Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

नागरिकत्व सुधारणा कायदा समर्थनार्थ आज खोपोलीत रॅली

खोपोली : प्रतिनिधी भारतीय संविधानातील सर्व संसदीय कार्यप्रणालीचा अवलंब करून बहुमताने नागरिकत्व सुधारणा कायदा लोकसभेत व राज्यसभेत मंजूर झाला. या कायद्याच्या जनजागृती व समर्थनार्थ  जागरूक नागरिक मंचाच्या वतीने रविवारी (दि. 12) सकाळी 10 ते 12. 30 या दरम्यान खोपोलीत रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीची सुरूवात शहरातील फायर ब्रिगेड …

Read More »

मुरूडमध्ये उलटी-जुलाबाची साथ

डोंगरीत 50पेक्षा जास्त रुग्ण; आंबोली, एकदरातही बाधा मुरुड : प्रतिनिधी तालुक्यातील डोंगरी, आंबोली व एकदरा गावांत दूषित पाण्यामुळे उलटी जुलाबाची साथ सुरु झाली असून, रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. दरम्यान, या प्रकारामुळे आरोग्य खाते खडबडून जागे झाले असून, रुग्णांची काळजी घेण्यात यंत्रणा व्यस्त झाली आहे. डोंगरी, आंबोली व एकदरा या …

Read More »

नेरळ पोलिसांकडून विद्यार्थ्यांना ब्लँकेट वाटप

कर्जत : बातमीदार पोलीस दलाकडून सध्या रेझिंग डे सप्ताह साजरा करण्यात येत असून या सप्ताहानिमित्त नेरळ पोलिसांकडून गरजू विद्यार्थ्यांना दिले जाणारे ब्लँकेट ही त्यांच्यासाठी मायेची ऊब आणि पोलीस दलाविषयी आदर निर्माण करणारी आहे, असे मत पोलीस उपअधीक्षक अनिल घेरडीकर यांनी व्यक्त केले. रेझिंग डे निमित्त शालेय विद्यार्थ्यांना नेरळ पोलीस दलाकडून …

Read More »

मुख्याध्यापक आणि शिक्षकांसाठी रोहा तालुक्यात निष्ठा प्रशिक्षण

रोहे ः प्रतिनिधी   राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद  आणि राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद  नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने कोलाड  येथील द. ग. तटकरे माध्यमिक विद्यालयात रोहा तालुक्यातील मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्या समग्र प्रगतीसाठी निष्ठा प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. वर्गातील आंतरक्रिया, कृतीयुक्त अध्ययन, शैक्षणिक नेतृत्व विकास एकुणच …

Read More »

पोक्सो प्रकरणातील आरोपी शिक्षकाला सशर्त जामीन

पोलादपूर : रायगड जिल्हा परिषदेच्या चोळई (ता. पोलादपूर) येथील प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी आलेल्या नातेवाईक अल्पवयीन मुलीचा विनयभंग आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी शिक्षकास माणगाव येथील विशेष जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश प्रिया बनकर यांनी सशर्त जामीन मंजूर केला आहे. चोळई प्राथमिक शाळेमध्ये 31 डिसेंबर 2019 रोजी पीडित अल्पवयीन मुलीबाबत केलेली  …

Read More »

धोकादायक वावंढळ पुलाची अभियंत्यांकडून पाहणी

खोपोली : प्रतिनिधी मुंबई – पुणे महामार्गावरील वावंढळ येथील धोकादायक पुलाची गुरूवारी (दि. 9) नॅशनल रोडवेज सोल्यूशनचे अभियंता धनंजय शिंदे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी पुलाच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे. सोमवारी सकाळी कापसाची पोती घेवून पनवेलकडे जाणारा ट्रक खालापूर तालुक्यातील वावंढळ येथील पुलावरून ओढ्यात कोसळला होता. तो …

Read More »

जेएसडब्ल्यूच्या प्लांटमध्ये आग; एक ठार, दोन जखमी

पेण : प्रतिनिधी डोलवी येथील जेएसडब्ल्यू कंपनीच्या सेंटर टू ऑपरेशन प्लांटमध्ये बुधवारी रात्री आग लागल्याची घटना घडली. त्यात  एक कामगार जागीच ठार झाला असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत. भरत साहू (रा. छत्तीसगड) असे मृत कामगाराचे नाव आहे. या अपघाताला कंपनी प्रशासनाने दुजोरा दिला आहे. भरत साहू, परेश (आडनाव समजले …

Read More »

नाण्याचा माळ शाळेला इमारत नाही, शिक्षिकेचीही चार महिन्यांपासून दांडी, रायगड जि. प.चा प्रताप

कर्जत : बातमीदार तालुक्यातील आसल ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेल्या नाण्याचा माळ येथे असलेली रायगड जिल्हा परिषदेची शाळा स्वतःची इमारत नसल्याने गेली अनेक वर्षे एका घरात भरविली जात आहे. तर पनवेल येथून बदली होऊन आलेल्या शिक्षिका या शाळेत गेल्या चार महिन्यांपासून आल्याच नाहीत. दरम्यान, शाळेच्या इमारतीचा आणि शाळेवर मंजूर पटानुसार असलेला शिक्षक …

Read More »

चोरी केल्याप्रकरणी आरोपीला शिक्षा

अलिबाग मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांचा निर्णय अलिबाग : प्रतिनिधी  चेंढरे येथील बाफना बाग सोसायटीत चोरी केल्या प्रकरणी आरोपी अनिल विठ्ठल चव्हाण याला अलिबागच्या मुख्य न्यादंडाधिकार्‍यांनी तीन महिन्यांची शिक्षा सुनावली. बाफना बाग सोसायटीतून 28 ऑक्टोबर 2019 रोजी पाण्याचा पंप आणि दुर्मिळ पितळी घंटा चोरीला गेली होती. या संदर्भात अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात …

Read More »

बदलत्या वातावरणाचा आंबा पिकाला धोका

किडरोग पडण्याची शक्यता, औषध फवारणी करण्याचे कृषी विभागाचे आवाहन महाड : प्रतिनिधी गेल्या कांही दिवसांपासून वातावरणांत सातत्याने होत असलेल्या बदलामुळे आंबा पिक धोक्यात आले आहे. या बदलामुळे मोहोरावर कीड निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकर्‍यांनी विषेश काळजी करणे आवश्यक आहे. शेतकर्‍यांनी आंबा पिकावर नियमित औषध फवारणी करावी, असे आवाहन महाड …

Read More »