रोहे ः प्रतिनिधी राजीव गांधी क्रीडा स्पर्धा अभियानअंतर्गत रायगड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने नुकताच रोहा तालुक्यातील धाटाव येथील तालुका क्रीडा संकुलात कला व क्रीडा महोत्सव आयोजीत करण्यात आला होता. त्यात कृषी विभागाचे रायगड जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.माणगाव उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद जाधव यांच्या …
Read More »पेणमध्ये आदिवासींच्या जमिनीतून मातीचोरी
गरिबांना आमिष दाखवून होतेय फसवणूक पेण : प्रतिनिधी तालुक्यातील हमरापूर फाट्यावरील शितोळे आदिवासीवाडी आहे. तेथील काही आदिवासींना वनहक्क कायद्यानुसार आरक्षित जमिनी मिळाल्या आहेत. या जमिनीतून मातीमाफीया आदिवासींनी धमकावून मातीची चोरी करत आहेत. आदिवासींंच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांची फसवणूक करणार्यांविरूद्ध तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे. पेण तालुक्यात सध्या मातीचोरीला उधाण …
Read More »संघाच्या शाखा या समाज परिवर्तनाचे केंद्र -अतुल भारद्वाज
खोपोली : प्रतिनिधी रा. स्व. संघाच्या शाखा या समाज परिवर्तनाचे केंद्र आहेत. संस्कारक्षम नागरिक तयार होण्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना बाल शाखेवर पाठवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन वृंदावन येथील भागवत कथाकार पूजनीय अतुल कृष्णाजी भारद्वाज यांनी शुक्रवारी (दि. 31) खोपोलीत केले. खोपोलीतील लोहाणा महाजन वाडी येथे जाखोटिया परिवाराच्या वतीने सात दिवसीय …
Read More »आदिवासींचे उपोषण यशस्वी
कशेळे ग्रामीण रुग्णालयात सुविधा पुरविण्याचे आश्वासन कर्जत : बातमीदार तालुक्यातील कशेळे ग्रामीण रुग्णालयात अनेक सुविधांची वानवा असून, त्यांची पुर्तता करावी, या मागणीसाठी आदिवासी समाजाच्या कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. मात्र जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर हे उपोषण स्थगीत करण्यात आले. शंभरच्या पुढे ओपीडीचा आकडा असलेल्या कशेळे ग्रामीण रुग्णालयात …
Read More »कुरुंग जोडरस्ता खड्डेमय; ग्रामस्थांकडून दुरुस्तीची मागणी
कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीतील कुरुंग गावाला जोडणार्या रस्त्याची गेल्या अनेक वर्षापासून दुरवस्था झाली असून, संबंधित विभाग त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. कर्जत-मुरबाड राज्य महामार्गापासून वारे-कुरुंग रस्ता जरी सुस्थितीत असला तरी कुरुंग गावात जाण्यासाठी असलेल्या जोड़ रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. कुरुंग गाव हे डोंगराळ भागात असून, ताडवाडी-खांडस …
Read More »एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक -डॉ. एस. बी. भगत
कर्जत बार्णे येथे शेतकरी-शास्त्रज्ञ मंचची बैठक उत्साहात कर्जत : प्रतिनिधी फायदेशीर शेतीसाठी भातानंतर भातऐवजी भात -भाजीपाला, भात-कडधान्य अशी पीक पद्धती अवलंबण्याची व त्यास कृषिपूरक उद्योगाची जोड देण्याची गरज आहे. शेतकर्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी तसेच शाश्वत शेतीसाठी एकात्मिक शेती पध्दतीचा अवलंब आवश्यक आहे, असे प्रतिपादन कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी …
Read More »पिंपळपाडा येथील अंगणवाडी धोकादायक; विद्यार्थी घेताहेत अंगणवाडीसेविकेच्या घरी शिक्षण
कडाव : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील मोग्रज ग्रामपंचायत हद्दीमधील पिंपळपाडा येथील अंगणवाडी सध्या अत्यंत धोकादायक अवस्थेत उभी आहे. त्यामुळे जुलै 2019पासून विद्यार्थी अंगणवाडीसेविकेच्या घरी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ येथील लोकप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणेवर तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत. रायगड जिल्हा परिषदेतर्फे सुमारे सहा लाख रुपये खर्चून मोग्रज ग्रामपंचायतमधील पिंपळपाडा …
Read More »मुलींनी गैरवर्तनाची माहिती पालकांना द्यावी; जिल्हा न्यायाधीशांचा सल्ला
अलिबाग : प्रतिनिधी आपल्या नात्यातला, ओळखीचा किंवा अनोळखी कुणीही पुरुष आपल्याशी गैरवर्तन करीत असेल, तर मुलींनी त्याची महिती आपल्या पालकांना द्यावी. त्यामुळे पुढील धोके टाळता येतील, असा सल्ला जिल्हा न्यायाधीश (प्रथम) वर्षा मोहिते यांनी येथे दिला. बालिका दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे अलिबाग येथील चिंतामणराव केळकर विद्यालयातील विद्यार्थिनींकरिता आयोजित करण्यात …
Read More »नागोठण्यापाठोपाठ कुरूळमधील गुटखा अड्ड्यावर धाड
पाली ः प्रतिनिधी संपूर्ण राज्यात गुटखाबंदी असताना रायगड जिल्ह्यातील खेड्यापाड्यात राजरोसपणे गुटखाविक्री होत असल्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने कंबर कसली आहे. पेण, नागोठणे येथील अवैध गुटखा प्रकरणातील आरोपींच्या मुसक्या आवळल्यानंतर अलिबाग कुरूळ येथील गुटखा जप्त करण्यात आला. अशा दिवसा व रात्री केव्हाही होणार्या बेधडक कारवाईमुळे गुटखाकिंग पुरते …
Read More »नागोठण्यात लाखो रुपयांचा गुटखा जप्त
नागोठणे : प्रतिनिधीअन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने नागोठणे शहरातील एका इमारतीच्या गोदामावर मध्यरात्री धाड टाकून पान मसाल्याच्या गोणींसह विविध प्रकारची रसायने ताब्यात घेतली. या मालाची किंमत 10 लाख 27 हजार 580 रुपये इतकी असून, या प्रकरणी इमारतीच्या मालकासह एकूण चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात …
Read More »