विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना मोफत मास्कवाटप पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील पायरीचीवाडी येथील शाळेतील विद्यार्थ्यासोबत ग्रामस्थांमध्येही कोरोनाबाबत जनजागृती व प्रबोधन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना मोफत मास्कचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांबरोबर ग्रामस्थांमध्ये कोरोनाबाबत जनजागृती व प्रबोधन करण्यासाठी पायरीचीवाडी येथील विद्यार्थ्याची प्रभातफेरी काढण्यात आली. या वेळी विद्यार्थ्यांनी उपस्थित ग्रामस्थांना वारंवार हात स्वच्छ …
Read More »पेण तालुक्यात मास्क, सॅनिटायझर्सचा तुटवडा
पेण : प्रतिनिधी कोरोना आजाराचा संसर्ग होऊ नये, म्हणून मास्क वापरण्याचा व हात धुण्यासाठी सॅनिटायझर्सचा वापर करायचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. त्यामुळे मास्क व सॅनिटायझर्स विक्रीत अचानक वाढ झाली असून, पेण तालुक्यातील अनेक मेडिकलमध्ये मास्क व सॅनिटायझर्सचा तुटवडा निर्माण झाला आहे. पेण येथून अवघ्या काही अंतरावर असलेल्या पनवेल येथे …
Read More »रायगडात पर्यटक जलवाहतूक बंद
पर्यटनस्थळांवर बंदी; अत्यावश्यक प्रवासी सेवा मात्र सुरूच अलिबाग : प्रतिनिधी कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी शासन खबरदारी घेत आहे. मेरीटाईम बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील समुद्र, खाडी किनारी चालविले जाणारे जलक्रीडा व नौकाविहार प्रकल्प तसेच पर्यटक जलवाहतूक 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश मेरीटाईम बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी दिले आहेत. मात्र प्रवासी जलवाहतूक ही अत्यावशक …
Read More »मोबाइल जपून वापरा, आपली सुरक्षा आपल्याच हातात आहे -योगिनी बाबर
कर्जत : प्रतिनिधी हल्ली सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटरचा वापर करताना आपण दक्षता घेत नाही आणि त्याचाच गैरफायदा काहीजण उठवतात. आपण जर ही उपकरणे काळजीपूर्वक हाताळली तर आपली सुरक्षा आपल्याच हातात आहे याचा निश्चितच प्रत्यय येईल, असे मत अॅड. योगिनी बाबर यांनी येथे व्यक्त केले. कोंकण ज्ञानपीठ …
Read More »पोलीस मित्र संघटनेकडून कोरोनाबद्दल जनजागृती
कर्जत ः बातमीदार पोलीस मित्र संघटनेच्या वतीने चिंचवली-डिकसळ येथील भाऊसाहेब राऊत विद्यालयात कोरोना विषाणूबद्दल जनजागृती मोहीम घेण्यात आली. पोलीस मित्र संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे याबाबत आवाहन करणारी पत्रके काढून आवाहन केले आहे. पोलीस मित्र संघटनेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर साळोखे व जिल्हा सचिव सुप्रेश साळोखे तसेच कार्यकर्त्यांनी …
Read More »कोरोना से डरो ना; म्हसळा नगरपंचायतीचा पुढाकार
म्हसळा : प्रतिनिधी कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. रुग्णाचा हा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशातच लोकांमध्ये मोठी घबराट पसरली आहे. खबरदारीचे कोणकोणते उपाय व प्रतिबंधात्मक कारवाई कोरोनापासून वाचण्यासाठी करायला पाहिजे, याचे सध्या तर्कवितर्क लढवले जात असतानाच म्हसळ्याच्या नगराध्यक्षा जयश्री कापरे यांनी सोमवारी (दि. 16) विशेष …
Read More »श्रीवर्धन, म्हसळ्यातील कराटेपटूंचे स्पर्धेत यश
श्रीवर्धन : प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथे द चॅम्पियन्स कराटे क्लबच्या वतीने चॅम्पियन्स कराटे लीग 2020 रंगली. या स्पर्धेत रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार्या श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्यातील कराटेपटूंनी पदकांची कमाई करीत यश मिळविले. स्पर्धेत देशभरातून जवळपास एक हजार खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यात रायगडातील ओंकार राजपूत याने काता प्रकारात रौप्य, …
Read More »खालापुरात लोककलेतून आरोग्यविषयक जनप्रबोधन
खोपोली : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषद आरोग्य विभाग, स्वयंसिद्धा सामाजिक विकास संस्था-रोहा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत खालापूर तालुक्यातील गावागावांमध्ये लोककलेतून आरोग्यविषयक जनप्रबोधन करण्यात आले. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत खालापूर तालुक्यातील शिरवली, वावोशी, खालापूर बसस्थानक येथे लेक लाडकी या लोककलेतून जनसुरक्षा योजना, प्रसूतीपूर्वी व प्रसूतीनंतर घ्यावयाची काळजी, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, …
Read More »कोरोना प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाची तयारी
प्रांताधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर यांची माहिती माणगाव : प्रतिनिधी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या संदर्भात उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर यांनी प्रांत कार्यालयात माणगाव उपविभागांतर्गत माणगाव व तळा तालुक्यातील महसूल विभाग, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, व्यापारी असोसिएशन, मेडिकल असोसिएशन, पंचायत समिती व नगरपंचायत विभाग यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत कोरोना विषाणू …
Read More »कोरोना… भीती नको… दक्षता घ्या!
सार्वजनिक आरोग्य विभागासह म्हसळ्यात प्रशासन सज्ज म्हसळा : प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने म्हसळा तहसीलदार शरद गोसावी यांच्या दालनात म्हसळा तालुक्यातील आरोग्य, ग्रामीण रुग्णालय, पंचायत समिती, प्राथमिक शिक्षण विभाग नगरपंचायत, बालविकास प्रकल्प अधिकारी, पोलीस विभाग, …
Read More »