांजरांच्या तस्करीप्रकरणी त्रिकुट जेरबंद

वनविभागाची कारवाई पोलादपूर : प्रतिनिधीमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटात वनविभागाने सोमवारी (दि. 8) एका रिक्षेवर छापा टाकून खवल्या मांजरांची तस्करी उधळून लावली. या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.चिपळूण तालुक्यातून एका रिक्षेमधून वन्यजीवांची तस्करी केली जात असल्याची खबर वनविभागाचे रोहे सहाय्यक वनसंरक्षक विश्वजित …

Read More »

रोह्यातील अनंत मगर यांचा कलिंगड शेतीच्या उत्पादनातून शेतकर्‍यांपुढे आदर्श

रोहे : प्रतिनिधी तालुक्यातील वाशी येथील अनंत मगर यांनी कलिंगड  पिकातून लाखोंचे उत्पादन काढुन तरुण शेतकर्‍यांपुढे आदर्श ठेवला आहे. गेल्या चाळीस वर्षांपासून अनंत मगर कलिंगडाचे उत्पादन घेत आहेत. त्यांची स्वत:ची फार थोडी शेती आहे. त्यांनी धाटाव औद्योगिक क्षेत्राच्या बाजूच्या महादेववाडी येथील चाळीस एकर जमीन भाडेतत्त्वावर घेवून, तिथे   विग्रो गोल्डन जातीच्या …

Read More »

समाधान सामाजिक संस्थेकडून किल्ले रायगड स्वच्छता मोहीम

महाड : प्रतिनिधी शहरातल्या समाधान सामाजिक संस्थेने नुकतीच रायगड किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबविली. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी गडावरील होळीचा माळ, बाजारपेठ, राजसदर, जगदिश्वर मंदिर परिसरातील कचरा गोळा करून त्याची योग्या पद्दतीने विल्हेवाट लावली. या मोहिमेत संस्थेचे सुयोग निकम, जयंत कदम, भारत वडके, मंगेश सुकूम, गणेश महांगरे, संजय राहिलकर, सचिन सुतार, राजेंद्र पांचाळ, …

Read More »

पोलादपूरमध्ये आरोग्य कर्मचार्यांचे लसीकरण; कोरोना योद्धा डॉ. राजेश शिंदे पहिले मानकरी

पोलादपूर : प्रतिनिधी लॉकडाऊन काळात केलेल्या सेवेनंतर आता पोलादपूर तालुक्यातील आरोग्य कर्मचार्‍यांना प्राधान्याने कोविशिल्ड लसीकरण करण्यात येणार असून, येथील ग्रामीण रूग्णालयामध्ये मंगळवारी (दि. 9) सकाळी आयुषचे डॉ. राजेश शिंदे यांना पहिली लस देण्यात आली. पहिल्या टप्प्यात पोलादपूर तालुक्यातील सुमारे 203 जणांना कोविशिल्ड लस देण्यात येणार असून, त्यात   डॉक्टर, आरोग्य कर्मचारी …

Read More »

पेणमध्ये सात ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आज निवडणूक

पेण : प्रतिनिधी तालुक्यातील सात ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी बुधवारी (दि. 10) संबंधीत ग्रामपंचायत कार्यालयात नेमणूक केलेल्या पीठासन अधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली  निवडणूक घेण्यात येणार आहे.  पेण तहसीलदार डॉ. अरुणा जाधव यांनी महेंद्र पाटील (आंबेघर), प्रकाश मोकल (कामार्ली), राकेश कलमकर (वाक्रुळ), निनाद पाध्ये (काळेश्री), दत्तात्रेय साळुंखे (बोर्झे), रत्नाकर सूर्यवंशी (जोहे) आणि दादासाहेब सोनावणे …

Read More »

कर्नाटक वितरण व्यवस्थेतील गहू-तांदूळ सुधागडमध्ये जप्त

पाली : रामप्रहर वृत्त सुधागड तालुक्यातील बलाप येथील न्यू. डी. जी. फूड ऍग्रो कंपनी या राईसमिलमध्ये कर्नाटक राज्याच्या वितरण व्यवस्थेतील गहू व तांदूळ सापडले आहेत. पुरवठा विभागाने टाकलेल्या छाप्यात सुमारे 43लाख 97हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पाली पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. 8) गुन्हा दाखल करण्यात …

Read More »

माणगावात गावठी शेंगा वधारल्या; वाल 100 ते 120 रु., मूग 80 रु., चवळी 80 रु. किलो

माणगाव : प्रतिनिधी लांबलेला व अवकाळी पाऊस यामुळे माणगाव तालुक्यात रब्बी हंगामातील विविध कडधान्ये तयार होण्यास उशीर झाला आहे.  पंधरा ते वीस दिवस उशिराने बाजारात दाखल झालेल्या वाल, मूग, चवळी इत्यादी शेंगाची विक्री सध्या माणगावच्या बाजारात जोरदारपणे होत आहे. माणगाव तालुक्यात रब्बी हंगामात वाल, मूग, चवळी इत्यादी कडधान्यांची मोठ्या प्रमाणात …

Read More »

माणगावात मच्छी मार्केटचा प्रश्न गंभीर; अतिक्रमण हटवल्याने विक्रेते उघड्यावर

माणगाव : प्रतिनिधी  नगरपंचायत स्थापन होऊन पाच वर्षे लोटली, तरीही नगरपंचायतीने मच्छी मार्केट उभारले नाही. वास्तविक नगर पंचायतीच्या जागेत स्वतंत्र मच्छी मार्केट उभारण्याची गरज होती. माणगावात यापूर्वी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत मच्छी विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली होती. मात्र कोणतीही परवानगी न घेता उभारलेली त्यांची अतिक्रमणे महामार्ग प्राधिकरण अधिकार्‍यांनी शनिवारी (दि. 6) …

Read More »

शिवसेनेतील गळचेपीमुळे भाजपमध्ये प्रवेश केला; रवी मुंढे यांचा घणाघात

माणगाव : प्रतिनिधी शिवसेनेत मी जन्म घेतला. माझ्या कार्यकर्तृत्वाने शिवसैनिकांच्या मनात रुजलो. सर्व जाती-धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन काम केले असल्याने मला मानणारा मोठा वर्ग आहे, मात्र रायगड जिल्ह्यातील शिवसेनेच्या स्वार्थी नेत्यांमुळे माझी या पक्षात गळचेपी झाली. म्हणूनच मी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, असा आरोप शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख आणि तळा …

Read More »