Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

समाजाचे आधारवड : संजयआप्पा ढवळे

कोणतीही संस्था, संघटना, पक्ष मजबूत करण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज असते. त्यावर सर्वच निर्भर असते. ज्या ठिकाणी उत्तम नेतृत्व ती संस्था, संघटना, असोसिएशन, राजकीय पक्ष नावारूपाला व भरभराटीला आल्याशिवाय राहत नाही. असेच एक सक्षम नेतृत्व संजयआप्पा द्वारकानाथ ढवळे यांच्या रूपाने माणगाव तालुक्यात भारतीय जनता पक्षाला लाभले आहे. त्यांचा आज गुरुवारी (दि. …

Read More »

कोंढवी किल्ल्याची आता पर्यटन विकासासाठी साद

पोलादपूर तालुक्यातील कोंढवी परिसरातील फणसकोंड, गांजवणे, खडपी, चोळई, धामणदिवी, दत्तवाडी, खडकवणे, गोलदरा व तळ्याची वाडी या गावांचे आराध्य ग्रामदैवत आठगाव कोंढवी भैरवनाथ मंदिराच्या लगत नवीन भव्य पाषाण मंदिर बांधण्याचा संकल्प हाती घेतल्यानंतर याकामी पाण्याची साठवण टाकी खणण्यासाठी खड्ड्यातील माती उपसण्यात आली. या मातीच्या ढिगार्‍यामध्ये 15 अश्मयुगीन पाषाण मूर्ती आढळून आल्याने …

Read More »

‘एसटीसारखे सुरक्षित वाहन नाही ही भावना प्रवाशांमध्ये दृढ करा’

मुरूड : प्रतिनिधी रस्ते अपघाताचे प्रमाण ही चिंतेची बाब आहे. तथापि खासगी वाहनांच्या तुलनेत एसटीचे रस्ते अपघाताचे प्रमाण अल्प आहे. एसटीसारखे सुरक्षित वाहन दुसरे नाही, ही भावना प्रवाशांमध्ये दृढ करा, असे आवाहन मुरुड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रशांत सुबनावळ यांनी येथे केले. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुरक्षितता मोहीमेचा   शुभारंभ उपनिरीक्षक सुबनावळ …

Read More »

रिलायन्स प्रकल्पग्रस्तांच्या संघर्षाला यश; पहिल्या टप्प्यात 351 जणांना मिळणार नोकरीची संधी; आंदोलन स्थगित

नागोठणे : प्रतिनिधी येथील रिलायन्स कंपनीविरुद्ध प्रकल्पग्रस्तांनी पुकारलेल्या आंदोलनाला यश आले आहे. पहिल्या टप्प्यात 351 प्रकल्पग्रस्तांना ठेकेदारीत नोकरी मिळण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली असून, उर्वरित प्रकल्पग्रस्तांनासुद्धा नोकरीत घेण्याचा शब्द मिळाला आहे. त्यामुळे आंदोलनाला सोमवारी (दि. 18) 53व्या दिवशी स्थगिती देण्यात येत असल्याची घोषणा लोकशासन आंदोलन संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा मुंबई …

Read More »

खालापुरातील चिंचवली-गोहे पूल धोकादायक; मोठी जीवितहानी होण्याची शक्यता

खालापूर : प्रतिनिधी  तालुक्यातील चिंचवली गोहे, आत्करगाव, आडोशी व इतर गावांच्या दळणवळणासाठी अनेक वर्षापूर्वी चिंचवली गोहे गावाजवळ पूल उभारण्यात आला होता. या पूलावर जागोजागी खड्डे पडल्याने तो वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. या पूलावर लहान-मोठे अपघात घडत असल्याने वाहनचालकांसह प्रवासी, परिसरातील ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. चिंचवली गोहे, आत्करगाव, आडोशी …

Read More »

अनलॉकनंतर आदिवासींचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर सुरू; जिल्ह्यांतर्गत स्थलांतराला पसंती

माणगाव : प्रतिनिधी कोरोना महामारीच्या सुरूवातीला मार्च 2020 मध्ये राज्याच्या विविध भागातून वाडी वस्तीवर परतलेले आदिवासी बांधव अनलॉकनंतर पुन्हा रोजगारासाठी स्थलांतरीत होऊ लागले असून. माणगाव तालुक्यातील सुमारे 40टक्के आदिवासींनी स्थलांतर केले आहे. कोरोना महामारीच्या काळात रोजगार गमावलेले आदिवासी कुटूंब आपापल्या वाडी वस्तीवर परतले होते. गेले नऊ महिने आपल्या मुळ ठिकाणी …

Read More »

सुधागड तालुका पशुधन डॉक्टर-कर्मचार्यांच्या प्रतीक्षेत; उपलब्ध अधिकार्यांवर अतिरिक्त कार्यभार

पाली : रामप्रहर वृत्त सुधागड तालुक्यात 50 हजाराहून अधिक पशुधन आहे. त्यांच्यासाठी तालुक्यात सहा पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. मात्र या दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची बहुतांश पदे रिक्त असल्याने येथील जनावरांना व पशुपक्षांना वेळेत उपचार मिळत नाही. शिवाय रिक्त पदांची जबाबदारी इतर अधिकारी व कर्मचार्‍यांवर आल्याने त्यांच्यावरील जादा कामाचा ताणही …

Read More »

कुलाबा किल्ल्याचे होणार संवर्धन; दुरुस्तीसाठी केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडून निधी मंजूर

अलिबाग : प्रतिनिधी येथील कुलाबा किल्ल्याच्या दुरुस्ती व संवर्धनासाठी केंद्रीय पुरातत्त्व विभागाने निधी मंजूर केला आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष किल्ला संवर्धनाचे काम सुरू होणार आहे, अशी माहिती आंग्रे घराण्याचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी दिली. मराठा आरमाराचे उत्तर कोकणातील मुख्यालय असणार्‍या ऐतिहासिक कुलाबा किल्ल्याची पूर्व आणि पश्चिम दिशेकडील तटबंदी …

Read More »

कर्जतमध्ये दुसरे भातखरेदी केंद्र सुरू; शेतकरी आनंदले

कर्जत ः बातमीदार नेरळ विविध विकास कार्यकारी सोसायटीकडून कर्जत तालुक्यातील दुसरे भातखरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. शासनाच्या मार्केटिंग फेडरेशनकडून दरवर्षी भाताची हमीभावाने खरेदी केली जाते. दरम्यान, तब्बल दीड महिना उशिरा भाताची हमीभावाने खरेदी करण्यास सुरुवात झाल्याने नाराज शेतकरी आनंदले आहेत. नेरळ सोसायटीत कर्जतमधील 30 गावे आणि 11 आदिवासी वाड्यांचा …

Read More »

पहिल्या दिवशी 268 जणांचे लसीकरण

अलिबाग ः प्रतिनिधी केंद्र आणि राज्य शासनाच्या सूचनेप्रमाणे शनिवारी (दि. 16) जिल्ह्यातील शासकीय जिल्हा रुग्णालय, अलिबाग येथे कोविशिल्ड लसीकरण मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या वेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्यासह लोकप्रतिनिधी तसेच संबंधित यंत्रणांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांना लस टोचून कोविशिल्ड …

Read More »