Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

खोपोलीमध्ये भरला आठवडा बाजार

खोपोली : प्रतिनिधी अनेक वर्षापासून खोपोलीत बाजारपेठेतील रस्त्यावर भरणारा आठवडा बाजार लॉकडाउननंतर प्रथमच गुरुवारी (दि. 21) फुललेला पहावयास मिळाला. खालापूर जरी तालुक्याचे ठिकाण असले तरी खोपोली शहर हे तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेले ठिकाण आहे. खालापूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील शेतकरी व ग्रामस्थ गृहोपयोगी व शेती विषयक सामान खरेदीसाठी खोपोलीत येत असतात. …

Read More »

संजयआप्पा ढवळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

माणगाव : प्रतिनिधी भाजपचे माणगाव तालुका अध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांचा वाढदिवस गुरुवारी (दि. 21) इंदापूर तळाशेत येथे त्यांच्या निवासस्थानी विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसाचे औचित्य साधून ढवळे यांनी आपल्या सहकार्‍यांसह बोरवाडी येथील माऊली वृद्धाश्रमात जावून तेथील वृद्धा मंडळींना ब्लँकेट, दिनदर्शिका व खाऊचे वाटप केले. संजयआप्पा ढवळे यांना शुभेच्छा …

Read More »

उपेक्षित कुलाबा किल्ला

सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या मराठा आरमाराचे मुख्यालय असणारा ऐतिहासिक कुलाबा किल्ला 300 वर्ष समुद्राच्या लाटांचा मारा झेलत उभा आहे. महाराष्ट्राचे वैभव असेलेल्या या किल्ल्याची तटबंदी आता ढासळत आहे. किल्ल्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. राज्यातील इतर किल्ल्यांचे संवर्धन होत आहे, मात्र हा जलदुर्ग आजपर्यंत उपेक्षात राहिला आहे. समुद्र किनारी मौजमजा …

Read More »

कोरोना काळात 10 हजार रक्तपिशव्यांचे संकलन

प्रा. सुधीर पुराणिक यांच्या पुढाकाराने एनएसएसच्या विद्यार्थ्यांचे अभियान पाली : प्रतिनिधी मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक व पाली (ता. सुधागड) येथील जे. एन. पालिवाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुधीर पुराणिक यांच्या पुढाकाराने कोरोना काळात तब्बल 10 हजार रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले आहे. कोरोना संकटकाळात रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी प्रा. …

Read More »

पंतप्रधान जनआरोग्य योजनेच्या प्रमाणपत्रांचे मुरूडमध्ये वाटप

मुरूड : प्रतिनिधी येथील स्टार फाऊंडेशनतर्फे मुरूड शहरातील सुमारे 330 कुटुंबांना पंतप्रधान जनआरोग्य योजनेच्या प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. पंतप्रधान जनआरोग्य योजना केंद्र शासनाकडून राबवली जात असून, या योजनेंतर्गत नामांकित हॉस्पिटलमध्ये पाच लाख रुपयांपर्यंत वैद्यकीय खर्च केंद्र शासनाकडून केला जाणार आहे. स्टार फाऊंडेशनने  संगणकाचा वापर करून ज्यांची नावे या योजनेत आली …

Read More »

पेणमध्ये बर्ड फ्लूमुळे पशुसंवर्धन विभाग सतर्क

पेण : प्रतिनिधी पशुसंवर्धन विभागाच्या अंतोरे फाटा (ता. पेण) येथील बंदिस्त 562 कोंबड्यांपैकी पाच कोंबड्यांना ’बर्ड फ्लू‘ ची लागण झाल्याचे प्रयोगशाळेतील अहवालानंतर स्पष्ट झाले. त्यामुळे येथील सर्व कोंबड्यांची विल्हेवाट लावण्यात आली असून, जिल्हा प्रशासनाने अंतोरे फाटा परिसरातील सर्व चिकन सेंटर बंद करण्याचे आदेश दिले आहेत.  कोंबड्यांना बर्ड फ्लुची लागण झाल्याचे …

Read More »

राम मंदिरासाठी यथाशक्ती निधी द्या

जैन मुनी विजय महाराज यांचे खोपोलीत आवाहन खोपोली : प्रतिनिधी समाजात वाढलेला व्यभिचार, लुटारु प्रवृत्ती, वाईट मार्गाने संपत्ती कमविण्याचा मोह या सर्व बाबी नष्ट करायच्या असतील तर, मर्यादा पुरुषोत्तम, संयमी व दुसर्‍याबद्दल आदर असणार्‍या प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर उभे राहणे काळाची गरज आहे, याकरीता प्रत्येक भारतीयाने यथा शक्ती निधी दिला …

Read More »

रायगड जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव

पेणमधील कोंबड्यांचे अहवाल पॉझिटिव्ह अलिबाग : प्रतिनिधीबर्ड फ्लूने रायगड जिल्ह्यात शिरकाव केला आहे. पेण येथील सरकारी कुक्कुटपालन कृत्रिम रेतन केंद्रातीलच कोंबड्यांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे खवय्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बर्ड फ्लूचे सावट पोपटीवरदेखील पसरले आहे.  रब्बी हंगाम सुरू झाला की रायगडकरांना पोपटीचे वेध लागतात. वालाच्या किंवा इतर ताज्या …

Read More »

माथेरानच्या मलंग पॉईंटचे सुशोभीकरण परिसरातील झाडांना कठड्याचा आधार

कर्जत : बातमीदार माथेरानच्या पर्यटनाला नवीन झळाळी मिळत आहे, ती नगरपालिकेकडून होत असलेल्या सुशोभीकरणामुळे. येथे होत असलेल्या पॉईंट सुशोभीकरणामध्ये नामशेष होत असलेल्या मलंग पॉइंटला गतवैभव मिळाले आहे. माथेरान नगरपालिका 11 पॉइंटच्या सुशोभीकरणाचे काम करणार आहे. त्यापैकी सनसेट पॉईंटकडे जाणार्‍या रस्त्यामध्ये लुईझा पॉईंटच्या बाजूला असलेल्या मलंग पॉइंटचे सुशोभीकरण सुरू आहे. निसर्ग …

Read More »

जलप्रदूषण करणार्या सलून मालकावर कर्जत नगरपालिकेकडून कारवाईचा बडगा

कर्जत : बातमीदार शहरातील सलून चालकाने आपल्या दुकानातील केसांनी भरलेली पोती उल्हास नदीच्या पात्रात टाकली होती. त्याबद्दल उल्हास नदी संवर्धन टीमने केलेल्या तक्रारीवरून नगरपालिका प्रशासनाने शहरातील वेस्टर्न लूक सलूनवर कारवाई केली असून, यापुढे असे प्रकार करणार्‍यांवर मुंबई अधिनियम अ‍ॅक्टनुसार कारवाई केली जाईल, असे संकेत नगरपालिकेने दिले आहेत. कर्जत शहरातील केश …

Read More »