माणगाव : प्रतिनिधी परतीच्या पावसात भातपीक जमीनदोस्त होऊन माणगाव तालुक्यातील शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे त्वरित पूर्ण करून राज्य शासनाने संकटग्रस्त शेतकर्यांना लवकरच नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी भाजप महिला मोर्चाच्या माणगाव तालुकाध्यक्ष शर्मिला सत्वे यांनी केली. या मागणीचे निवेदन त्यांनी माणगावचे नायब तहसीलदार बी. वाय. भाबड …
Read More »रावे येथे कोरोना योद्ध्यांचा सन्मान
पेण : वार्ताहर तालुक्यातील दुर्गम भागात कोरोना प्रादुर्भावाच्या काळात दिवसरात्र मेहनत घेऊन रुग्णांची सेवा करणार्या व्यक्तींचा नुकताच रावे येथे ग्रामस्थ मंडळातर्फे सन्मान करण्यात आला. श्री रायबादेवी मंदिराच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमास गाव पंच कमिटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष चंदन पाटील, माजी अध्यक्ष संतोष पाटील, राजा पाटील, मनोहर टावरी, हिरामण पाटील, धनाजी पाटील, …
Read More »ओबीसी संघर्ष समिती म्हसळ्यात काढणार मोर्चा
मुख्यमंत्र्यांना देणार निवेदन म्हसळा : प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. या कारणाने मराठा समाज आपली नोंद ओबीसी मध्ये करावी, अशी सध्या मागणी करत आहे. त्याला आमचा स्पष्ट विरोध असल्याचे म्हसळा तालुका ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे ठाम मत असून समितीच्या वतीने म्हसळा तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. तसेच …
Read More »रोह्यात धावीर महाराजांचा पालखी सोहळा साधेपणाने; अडीच तासांत पालखी मंदिरात पुन्हा दाखल
रोहे : प्रतिनिधी येथील ग्रामदैवत श्री धावीर महाराजांचा पालखी उत्सव सोमवारी (दि. 26) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा झाला. पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर भाविकांनी शहरात ठिकठिकाणी सुरक्षित अंतर राखून पुष्पवृष्टी करून दर्शन घेतले. दसरा संपला की दुसर्या दिवशी श्री धावीर महाराजांचा पालखी उत्सव सुरू होतो. त्यानुसार सोमवारी सकाळी पूजा-अर्चा व विधी झाल्यावर …
Read More »टेम्पोचालक संगीता वाघमारे यांचा सत्कार
खालापूर : प्रतिनिधी पतीच्या अकाली निधनानंतर संसाराचा गाडा चालविण्यासाठी हाती स्टेअरिंग घेणार्या नवदुर्गा संगीता सोमनाथ वाघमारे यांचा दसर्याच्या मुहूर्तावर (दि. 25) खालापूर येथील दिलासा फाऊंडेशनच्या उपाध्यक्ष आकांक्षा देशमुख यांच्या हस्ते सत्कार झाला. मोरे आदिवासीवाडी (ता. खालापूर) येथील संगीता वाघमारे यांचे पती सोमनाथ मालवाहू (छोटा हत्ती) टेम्पो चालवायचे. त्यातून मिळणार्या उत्पन्नावर …
Read More »कर्जतमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळेत अवतरली बुलेट ट्रेन
कर्जत : बातमीदार तालुक्यातील वर्णे ठाकूरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक व शिक्षकांनी शाळेच्या रंगहीन भिंतीवर मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन काढली असून, त्यांच्या या आगळ्यावेगळ्या कल्पकतेची सर्वत्र प्रशंसा होत आहे. वर्णे ठाकूरवाडी येथे इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत शाळा असून, तेथे आदिवासी समाजातील मुले शिक्षण घेत आहेत गटशिक्षणाधिकारी संतोष …
Read More »फोर्टी प्लस क्रिकेटप्रेमींनी केला नवीन हंगामाचा शुभारंभ
कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार येथील चाळीशी गाठलेल्या मित्रांनी काही वर्षांपूर्वी एकत्र येऊन ’फोर्टी प्लस’ क्रिकेटची स्थापना केली होती. विजयादशमीच्या मुहूर्तावर (दि. 25) ज्येष्ठ सदस्य रणजीत जैन आणि मधुकर सुर्वे यांच्या हस्ते क्रिकेट साहित्याचे पूजन करून ’फोर्टी प्लस’ने क्रिकेटच्या नविन हंगामाचा शुभारंभ केला. या वेळी उपस्थितांनी कोरोना संकटानंतर शासनाने आदेश दिल्यावर …
Read More »रेवस रो-रो जेट्टीच्या कामामध्ये अपघात; एक जण जखमी
अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील रेवस येथे सुरू असलेल्या रो रो जेट्टीच्या कामामध्ये रविवारी (दि. 24) संध्याकाळच्या सुमारास अपघात झाला. यात एक कामगार जखमी झाला. त्याला अलिबाग येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असलेल्या अलिबागला जाण्यासाठी उरणमधील नागरिकांना रस्ता मार्गाने 40 किलोमीटर तर छोट्या होडीतून (जलमार्गाने) धोकादायक …
Read More »नागोठण्यात गुरे पळविण्याचा प्रयत्न
जागरूक नागरिकाच्या सतर्कतमुळे डाव फसला; बेशुद्ध अवस्थेत सापडली तीन गुरे नागोठणे : प्रतिनिधी आज पहाटेच्यादरम्यान तीन गुरांना बेशुद्ध करून गाडीत भरण्याचा प्रयत्न सोमवारी (दि. 26) पहाटे नागोठणे येथे सुरू होता. मात्र एका वयस्कर व्यक्तीच्या जागरूकतेमुळे हा गुरे पळविण्याचा प्रयत्न फसला. येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील सहाय्यक नामदेव जाधव तातडीने घटनास्थळी दाखल झाले. …
Read More »राजमुद्रा फाऊंडेशनकडून मारुती मंदिराचा जिर्णोद्धार
धाटाव : प्रतिनिधी रोहा तालुक्यातील रोठ बु. येथील धाटाव एमआयडिसीतील फायरस्टेशन समोर कॅपरस कॉलनीतील फार वर्षांपुर्वीचे पिंंपळा खालच्या जुन्या हनुमान मंदिराचे नुतनीकरण करण्यात आले. दसर्याच्या शुभ मुहूर्तावर राजमुद्रा फाऊंडेशनचे संस्थापक तथा भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष अमित घाग व फाऊंडेशन अध्यक्ष राजेश डाके याच्या माध्यमातून हा मंदिर जिर्णोद्धार कार्यक्रम …
Read More »