Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

जिल्हा परिषद अध्यक्षपदाची आज निवडणूक अलिबाग : रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी शुक्रवारी (दि. 3) निवडणूक होत आहे. यात शिवसेना नेमकी काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 59 सदस्यांच्या जिप सभागृहात शेकापचे 23, राष्ट्रवादीचे 11, शिवसेना 18, तर भाजप व काँग्रेसचे तीन सदस्य आहेत. आदिती तटकरे विधानसभेत …

Read More »

मंगेश घासे यांची एनआयएस कबड्डी कोच कोर्ससाठी निवड

पाली ः प्रतिनिधी शिहू बेणसे विभागातील मुंढाणी गावचे सुपुत्र, भारतीय सैनिक तथा जे. जे. पाटील सर यांचे शिष्य असलेल्या मंगेश नामदेव घासे यांची स्पोर्ट्स अ‍ॅथोरिटी ऑफ इंडियामार्फत (पटियाला) येथे  होणार्‍या  एन. आय. एस. कबड्डी कोच कोर्ससाठी निवड झाली आहे. मंगेश घासे  श्री गावदेवी  क्रीडा मंडळ  संघाचा उत्कृष्ट व नावाजलेला खेळाडू …

Read More »

रायगडात नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत

अलिबाग : प्रतिनिधीफटाक्यांची आतषबाजी करीत रायगड जिल्ह्यामध्ये सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.  थर्टी फर्स्ट आणि नववर्षाच्या स्वागतासाठी रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनार्‍यांवर दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. यंदा सुटीचा दिवस नव्हता तरीही किनार्‍यांवरील गाव-वाड्यांमध्ये पर्यटक हजारोंच्या संख्येने आले होते. अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन, बोर्ली पंचतन, काशिद, आवास, नागाव, …

Read More »

तीन पिढ्यांची एकाच वेळी रायगड प्रदक्षिणा

महाड : प्रतिनिधी येथील युथ क्लबने आयोजित केलेल्या रायगड प्रदक्षिणेमध्ये आजोबा, मुलगा आणि नातवाने एकाच वेळी सहभाग घेतला होता. पाच वेळा रायगडला प्रदक्षिणा करणारे 69 वर्षीय विनायक केळकर आणि 75 वर्षांचे देशपांडे आजोबा यांनी त्यांचा मुलगा व नातवासह ही प्रदक्षिणा पूर्ण केली. युथ क्लबच्या या विक्रमी व शिस्तबद्ध रायगड प्रदक्षिणेने …

Read More »

टँकरमधील केमिकलमुळे सावित्री नदीतील मासे मृत्युमुखी

पोलादपूर : प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत वाहणार्‍या सावित्री नदीपात्राजवळच्या जमिनीवर शनिवारी (दि. 28) पहाटे एका टँकरमधून विषारी केमिकल जमिनीवर सोडण्यात आले. त्यानंतर वायू प्रदूषण होऊ लागल्याने या मातीवर पाण्याचा मारा करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, ते पाणी सावित्री नदीपात्रात गेल्याने हजारो मासे मृत्युमुखी पडून पाण्यावर तरंगू लागले. पोलादपूर तालुक्यातील पार्ले आणि …

Read More »

मुरूडकिनारी पर्यटकांकडून नववर्षाचे स्वागत

मुरूड : प्रतिनिधी पर्यटन महोत्सवामधील प्रसिद्ध कलाकारांच्या न्यू ईअर कल्ला या कार्यक्रमात बेधुंद संगीतावर ताल धरत सुमारे 20 हजार पर्यटकांनी मुरूडच्या समुद्र किनार्‍यावर सरत्या वर्षाला बाय बाय करत नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत केले. मंगळवारी सायंकाळपासून मुरूड समुद्रकिनार्‍यावर पर्यटकांची गर्दी झाली होती. पर्यटक सायंकाळच्या सप्तरंगात घोडागाडीची सफर करताना दिसत होते. तर …

Read More »

खोपोलीतील रस्ता नामकरणाची मागणी

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी सुभाषनगर खोपोली येथील ग्रामस्थांनी शहरातील मस्को गेट ते सुभाषनगर या रस्त्याचे  कै. सखाराम गेणु जाधव मार्ग असे नामकरण करावे, अशी मागणी सुभाषनगर ग्रामस्थांनी केली आहे. या मागणीचे निवेदन ग्रामस्थांच्या वतीने खोपोली नगर परिषदेला देण्यात आले आहे. खोपोली शहरातील मस्को गेट ते सुभाषनगर हा 50 वर्षे जुना …

Read More »

ज्यांच्या बोटी नाहीत ते मच्छीमारांमध्ये वाद निर्माण करताहेत

वेस्ट कोस्ट पर्ससीन नेट वेल्फेअर असोसिएशनचा आरोप अलिबाग : प्रतिनिधी पारंपरिक मच्छीमारी करणारेदेखील नियम पळत नाहीत. ज्यांच्या बोटी नाहीत ते मच्छीमारांचे नेते बनलेत. हेच लोक मच्छीमारांमध्ये वाद निर्माण करत आहेत. त्यांच्या दबावाखाली येऊन पर्ससीन नेट मासेमारी करणार्‍यांवर मत्स्य विभागाकडून कारवाई केली जात आहे, असा आरोप वेस्ट कोस्ट पर्ससीन नेट वेल्फेअर …

Read More »

गावाचे नाव मोठे करा -आमदार रविशेठ पाटील

पेण : प्रतिनिधी विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घ्यावे आणि मोठे व्हावे तसेच  गावाचे नाव मोठे करावे, असे आवाहन आमदार रविशेठ पाटील यांनी नुकतेच रावे (ता. पेण) येथे केले. सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या रावे येथील सार्वजनिक माध्यमिक विद्या मंदिराचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिके वितरण समारंभ नुकताच पार पडला. त्या वेळी आमदार रविशेठ पाटील …

Read More »

म्हसळ्यात माकडांचा उपद्रव; नागरिक त्रस्त

म्हसळा : प्रतिनिधी गेल्या काही वर्षांपासून म्हसळा शहर आणि  ग्रामीण भागामध्ये माकडांनी हैदोस घातला आहे. ही माकडे पिकांचे व अन्य साहित्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करीत असल्यामुळे नागरिक विशेषत: महिला त्रस्त झाल्या आहेत, मात्र या माकडांची तक्रार कोणाकडे करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. समृद्ध वनसंपदा लाभलेल्या म्हसळा तालुक्यात आता वन्यप्राणी …

Read More »