Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

स्वागत करू या नववर्षाचे!

धर्म कोणताही असो; पंथ कोणताही असो, सांप्रदाय कोणताही असो, नवीन विचारांचे – नव संकल्पांचे स्वागत हे सर्वांनीच आजपर्यंत मोठ्या उत्साहाने केले आहे. परिवर्तन हा निसर्गाचा नियम सर्वांना मान्य करावा लागतो. काळ बदलतो तसे विचारही बदलतात. रोजचा दिनही काहीतरी नवीन बरोबर घेऊन उगवतो आणि पुन्हा जुन्या घटनांना बुडवून नवीन प्रभात घेऊन …

Read More »

माणगावात दिनदर्शिका प्रकाशन सोहळा

माणगाव : प्रतिनिधी कलगीतुरा सांस्कृतिक शाहिरी कला मंडळाच्या वतीने रविवारी (दि. 29) सायंकाळी लोणेरे येेथील सोनभैरव रंगमंचावर झालेल्या कार्यक्रमात गुरुवर्य पांडुरंगबुवा नांदवीकर व शाहीर कृष्णा शिवराम उतेकर यांना जीवन गौरव शाहीर कला भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष रामभाऊ टेंबे यांच्या अध्यक्षतेखाली व समाजनेते चंद्रकांत धोंडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत …

Read More »

आशा स्वयंसेविकांची रायगड जिल्हा परिषदेवर धडक

अलिबाग : प्रतिनिधी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांची पूर्तता व्हावी, यासाठी रायगड जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांनी सोमवारी (दि. 30) रायगड जिल्हा परिषद कार्यालयावर धडक दिली. जिल्हाभरातील 500 आशा स्वयंसेविका या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. आशा स्वयंसेविकांना शासकीय कर्मचार्‍यांचा दर्जा देऊन 18 हजार रुपये किमान वेतन द्यावे, सार्वजनिक आरोग्य सेवांचे खासगीकरण करू नये, …

Read More »

समाजाचेही हित जोपासा -आमदार रविशेठ पाटील, पेणमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

पेण : प्रतिनिधी आगरी समाज बांधवांनी स्वतःची उन्नती साधताना आपल्या समाजाचेही हित जोपासावे, असे प्रतिपादन आमदार रविशेठ पाटील यांनी पेण येथे केले. पेण तालुका आगरी समाज विकास मंचच्या वतीने पेणमधील आगरी समाज हॉलमध्ये समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. आगरी समाज विकास मंचाचे अध्यक्ष …

Read More »

थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी रायगड हाऊसफुल्ल!

अलिबाग : प्रतिनिधीसरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनार्‍यांना पसंती मिळत आहे. पर्यटक मोठ्या प्रमाणावर रायगडात येण्यास सुरुवात झाल्याने जवळपास सर्व पर्यटनस्थळे हाऊसफुल्ल झाले आहेत. थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी गोव्यापाठोपाठ रायगड जिल्हा पर्यटकांचे फेव्हरिट डेस्टिनेशन आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी दरवर्षी …

Read More »

अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी शिक्षकाला दहा वर्षाचा कारावास

अलिबाग : प्रतिनिधी जादा शिकवणी घेण्याच्या बहाण्याने पीडित अल्पवयीन मुलीवर शिकवणी शिक्षकाने वारंवार बलात्कार केल्याच्या आरोपाखाली त्या शिक्षकाला जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवून दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अक्षय रंगराव पाटील (22) असे शिक्षा झालेल्या आरोपीची नाव आहे. खांदा पनवेल येथे राहणार्‍या अक्षय पाटील याच्याकडे पीडित मुलगी शिकवणीसाठी जात …

Read More »

खोपोली नगर पालिकेच्या नवीन वास्तूस, छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव द्यावे; भाजपची मागणी

खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील वासरांग रस्त्यावर खोपोली नगर पालिकेची नवीन वस्तू उभारण्यात आली आहे. त्या वास्तूस छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी सोमवारी (दि. 30) भाजपाचे परिवहन सभापती तुकाराम साबळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने केली. छत्रपती शिवाजी महाराज समस्त महाराष्ट्राचे दैवत असल्याने त्यांच्या कालावधीत खर्‍या अर्थाने …

Read More »

खोपोलीजवळ टेम्पोचा भीषण अपघात; तिघे जागीच ठार, एकजण गंभीर जखमी

खोपोली, खालापूर : प्रतिनिधीमुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर विशेषतः खंडाळा घाटात अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अपघातांची ही मालिका सुरूच असून, रविवारी (दि. 29) दुपारी 12.30च्या सुमारास एक्स्प्रेस वेमार्गे खोपोली बाह्यवळण रस्त्याजवळ एका टेम्पोचा अपघात होऊन आतील तीन कामगार जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी आहे. नागपूरहून नागोठणे येथे लोखंडी …

Read More »

‘आध्यात्मिक साधना सर्व शारीरिक व्याधींपासून दूर ठेवते’

मुरूड ः प्रतिनिधी मुरूडजवळील डोंगरी गावात श्री स्वामी समर्थ मठ गेली अनेक वर्षे उत्तमरीत्या काम करीत आहे. निसर्गरम्य डोंगरी गावात समुद्रासमोर विशाल अशा मठात हजारो भक्त रोज दर्शनासाठी येतात व स्वामीभक्त त्रिशाताई भक्तांशी संवाद साधतात. त्या स्ववादातून हजारो भक्तांची गार्‍हाणी ही शारीरिक व्याधींची असतात. म्हणूनच त्रिशाताई यांनी मुरूड शहरात माली …

Read More »

सिद्धगडावर बलिदान दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा

कर्जत ः प्रतिनिधी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात मुरबाड तालुक्यातील सिद्धगड येथे हुतात्मा झालेल्या वीर हुतात्मा भाई कोतवाल व वीर हुतात्मा हिराजी पाटील यांना आदरांजली वाहण्यासाठी 1 आणि 2 जानेवारी 2020 रोजी सिद्धगडावर विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा व देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती सिद्धगड स्मारक समितीचे अध्यक्ष माजी आमदार गोटीराम पवार …

Read More »