Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

रायगडातील आंबा विक्रेत्यांची आज अलिबागमध्ये नोंदणी

अलिबाग : प्रातिनिधी हापूस आंब्याला भौगोलिक मानांकन मिळाले आहे. सर्व हापूस आंबा उत्पादक व विक्रेते यांनी त्याची नोंदणी करणे आवश्यक आहे. या नोंदणीकरिता रायगड जिल्ह्यातील आंबा उत्पादकांना आता रत्नागिरी येथे जाण्याची गरज नाही. रायगड जिल्ह्यातील आंबा उत्पादकांची नोंदणी मंगळवारी (दि. 9) अलिबाग येथे होणार आहे. रायगड जिल्ह्यातील शेतकर्‍यांना संबंधित नोंदणी …

Read More »

श्रीवर्धन-दिघी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

श्रीवर्धन : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील एक महत्वाचे पर्यटनस्थळ असल्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येन श्रीवर्धन तालुक्यामध्ये फिरण्यासाठी येत असतात. मात्र श्रीवर्धन-शेखाडी- भरटखोल- दिघी या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. श्रीवर्धन तालुक्यातील या प्रमुख रस्त्यावरून प्रवास करताना रस्त्यामध्ये खड्डे की खड्ड्यात रस्ते हे समजत नाही, असे पर्यटक व नागरिकांमधून बोलले जात आहे. श्रीवर्धन …

Read More »

रायगडात नवीन रास्त भाव दुकानांचे 81 प्रस्ताव मंजूर

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात नविन रास्त भाव दुकानांसाठी 236 जाहीरनामे प्रसिध्द करण्यात आले होते. यापैकी केवळ 81 प्रस्ताव मंजुर करण्यात आले आहेत. रायगड जिल्ह्यात आठ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर 236 नवीन रास्त भाव दुकानांसाठी पुरवठा विभागाने जाहीरनामे प्रसिध्द केले होते. आलेल्या प्रस्तांवापैकी केवळ 81 प्रस्ताव जिल्हा पुरवठा विभागाने मंजूर केले आहेत. …

Read More »

जिल्हास्तरीय वुशु स्पर्धेत नागोठण्यातील खेळाडूंचे यश

नागोठणे : प्रतिनिधी खारघर येथे झालेल्या जिल्हास्तरीय वुशू अजिंक्यपद स्पर्धेत येथील सुपर डायमंट मार्शल आर्ट कराटे क्लासचे सर्वेसर्वा, मास्टर धनंजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना नागोठण्यातील खेळाडूंनी सब-ज्युनियर, ज्युनियर, सिनियर, वुशू अजिंक्यपदावर आपले नाव कोरले. या स्पर्धकांना जगताप तसेच गौरव राऊत, आदित्य जाधव, रोहन रोडेकर, अक्षय मांडवकर यांचे मार्गदर्शन मिळाले होते. …

Read More »

माणगावमध्ये लग्नघरी पापड-फेण्यांची परंपरा

माणगाव : सलीम शेख सण, उत्सव वा घरगुती सोहळ्याच्या निमित्ताने करण्यात येणार्‍या लग्नी पापड, फेण्यांची परंपरा माणगावात आजही जपली जात असून, ग्रामीण संस्कृतीची ओळख असणारी ही परंपरा आजही टिकून आहे.ग्रामीण भागातील लग्न म्हणजे संपूर्ण गावाचा सोहळा असतो. लग्न समारंभाच्या तयारीसाठी गावातील बहुसंख्य लोक यजमानांना मदतीचा हात देतात. यामध्ये महिलांचे प्रमाण …

Read More »

आषाणेतील वीज समस्यांबाबत मनसेकडून महावितरणला निवेदन

कर्जत ः बातमीदार  कर्जत तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या आषाणे गावातील विजेच्या अनेक समस्यांबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महावितरण विभागाकडे लेखी निवेदन दिले आहे. गावाला वीजपुरवठा करणारे वीज रोहित्र कोसळण्याच्या स्थितीत असून गावातील निम्म्याहून अर्धे विजेचे लोखंडी खांब गंजले आहेत. याबाबत मनसे कार्यकर्त्यांनी महावितरण विभागाचे सहाय्यक अभियंता गणेश देवके यांची भेट घेऊन …

Read More »

मुलीचा मारेकरी बाप पोलिसांच्या ताब्यात

खोपोली ः प्रतिनिधी बापानेच आपल्या 14 वर्षीय मुलीची निर्घृण हत्या केल्याची भयानक घटना शुक्रवारी रात्री खोपोलीजवळ घडली. हत्या करून मुलीचा बाप बिहारमध्ये पळून गेला होता, मात्र खोपोलीचे पोलीस उपनिरीक्षक अमोल वळसंग आणि पथकाने बिहारमध्ये जाऊन शनिवारी रात्री आरोपी बापास ताब्यात घेतले आहे. बिहार येथील एक कुटुंब 2 फेब्रुवारीला सकाळी खोपोलीतील …

Read More »

भोरघाटात दरड कोसळली

सुदैवाने जीवितहानी नाही महाड ः प्रतिनिधी महाड-पुणे मार्गावरील भोरघाटात रविवारी (दि. 7) सकाळी भलीमोठी दरड कोसळल्याने काही काळ हा मार्ग बंद पडला होता. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून या ठिकाणी काम करणारे ग्रामस्थ आणि ‘साबां’च्या ठेकेदाराने येथील दगड हटवून वाहतूक सुरळीत केली. महाड-पुणे मार्गावरील भोर वरंध घाट दिवसेंदिवस धोकादायक …

Read More »

शिवजयंतीनिमित्त भाजपची शिवगान स्पर्धा

‘सीकेटी’त रायगड जिल्ह्याची प्राथमिक फेरी कर्जत ः बातमीदार भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सांस्कृतिक प्रकोष्ठ सेलच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवगान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचा अंतिम सोहळा किल्ले अजिंक्यतारा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी 19 फेब्रुवारी रोजी होणार आहे. स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्याची प्राथमिक फेरी …

Read More »

पार्किंगअभावी पर्यटकांची गैरसोय

खोरा बंदरातील सुविधा उद्घाटनाविना; वाहने रस्त्यावर मुरूड ः प्रतिनिधी खोरा बंदरात नुकतेच एक कोटींचा खर्च करून 400 गाड्यांच्या क्षमतेच्या पार्किंगची सोय करण्यात आली आहे, मात्र काम पूर्ण होऊन दीड वर्ष झाले तरी अजून पार्किंगचा ठेका देण्यात आला नाही. परिणामी जागा असूनही पर्यटकांना आपल्या गाड्या रस्त्यावर लावाव्या लागत आहेत. त्यामुळे पर्यटकांना …

Read More »