Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

नागोठण्यापाठोपाठ कुरूळमधील गुटखा अड्ड्यावर धाड

पाली ः प्रतिनिधी संपूर्ण राज्यात गुटखाबंदी असताना रायगड जिल्ह्यातील खेड्यापाड्यात राजरोसपणे गुटखाविक्री होत असल्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने कंबर कसली आहे. पेण, नागोठणे येथील अवैध गुटखा प्रकरणातील आरोपींच्या मुसक्या आवळल्यानंतर अलिबाग कुरूळ येथील गुटखा जप्त करण्यात आला. अशा दिवसा व रात्री केव्हाही होणार्‍या बेधडक कारवाईमुळे गुटखाकिंग पुरते …

Read More »

नागोठण्यात लाखो रुपयांचा गुटखा जप्त

नागोठणे : प्रतिनिधीअन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने नागोठणे शहरातील एका इमारतीच्या गोदामावर मध्यरात्री धाड टाकून पान मसाल्याच्या गोणींसह विविध प्रकारची रसायने ताब्यात घेतली. या मालाची किंमत 10 लाख 27 हजार 580 रुपये इतकी असून, या प्रकरणी इमारतीच्या मालकासह एकूण चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात …

Read More »

‘भारत बंद’ अयशस्वी

खोपोलीत व्यापारी व बंद समर्थकांमध्ये खडाजंगी; पोलिसांची मध्यस्थी खोपोली : बातमीदारनागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) आणि इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राला (इव्हीएम) विरोध दर्शविण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चा, ट्रेड युनियन्स, तसेच विविध संघटनातर्फे बुधवारी (दि. 29) पुकारण्यात आलेल्या भारत बंदला खोपोलीत गालबोट लागले. या वेळी आंदोलक आणि व्यापारी यांच्यात जोरदार …

Read More »

भाजप जिल्हा संघटन चिटणीसपदी सतीश धारप, तर जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षपदी प्रीतम पाटील

अलिबाग : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या दक्षिण रायगड जिल्हा संघटन  सरचिटणीसपदी ज्येष्ठ नेते सतीश धारप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दक्षिण रायगड जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षपदी पेणच्या नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी दिली. दक्षिण रायगड संघटनात्मकदृष्ट्या …

Read More »

वामणे रेल्वेस्थानकात सहा प्रवासी जखमी

महाड ़़: प्रतिनिधी कोकण रेल्वेच्या वामणे स्थानकात सोमवारी (दि. 27) रात्री गाडीतून उतरणारे सहा प्रवासी खाली पडले आणि काही सेकंदात गाडी सुरू झाली, मात्र हे पडलेले प्रवासी एकमेकांना आधार देत बाहेर आल्याने मोठी दुर्घटना टळली, मात्र या धडपडीत यातील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जुना फलाट काढून टाकल्याने आणि …

Read More »

नागोठण्यातून लाखो रुपयांचा गुटखा हस्तगत

नागोठणे : प्रतिनिधी पेण येथील अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने बुधवारी (दि. 29) पहाटेच्या सुमारास नागोठणे शहरातील एका इमारतीच्या गोदामावर धाड टाकून पान मसाल्याच्या गोणींसह विविध प्रकारची रसायने ताब्यात घेतली. या मालाची किंमत 10 लाख 27 हजार 580 रुपये इतकी असून इमारतीच्या मालकासह एकूण चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …

Read More »

खालापुरात संशयास्पद कार

अपघातानंतर तिघे जण फरार खोपोली : प्रतिनिधी खालापुरात आठवडाभरापूर्वी अपघात झालेली कार संशयास्पद अवस्थेत पडून आहे. अपघातानंतर कारमधील तीन जणांनी जखमी अवस्थेत पळ काढल्याने या कारचे गूढ वाढले आहे. खालापूर शहरातून द्रुतगती मार्गाला जोडरस्ता असून आठवड्यापूर्वी पहाटेच्या वेळेस सुसाट वेगाने जाणारी कार जोगावडे वाड्यानजीक वळणावर रस्ता सोडून शेतात पलटी झाली. …

Read More »

भूसुरुंग स्फोटाने घरांच्या भिंतींना भेगा

पोलादपूरच्या कशेडी घाटामध्ये महामार्गाच्या चौपदरीकरणात धमाके पोलादपूर : प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामात कशेडी घाटामधील चोळई आणि धामणदिवी गावांच्या सीमेवर डोंगर फोडण्यासाठी करण्यात आलेल्या भूसुरुंगाने परिसरात हादरे बसून अनेक घरांना तडे गेले. त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.कशेडी घाटात मंगळवारी (दि. 28) दुपारी चार वाजल्यापासून एल अँड टी या ठेकेदार …

Read More »

कुलाबा किल्ल्यात माघी गणेशोत्सव उत्साहात

अलिबाग ़: प्रतिनिधी येथील कुलाबा किल्ल्यातील आंग्रेकालीन गणेश मंदिरात मंगळवारी (दि. 28) खास माघी गणेशोत्सव साजरा करण्यात आला. पहाटे काकड आरतीने या उत्सवाला प्रारंभ झाला. सकाळी ओहोटीची वेळ साधत भाविकांनी गणेश पंचायतनाचे दर्शन घेतले. यानिमित्ताने किल्ल्यात ठिकठिकाणी रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या. संपूर्ण किल्ल्यावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. माघी गणेशोत्सवानिमित्त …

Read More »

एक्सर्बिया आणि शेतकरी वाद पुन्हा ऐरणीवर

भाडेकराराचे पैसे दिले नाहीत म्हणून शेतकर्‍यांनी केला कंपनीचा रस्ता बंद कर्जत : बातमीदार तालुक्यातील वरई तर्फे वरेडी येथे गृहप्रकल्प असलेल्या एक्सर्बिया कंपनीचा रस्ता शेतकर्‍यांनी बंद केला आहे. कंपनीचा रस्ता स्थानिक शेतकर्‍यांच्या जागेतून असून, त्याबाबत शेतकरी व कंपनी दोघांमध्ये भाडेकरार झाला होता, मात्र त्या करारानुसार पैसे मिळाले नसल्याने आपण अखेरचे पाऊल …

Read More »