पेण ः प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळातर्फे इंधनाची बचत मोहिमेला सुरुवात झाली असून 16 फेब्रुवारीपर्यंत महिनाभर ही मोहीम सबंध राज्यभर राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने रायगड विभागातील पेण आगारात इंधन बचत मोहिमेचा शुभारंभ विभागीय नियंत्रक अधिकारी अनघा बारटक्के यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या वेळी रायगड विभागातील अधिकारी-कर्मचारी वर्गाची कामगिरी उल्लेखनीय …
Read More »आवक घटल्याने मासळी कडाडली
मुरूड ः प्रतिनिधी मुरूड तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात मासळीचे दर गगनाला भिडले असून, सामान्य व मध्यमवर्गीय लोकांना मासळी खरेदी करणे कठीण जात आहे. मटणासाठी सध्या 700 रुपये किलोचा दर असून तोच दर आता एक सुरमईच्या नगासाठी ग्राहकाला द्यावा लागत आहे. मटण व मासळीचा दर सध्या समान गतीने असल्याने लोकांना मासळी …
Read More »बोर्ली स्थानकावर अपघाताला आमंत्रण
गतिरोधकावर पांढरे पट्टे मारण्याची मागणी मुरूड ः प्रतिनिधी मुरूड जंजिरा पर्यटनात साळाव-मुरूड रस्त्यावर सततच्या वाढत्या वाहनांच्या वर्दळीने बोर्ली स्थानकावर अपघाताची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन येथील गतिरोधकावर पांढरे पट्टे मारण्यात यावेत, अशी मागणी वाहनचालक व नागरिकांतून जोर धरत आहे. मुरूड व काशिद ही दोन पर्यटनस्थळे असल्याने बोर्लीच्या मुख्य रस्त्यावर …
Read More »खालापुरात फेब्रुवारीत लसीकरण
आरोग्य अधिकारी प्रसाद रोकडे यांची माहिती खालापूर ः प्रतिनिधी कोरोनाचा नायनाट करण्यासाठी देशभरात लसीकरणाला सुरुवात झाली असून रायगड जिल्ह्यात चार ठिकाणी लसीकरणाचा शुभारंभ झाला आहे. तसेच खालापूर तालुक्यात फेब्रुवारीत लसीकरण होणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी प्रसाद रोकडे यांनी दिली. कोरोना संसर्गात रायगड जिल्ह्यात खालापूर तालुका हॉटस्पॉट बनला होता. येथील …
Read More »बर्ड फ्लूमुळे मटण, मासळीला पसंती; चिकनकडे ग्राहकांची पाठ
सुधागड : रामप्रहर वृत्त बर्ड फ्लूच्या धास्तीने ग्राहकांनी चिकनकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे ऐन हंगामात चिकन विक्रेते हवालदिल झाले आहेत, तर दुसरीकडे मटण, मासळी विक्रेत्यांना सुगीचे दिवस आले आहेत. बर्ड फ्लूचा फैलाव राज्यातही झाला असून, त्याची लागण कोंबड्यांना सर्वाधिक झाल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यामुळे चिकन विक्रेत्यांवर संक्रांत आली आहे. याबाबत …
Read More »ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रायगडात 78.80 टक्के मतदान
अलिबाग : प्रतिनिधी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रायगड जिल्ह्यात एकूण 78.80 टक्के मतदान झाले. 10 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने उर्वरित 78 ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (दि. 15) मतदान प्रक्रिया झाली. या निवडणुकीची मतमोजणी येत्या सोमवारी (दि. 18) होणार आहे. जिल्ह्यात 15 पैकी 10 तालुक्यांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी होती. किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत झाले. दरम्यान, …
Read More »पोलादपूरमध्ये पायांवरून बस गेल्याने प्रवासी गंभीर जखमी
पोलादपूर : प्रतिनिधी येथील एसटी स्थानकामध्ये शुक्रवारी (दि. 15) रात्री ठाणे- चिपळूण बसचे पुढील चाक एका वृध्दाच्या दोन्ही पायांवरून जाऊन तो जखमी झाला. या अपघातप्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्यामध्ये एसटी बस चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलादपूर बस स्थानकात शुक्रवारी रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास चिपळूण-ठाणे बस (क्र. एमएच13-सीयु6550) थांबली होती. …
Read More »नोकरीसाठी 221 प्रमाणपत्रधारकांची यादी शासनाकडे सुपूर्द
‘रिलायन्स’विरोधात प्रकल्पग्रस्तांचे ठिय्या आंदोलन सुरूच नागोठणे : प्रतिनिधी येथील रिलायन्स कंपनीविरोधात आंदोलनास बसणार्या आंदोलनकर्त्यांचे अर्धशतक पूर्ण झाले असून, शनिवारी (दि. 16) 51वा दिवस होता. लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्या वतीने पहिल्या फेरीत 221 प्रकल्पग्रस्तांची यादी रोह्याच्या प्रांताधिकारी कार्यालयात दोन दिवसांपूर्वी देण्यात आल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस गंगाराम मिणमिणे यांनी दिली. प्रांताधिकारी डॉ. …
Read More »पेणमध्ये रंगला महिलांचा पतंगोत्सव
पेण : प्रतिनिधी मकरसंक्रांतीच्या दिवशी गुरुवारी पेणमध्ये नगरपालिका मैदानावर महिला पतंगोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महिला अत्याचारविरोधी मंच व अंकुर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम गेली नऊ वर्षे साजरा करण्यात येतो. शालेय विद्यार्थी या पतंगोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या पतंगोत्सवाची माहिती व जनजागृती करण्यासाठी गुरुवारी दुपारी …
Read More »राज्य मराठी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी शैलेश पालकर
पोलादपूर : प्रतिनिधी ज्येष्ठ पत्रकार आणि दै. राम प्रहरचे पोलादपूर प्रतिनिधी शैलेश वसंत पालकर यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संघाच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये राज्य संघटक संजय भोकरे यांच्या सूचनेनुसार प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे यांनी पालकर यांची नियुक्ती केल्याचे नियुक्तिपत्रामध्ये प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनी …
Read More »