Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

कोप्रान कंपनीविरोधात कामगारांचे उपोषण

खालापूर : प्रतिनिधी आपल्याला कामावर घ्यावे, या मागणीची तड लावण्यासाठी संदेश करताडे आणि अनिरूध्द पवार या कंत्राटी कामगारांनी कोप्रान कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. संदेश करताडे आणि अनिरूध्द पवार हे दोघे कोप्रान कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून सोळा वर्षापासून काम करीत होते. त्यांना कोणतीही सूचना न देता ऐन दिवाळीच्या …

Read More »

गुरे पळवून कत्तल करणारी टोळी गजाआड

आरोपी मुंब्रा, भिवंडी, कल्याण भागातील अलिबाग : प्रतिनिधीठाणे जिल्ह्यातील मुंब्रा, भिवंडी, कल्याण येथून रायगड जिल्ह्यात येऊन गुरे पळवून त्यांची कत्तल करणारी एक टोळी रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने (एलसीबी) जेरबंद केली आहे.गेल्या काही महिन्यांपासून पेण, वडखळ, पाली, रोहा, खोपोली, कर्जत, रसायनी आदी ठिकाणी पाळीव गुरे-जनावरांची चोरी, त्यांची कत्तल व …

Read More »

मांडला ते काकळघर रस्त्याची दुरवस्था; जनआंदोलनाचा इशारा

रेवदंडा : प्रतिनिधी जागोजागी खड्डे पडल्याने मांडला ते काकळघर या रस्त्याची पुरती दुरावस्था झाली असून, येत्या पंधरा दिवसात या रस्त्याच्या दुरूस्तीचे काम सुरू करा, अन्यथा जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मांडला व काकळघर ग्रामपंचायतींच्या वतीने सार्वजनिक बांधकाम खात्याला निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. मांडला ते काकळघर दरम्यान या रस्त्यावर सात गावे …

Read More »

मुख्यमंत्री कोकणात आले कधी, गेले कधी समजलेच नाही!

चिपळूण : प्रतिनिधीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (दि. 10) रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात अलोरे येथील कोयना प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्याची पाहणी केली. मुख्यमंत्री ठाकरे कोयनेतून भुयारीमार्गे चौथ्या टप्प्यात आले आणि पाहणी करून पुन्हा माघारी परतले. त्यामुळे पोफळी व आलोरेवासीयांसाठी त्यांचा दौरा केवळ उत्सुकतेचा विषय ठरला. मुख्यमंत्री अलोरेत आले कधी गेले कधी …

Read More »

नांदगाव हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप

मुरुड : प्रतिनिधी यशवंतनगर नांदगाव येथील श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालयातील दहावीच्या 95 विद्यार्थ्यांना उसरोली ग्रामपंचायतीकडून सरपंच मनीष नांदगावकर यांच्या हस्ते मास्क व सॅनिटायझरचे मोफत वाटप करण्यात आले. सरपंच नांदगावकर यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सागर राऊत यांनी केले. उपसरपंच महेशकुमार पाटील, ग्रामपंचायत सदस्या समीना जुबेर घलटे, शाळेचे …

Read More »

जमिनीचा पोत सुधारण्यासाठी शेतकर्यांनी प्रयत्न करावेत -कृषी विशेषतज्ज्ञ सुळे

कर्जत : बातमीदार मातीचा पोत कायम राखण्यासाठी शेतकर्‍यांनी जमिनीला आपले मानून जमिनीचा पोत राखण्याचे आव्हान स्वतःहून स्वीकारावे, असे आवाहन ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ अरविंद सुळे यांनी येथे केले. जागतिक मृदा दिनानिमित्त तालुका कृषी अधिकारी शीतल शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ कृषी अधिकारी कशेळे अंतर्गत माले, कळंब, अंजप आणि वाकस या कार्यक्षेत्रात कृषी …

Read More »

रस्ता दुरुस्तीसाठी गांधीगिरी

नागोठणे : प्रतिनिधी सरकारने तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याने तुम्हाला खड्ड्यातच घालायचे ठरविले असून स्वतःला कोणतीही इजा न करता या रस्त्यावरून गाड्या चालवा, असा वाहन चालकांना संदेश देत रोहे तालुका मनसेकडून बुधवारी (दि. 9) सकाळी नागोठणे-रोहे मार्गावर गांधीगिरी मार्गाने आंदोलन करण्यात आले. नागोठणे-रोहे मार्गावरील आंबेघरफाटा ते आमडोशीफाटा या तीन किलोमीटर रस्त्याची …

Read More »

प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाला वारकरी मंडळींचा पाठिंबा

नागोठणे : प्रतिनिधी आंदोलन मागे घेतल्यावरच सकारात्मक चर्चा करू, असा हेका रिलायन्स व्यवस्थापनाने कायम ठेवला असल्याने आज बुधवारी (दि. 9) तेराव्या दिवसांपर्यंत प्रकल्पग्रस्थांच्या मागण्याचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी वारकरी संप्रदायाच्या शेकडो मंडळींनी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केल्याने दुधात साखरच पडली असल्याची भावना आंदोलनकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे. नागोठणे …

Read More »

पोलादपूर शहर भाजप महिला मोर्चातर्फे किल्ले, रांगोळी स्पर्धेचा निकाल जाहीर

पोलादपूर : प्रतिनिधी गेल्या काही महिन्यांपासून कोविड काळात भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी शहराच्या सुरक्षिततेपोटी हा घरोघरी जाऊन विजेत्यांच्या कौतुकाचा नाविन्यपूर्ण कार्यक्रम राबवला आहे. शहराची सुरक्षा हेच आमचे ब्रीद आहे, असे विचार पोलादपूर शहर भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा उज्ज्वला तथा माई जयंत शेठ यांनी मांडले. शहर भाजप महिला मोर्चातर्फे आयोजित करण्यात आलेल्या …

Read More »

महाडमध्ये भाजपकडून निषेध

महाड : प्रतिनिधी भारत बंदला महाडमधील व्यापार्‍यांनी पाठिंबा दिला नसुन बहुतांश बाजारपेठ सुरळीत सुरू होती. मात्र प्रशासकिय यंत्रणेचा वापर करुन पोलीस बळावर महाड बंद करण्याचा केविलवाणा प्रयत्न महाड भाजपने हाणून पाडला. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या घटनेची गंभीर दखल घेत विधीमंडळात सरकारला जाब विचारणार असल्याचे सांगितले. भारत बंदचा महाडमध्ये …

Read More »