Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

बदलत्या वातावरणाचा आंबा पिकाला धोका

किडरोग पडण्याची शक्यता, औषध फवारणी करण्याचे कृषी विभागाचे आवाहन महाड : प्रतिनिधी गेल्या कांही दिवसांपासून वातावरणांत सातत्याने होत असलेल्या बदलामुळे आंबा पिक धोक्यात आले आहे. या बदलामुळे मोहोरावर कीड निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकर्‍यांनी विषेश काळजी करणे आवश्यक आहे. शेतकर्‍यांनी आंबा पिकावर नियमित औषध फवारणी करावी, असे आवाहन महाड …

Read More »

रायगडावर स्वच्छता मोहीम

भारतीय नौदल आणि महसूल विभागाचा उपक्रम महाड : प्रतिनिधी भारतीय नौदल आणि महाड महसूल विभाग यांच्या संयुक्त वतीने गुरुवारी (दि. 9) सकाळी किल्ले रायगडावर स्वच्छता अभियान राबवण्यात आले. त्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीदेखील सहभाग घेतला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचे ठिकाण असलेला रायगड किल्ला प्लास्टिकमुक्त करणे आणि या ठिकाणी स्वच्छता राखणे आपले …

Read More »

वाशी विभागाची भातखरेदी केंद्राची गरज पूर्ण

आमदार रविशेठ पाटील यांचे प्रतिपादन पेण : प्रतिनिधी  दि. महाराष्ट्र स्टेट को. ओ. मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने पेण तालुक्यातील वाशी येथे सुरू करण्यात आलेल्या आधारभूत भात खरेदी केंद्राचे उद्घाटन गुरुवारी (दि. 9) आमदार रविशेठ पाटील  यांच्या हस्ते करण्यात आले. या केंद्रामुळे वाशी विभागातील भात खरेदी केंद्राची गरज पूर्ण झाली असल्याचे प्रतिपादन …

Read More »

नेरळमध्ये दिनदर्शिकेचे प्रकाशन

कर्जत : प्रतिनिधी नेरळ येथील आगरी समाज संघटनेच्या सामाजिक सभागृहात नुकतेच कर्जत तालुका आगरी समाज संघटनेच्या 2020 या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी संघटनेचे अध्यक्ष सावळाराम जाधव, उपाध्यक्ष भगवान धुळे, सचिव शिवराम महाराज तुपे तसेच मनीषा दळवी, अरुण कराळे, भूषण पेमारे, सुरेश गोमारे, संतोष ऐनकर, दिलीप शेळके आदी पदाधिकार्‍यांसह …

Read More »

राज्यस्तरीय पक्षीमित्र संमेलनाची रेवदंड्यात जोरदार तयारी

रेवदंडा : प्रतिनिधी अमेझिंग नेचर संस्थेच्या विद्यमाने 11 आणि 12 जानेवारी रोजी रेवदंडा येथे 33वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन आयोजित करण्यात आले आहे. रेवदंडा मोठे बंदर येथील भंडारी समाज सभागृहात या संमेलनाची जोरदार तयारी सुरू आहे. रेवदंडा येथील अमेझिंग नेचर संस्थेने आयोजित केलेल्या या दोन दिवसीय पक्षीमित्र संमेलनाचा शुभारंभ शनिवारी (दि. …

Read More »

नागोठण्यात धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सहकार्याने शासकीय दाखल्यांचे वाटप

नागोठणे : प्रतिनिधी सामाजिक कार्याच्या माध्यमातून शासकीय योजना उपेक्षितांपर्यंत पोहोचविणे हे एक सत्कार्यच आहे व असे कार्य डॉ. धर्माधिकारी प्रतिष्ठान करत असल्याने हे प्रतिष्ठान निश्चितच गौरवास्पद असल्याचे गौरवोद्गार रोह्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. यशवंतराव माने यांनी गुरुवारी (दि. 9) नागोठणे येथे काढले. नागोठणे येथील जोगेश्वरी रंगमंचावर गुरुवारी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या …

Read More »

महानगर गॅसचा रात्रीस खेळ चाले…

अंधारातही पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू खालापूर : अरुण नलावडे मुंबई-पुणे महामार्गालगत पनवेल ते खोपोलीदरम्यान महानगर गॅस कंपनीची पाईपलाईन टाकण्यात येत आहे. त्यासाठी महामार्गाच्या बाजूने तीन मीटर अंतरावर खोदकाम सुरू असून, रात्रीच्या वेळेस कुठलीही दक्षता न घेता गॅस पाईप जोडण्यात येत आहेत. त्याकरिता लागणारे जेसीबी मशीन, पोकलण, हायड्रा तसेच वेल्डिंग करण्याचे …

Read More »

आंबेत घाटात रिक्षा अपघात; तीन परदेशी तरुणी जखमी

माणगाव : प्रतिनिधी     पर्यटनासाठी आलेल्या परदेशी तरुणींच्या रिक्षाला अपघात झाल्याने तीन तरुणी जखमी झाल्याची घटना आंबेत गावाजवळील घाटात बुधवारी (दि. 8) सकाळी घडली. ब्रोनिया लेवीस वय 28, क्लेअर किलर वय 28, इमा लमारी वय 25 सर्व रा.ऑस्ट्रेलीया, ह्या भारतात दि. 2 ते 15 जानेवारी दरम्यान फिरायला आल्या होत्या. बुधवारी आंबेत …

Read More »

मच्छीमारांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

प्रलंबित मागण्यांसाठी असोसिएशनच्या माध्यमातून काढण्यात आला मोर्चा अलिबाग : प्रतिनिधी आधुनिक पध्दतीने मासेमारीला परवानगी द्या या प्रमुख मागणीसह इतर प्रलंबित मागण्यासाठी वेस्ट कोस्ट पर्सेसीन नेट वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आहे. यात मोठ्या संख्येनी मच्छीमार सहभागी झाले होते. पारंपरीक मच्छीमार आणि पर्ससीन मच्छीमार यांच्यातील वादामुळे रायगड जिल्ह्यात आधुनिक …

Read More »

कर्जतमध्ये कीर्तन महोत्सवाची सांगता

कर्जत : प्रतिनिधी श्री ज्ञानेश्वरी पारायण व ज्ञानयज्ञ सोहळा समितीच्या वतीने कर्जतमधील माऊली मैदानावर यंदा 42व्या वर्षी कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी सकाळी ह.भ.प. मारुती महाराज राणे यांच्या काल्याच्या कीर्तनाने सात दिवस चाललेल्या या महोत्सवाची सांगता झाली. त्यानंतर शौर्य शिवाजी भासे या कृष्ण वेषधारी चिमुरड्याच्या हस्ते हंडी फोडण्यात …

Read More »