Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

पाटणेश्वर येथील संकेत म्हात्रेला जलतरणात ‘सुवर्ण’

श्रीगाव : प्रतिनिधी गुजरातच्या वडोदरा येथे झालेल्या नॅशनल चॅम्पियनमध्ये जलतरण स्पर्धेत पेण तालुक्यातील पाटणेश्वर येथील संकेत केशव म्हात्रे सुवर्णपदक पटकाविले. 100 मीटर फ्री स्टाईल प्रकारात त्याने ही कामगिरी केली. नॅशनल मास्टर गेम असोसिएशनच्या माध्यमातून वडोदरा येथे 5 ते 9 फेब्रुवारीदरम्यान    विविध खेळांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यातील जलतरण देशभरातील …

Read More »

‘सीएए’च्या समर्थनार्थ माणगावमध्ये भव्य रॅली

माणगाव : प्रतिनिधीसीएए अर्थात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ माणगाव येथे शनिवारी (दि. 8) भारतीय जनता पक्षातर्फे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली व माणगाव तालुका अध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांच्या नियोजनाखाली भव्य रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह नागरिक शेकडोंच्या संख्येने सहभागी झाले होते.या वेळी अ‍ॅड. …

Read More »

विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप

पेण : प्रतिनिधी नरविर तानाजी मालुसरे यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने महाल मिरा डोंगर परिसरातील आसणी आणि वेताळपट्टी देऊळवाडी येथील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना नंदेश पाटील यांनी स्वेटर वाटप केले. पेण तालुका धनगर समाज युवक विद्यार्थी विकास संस्थेचे संस्थापक विजय उघडे, अध्यक्ष सचिन र. उघडे, उपाध्यक्ष वरूण  आखाडे, सल्लागार लक्ष्मण बोडेकर, सहखजिनदार योगेश कोकळे, …

Read More »

संगीतकार अजय-अतुल बनले ‘खालापूरकर’

वावर्लेत फार्म हाऊस खरेदी खोपोली, खालापूर : प्रतिनिधी सुप्रसिध्द संगीतकार अजय-अतुल गोगावले यांनी चौकजवळील वावर्ले येथे फार्महाऊससाठी जमीन खरेदी केली आहे. त्या जमिनीच्या खरेदी दस्तऐवज नोंदणीसाठी ते दोघे शुक्रवारी (दि. 7) खालापूरला आले होते. यावेळी दुय्यम निबंधक कार्यालयातील उपनिबंधक श्री. वैद्य आणि त्यांच्या इतर सहकार्‍यांनी त्यांचे स्वागत केले. अजय-अतुल यांना …

Read More »

संवाद होत नसल्याने माणूसपण धोक्यात

ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव यांचे मत अलिबाग : प्रतिनिधी सध्याच्या शिक्षणात नैतिकता हा विषयच दिसत नाही. माणसे शिकत आहेत, परंतु सामाजाचे अध:पतन होत आहे. माणासांचा एकमेकांशी संवाद होत नसल्यामुळे माणूसपण धोक्यात आले आहे, असे मत सहाव्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव यांनी शनिवारी …

Read More »

दिवेआगरजवळील डोंगराला वणवा

दुर्मीळ वनसंपदा खाक; वन्यजीवांनाही फटका श्रीवर्धन : प्रतिनिधी तालुक्यातील दिवेआगर-भरडखोल रस्त्याला लागून असलेल्या डोंगराला शुक्रवारी (दि. 7) सायंकाळी वणवा लागला. त्यात नैसर्गिक साधनसंपत्तीचे खूप मोठया प्रमाणावर नुकसान झाले.  दिवेआगर व आजुबाजुचा परिसर निसर्ग सौंदर्यााने नटलेला आहे. दिवेआगर-भरडखोल रस्त्याला लागून असलेल्या डोंगरावर  तर दुर्मिळ वनसंपदा असून व तेथे वन्यजीवांचा मोठ्या प्रमाणावर  …

Read More »

नेरळमध्ये पे अँड पार्कची सुविधा

बाजारपेठेतील वाहतूक कोंडीवर मध्य रेल्वेकडून उपाययोजना कर्जत : बातमीदार नेरळमधील बाजारपेठेत शहरासह आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ खरेदीसाठी अनेकदा आपल्या वाहनाने येतात. शहरात वाहने पार्किंगची सोय नसल्याने रस्त्यालगतच वाहने उभी केली जातात. त्यामुळे नेरळमध्ये कायम वाहतूक कोंडी होते. मात्र आता मध्य रेल्वेकडून नेरळमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकासमोर पार्किंगची सोय करण्यात आली असून, …

Read More »

कुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धा : महाराष्ट्राची दमदार सुरुवात

अलिबाग : प्रतिनिधी  कुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेतील कर्नाटकविरुद्धच्या सामन्यात पहिल्या दिवशी यजमान महाराष्ट्राने 6 बाद 306 अशी मजल मारली. रणजीत निकम याने आक्रमक फलंदाजी करून शतकी खेळी (140 धावा) केली. हा सामना नागाठणे येथील रिलायन्स क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे. कर्नाटकने नाणेफेक जिंकून महाराष्ट्रास प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. महाराष्ट्राच्या …

Read More »

झोराबियन कंपनीची सामाजिक बांधलकी

शेणगाव शाळेला एलईडी टीव्ही भेट खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील डोलवली गावाच्या हद्दीतील झोराबियन चिक्स प्रा. लि. कंपनीने शेणगाव गावातील प्राथमिक शाळेला एलईडी टीव्ही संचाची भेट दिली. तसेच माणकीवली ग्रामपंचायती करीता 15 एचपी क्षमतेचा पंप आणि पाईपलाईन असा एकूण सुमारे तीन लाख 50 हजार रुपयांची मदत केल्याने या कंपनीच्या कार्याचे …

Read More »

स्वच्छ सर्वेक्षण होतंय अस्वच्छ पद्धतीने!

म्हसळा : प्रतिनिधी स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत म्हसळा नगरपंचायत हद्दीत अनेक ठिकाणी कचर्‍याच्या ठिगांवरच स्वच्छ सर्वेक्षणाचे मोठ-मोठे फ्लेक्स लावण्यात आले आहेत, तर स्वच्छतेबाबत भिंतींवर रंगविलेल्या जाहिरातींखाली शेण व अन्य कचरा तसाच पडून आहे.  केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या अनुषंगाने म्हसळा नगरपंचायतीला 14 व्या वित्त आयोगातून पाहिला हप्ता म्हणून रु 20 …

Read More »