अन्न नागरी पुरवठा विभागाच्या निर्णयामुळे लाभार्थी अडचणीत कर्जत : बातमीदार अंत्योदय तसेच दारिद्र्य रेषेखालील आणि एपील म्हणजे प्राधान्य गट यातील सर्वच लाभार्थीना स्वस्त धान्य विक्री दुकानात कोरोनाच्या काळात धान्य मिळत असे. मात्र मागील दोन महिन्यांपासून एपील गटातील म्हणजेच केशरी रेशनकार्डधारकांना धान्य देणे बंद करण्यात आले आहे. यामुळे या गटातील रेशनकार्डधारकांची …
Read More »माणगाव आणि मुरुडमधील शेतकर्यांना नुकसानभरपाईची प्रतीक्षा
माणगाव : प्रतिनिधी परतीच्या पावसाने माणगाव तालुक्यातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी पुरता उध्वस्त झाला आहे. महसुल व कृषि विभागाने या नुकसानीचे पंचनामे केले असून, शेतकर्यांचे डोळे आता नुकसानभरपाईकडे लागले आहेत. परतीच्या पावसामुळे शेतात साठलेल्या पाण्याचा निचरा झाला नाही. पाण्याखाली राहिल्याने शेतातील भातपीक पूर्णतः कुजले. वरकस जमिनीवरील नाचणी, …
Read More »सरपंचांवरील अविश्वास पारित करण्यासाठी विशेष ग्रामसभा बोलावणे बंधनकारक
अलिबाग ः प्रतिनिधी राज्यात थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचांचावर अविश्वास ठराव पारित करण्यासाठी विशेष ग्रामसभा बोलावणे बंधनकारक करण्यात आले आहे. ग्रामविकास विभागाने तसे पत्र राज्यातील सर्व जिल्हाधिकार्यांना पाठविले आहे. राज्यात भाजपची सत्ता असताना सरपंचपदाची निवडणूक थेट जनतेतून होत होती, मात्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येताच ग्रामपंचायत अधिनियमात बदल करण्यात आला. …
Read More »तटकरेंचा सत्तेचा माज जनता उतरवेल; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा घणाघात; पेणमधील निषेध मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद
पेण ः अनिस मनियार एखाद्या घटनेचे राजकीय स्वार्थासाठी भांडवल करून घेणे ही खासदार सुनील तटकरे यांची वृत्ती असून गेली 20-25 वर्षांत विरोधकांना वेळोवेळी अडचणीत आणण्याचे काम ते करीत आहेत. त्यांना आलेला सत्तेचा माज आगामी काळात जनताच उतरवेल हे निर्विवाद सत्य आहे. प्रामाणिकपणे निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर सत्तेचा गैरवापर करीत पोलीस यंत्रणेला …
Read More »सूडबुद्धीच्या राजकारणाचा निषेध करण्यासाठी आज पेणमध्ये मोर्चा
पेण : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या इतिहासात नगर परिषदेच्या सभेमध्ये झालेल्या तथाकथित प्रकरणावरून दाखल तांत्रिक गुन्ह्यात गटनेते अनिरुद्ध पाटील यांना अडकविण्याचे कट-कारस्थान तसेच पोलीस प्रशासन यंत्रणेने रात्रीच्या सुमारास आमदार रविशेठ पाटील यांच्या निवासस्थानी अनिरुद्ध पाटील यांना पकडण्यासाठी घेतलेली झाडाझडती या सर्व प्रकाराच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने पेणमध्ये गुरुवारी (दि. 29) निषेध मोर्चा व …
Read More »एसटी कर्मचार्यांचे 9 नोव्हेंबरला आक्रोश आंदोलन
पेण : प्रतिनिधी कोरोना महामारीत अनेक एसटी कर्मचार्यांनी जीवाची पर्वा न करता कामावर येऊन प्रवासी वाहतूक सुरळीतपणे हाताळली, मात्र त्यांचे तीन महिन्यांचे वेतन अजूनही मिळालेले नाही. या एसटी कर्मचार्यांना महागाई भत्ता, दिवाळी उचल, दिवाळी भेट आणि थकीत वेतन येत्या 7 नोव्हेंबरपर्यंत मिळाले नाही, तर 9 नोव्हेंबरला एसटी कर्मचारी आपापल्या घरासमोर …
Read More »सरसकट नुकसानभरपाई द्या; सम्यक क्रांती विचार मंचचे तहसीलदारांना निवेदन
पाली : प्रतिनिधी अतिवृष्टी व परतीच्या पावसाने सुधागड तालुक्यातील शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेल्या भातपिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकर्यांना सरसकट नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी सम्यक क्रांती विचार मंचाच्या वतीने अध्यक्ष मंगेश वाघमारे यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भातील मागणीचे निवेदन मंगळवारी (दि. 27) तहसीलदार दिलीप रायन्नावार यांना दिले. आठवडाभर कोसळलेल्या …
Read More »शेतकर्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी -भाजप नेत्या शर्मिला सत्वे
माणगाव : प्रतिनिधी परतीच्या पावसात भातपीक जमीनदोस्त होऊन माणगाव तालुक्यातील शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे त्वरित पूर्ण करून राज्य शासनाने संकटग्रस्त शेतकर्यांना लवकरच नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी भाजप महिला मोर्चाच्या माणगाव तालुकाध्यक्ष शर्मिला सत्वे यांनी केली. या मागणीचे निवेदन त्यांनी माणगावचे नायब तहसीलदार बी. वाय. भाबड …
Read More »रावे येथे कोरोना योद्ध्यांचा सन्मान
पेण : वार्ताहर तालुक्यातील दुर्गम भागात कोरोना प्रादुर्भावाच्या काळात दिवसरात्र मेहनत घेऊन रुग्णांची सेवा करणार्या व्यक्तींचा नुकताच रावे येथे ग्रामस्थ मंडळातर्फे सन्मान करण्यात आला. श्री रायबादेवी मंदिराच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमास गाव पंच कमिटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष चंदन पाटील, माजी अध्यक्ष संतोष पाटील, राजा पाटील, मनोहर टावरी, हिरामण पाटील, धनाजी पाटील, …
Read More »ओबीसी संघर्ष समिती म्हसळ्यात काढणार मोर्चा
मुख्यमंत्र्यांना देणार निवेदन म्हसळा : प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. या कारणाने मराठा समाज आपली नोंद ओबीसी मध्ये करावी, अशी सध्या मागणी करत आहे. त्याला आमचा स्पष्ट विरोध असल्याचे म्हसळा तालुका ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे ठाम मत असून समितीच्या वतीने म्हसळा तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. तसेच …
Read More »