कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या भिवपुरी रोड रेल्वे स्थानकाबाहेर कर्जत दिशेला पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहते, ते पाणी वाहून नेणारी मार्गिका सोमवारी (दि. 17) खुली करण्यात आली. तसेच लोखंडी रेलिंग लावून अडविण्यात आलेला शेतकर्यांचा रस्तादेखील मोकळा करण्यात आला. गेली दोन वर्षे पावसाळ्यात भिवपुरी रोड रेल्वे स्थानकाबाहेर कर्जत दिशेकडे मोठ्या …
Read More »कळंब येथील एटीएम केंद्र दोन महिन्यांनंतर पुन्हा सुरू
कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील कळंब येथील देना बँकेचे एटीम केंद्र मागील दोन तीन महिन्यांपासून बंद होते. त्यामुळे या भागातील एटीम कार्ड धारकांची, ग्राहकांची मोठी गैरसोय झाली होती. अखेर ग्राहकांच्या तक्रारीची दखल घेत उशिर का होईना, हे एटीएम केंद्र सुरु करण्यात आले आहे. कर्जत शहरापासून दूर असलेल्या कळंब गावात एकमेव असलेली …
Read More »विहिरीत पडलेल्या भेकराला जीवदान
नागोठणे : प्रतिनिधी विहिरीत पडलेल्या भेकराला दोन स्थानिक तरुणांनी जीवदान दिल्याची घटना शनिवारी (दि. 15) सायंकाळी सुधागड तालुक्यातील कुंभारशेत गावात घडली. नागोठणे विभागाच्या वन कर्मचार्यांनी या भेकरीला घनदाट जंगलात सोडून दिले. कुंभारशेत गावातील विहिरीत शनिवारी सायंकाळी एक भेकर पडल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. दोन स्थानिक तरुणांनी तातडीने भेकराला विहिरीबाहेर काढले. ग्रामस्थांनी …
Read More »चित्रकार पराग बोरसे यांच्या चित्राला अमेरिकेत पुरस्कार
कर्जत : बातमीदार पेस्टल जर्नल हे चित्रकलेच्या जगतातील अत्यंत प्रसिद्ध असे मॅगझिन अमेरिकेतून प्रसिद्ध होते. त्या मासिकात कर्जत येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार पराग बोरसे यांचे चित्र प्रसिद्ध झाले होते. पेस्टल माध्यमातील या चित्राला अमेरिकेत पुरस्कार जाहीर झाला आहे. पेस्टल जर्नल हे चित्रकलेवर आधारित पुस्तक गेल्या 21 वर्षापासून प्रकाशित होत आहे. …
Read More »‘सीएए’ समर्थनार्थ नेरळमध्ये भव्य रॅली
कर्जत : बातमीदारनागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या (सीएए) समर्थनार्थ नेरळमध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लोक जागरण मंच यांच्या वतीने रविवारी (दि. 16) भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत तिरंगा झेंडे हातात घेतलेले कार्यकर्ते आणि भगव्या टोप्या परिधान केलेले नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भाजप तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर, …
Read More »रहिवासी सोसायटीच्या मीटर रूमला आग
खोपोली ः प्रतिनिधी खोपोलीतील शास्त्रीनगर येथील महालक्ष्मी रहिवासी सोसायटीच्या वीज मीटर पॅनल बोर्डला शॉर्टसर्किट होऊन रविवारी (दि. 16) दुपारी मोठी आग लागली. यात दोन दुचाकींसह संपूर्ण वीज मीटर पॅनल जळून मोठे नुकसान झाले. आगीची माहिती मिळताच अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सक्रिय ग्रुपचे सदस्य गुरुनाथ साठेलकर, मेहबूब जमादार, जगदिश मरागजे, कल्पेश शहा, भक्ती …
Read More »मध्य रेल्वे उभारणार आपत्कालीन टीम
नेरळ येथे परीक्षणादरम्यान माहिती कर्जत ः बातमीदार मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी नेरळ स्थानकाची पाहणी आणि परीक्षण करताना पावसाळ्यात घडलेल्या आपत्तीचा व्हिडीओ पाहिला. त्या वेळी भविष्यात अशा आपत्तीच्या वेळी तोंड देण्यासाठी स्वतःचे आपत्ती व्यवस्थापन केंद्र असावे, असा निर्णय घेतला असून रेल सुरक्षा दल आणि रेल्वे पोलीस यांच्या माध्यमातून आपत्ती …
Read More »नरवीर तानाजी मालुसरे शौर्यदिन प्रचंड जल्लोषात
नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शौर्यदिनी रविवारी (दि. 16) पोलादपूर तालुक्यात सिंहगड ते उमरठ नरवीर पालखी यात्रेचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. या वेळी परिसरातील नागरिकांचा प्रचंड उत्साह दिसून येत होता. रविवारी सकाळी हभप सखाराम कळंबे यांच्या हस्ते नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. या वेळी हभप गणपत आनंदा …
Read More »विकासकामांच्या माध्यमातून मतांची परतफेड
आ. रविशेठ पाटील यांचा निर्धार नागोठणे : प्रतिनिधी शहरासह विभागातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने स्थानिक आमदार रविशेठ पाटील यांच्या वतीने येथील ग्रामपंचायतीच्या शिवगणेश सभागृहात नुकतीच आढावा बैठक पार पडली. बैठकीस सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, रोहे पंचायत समिती माजी उपसभापती मारुती देवरे, निवृत्त न्यायाधीश डी. पी. पाटील, डॉ. अनंत पाटील, …
Read More »‘प्रामाणिक भावनेतून केलेल्या कार्याला ईश्वराचीही साथ’
पेण ः प्रतिनिधी प्रामाणिक भावनेतून केलेल्या कार्याला ईश्वराचीही साथ लाभते. असेच कार्य संस्कार विद्यालयाचे सर्व पदाधिकारी करताहेत, असे गौरवोद्गार नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी गडब येथील संस्कार विद्यालयाच्या वार्षिक बक्षीस वितरण कार्यक्रमाप्रसंगी काढले. आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक शांताराम चवरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष संजय चवरकर, गडब सरपंच अपर्णा …
Read More »