Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

‘वीज बिल वसुलीसोबतच ग्राहकसेवेला प्राधान्य द्या’

पेण ः प्रतिनिधी थकबाकी वसुली व वीजचोरांविरूद्ध मोहीम राबवण्यासोबत सर्वोत्तम ग्राहकसेवेला प्राधान्य देण्याचे निर्देश कोकण प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिले आहेत. पेण, अलिबाग आणि पनवेल ग्रामीण येथे उपविभागीय अभियंता ते शाखा अभियंत्यांपर्यंतच्या आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. या वेळी पेण मंडळ कार्यालयाचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील, …

Read More »

मुंबई-मांडवा जलवाहतुकीच्या फेर्‍यांमध्ये वाढ

अलिबाग ः प्रतिनिधी सरत्या वर्षाला निरोप देण्याबरोबरच उगवत्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने अलिबागकडे येण्यास सुरुवात झाली आहे. गेट वे येथून जलवाहतुकीने आरामदायी प्रवास करीत पर्यटक मांडवा बंदरात दाखल होत आहेत. मुंबईकडून अलिबागकडे जलवाहतुकीने येणार्‍या पर्यटकांची वाढती संख्या पाहून पुढील चार दिवस बोटींच्या फेर्‍या वाढवण्यात आल्या आहेत. दररोज साधारणपणे …

Read More »

जांभूळपाडा अंगणवाडी दुरुस्तीच्या प्रतीक्षेत

सुधागड ः प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा गावामध्ये असलेल्या अंगणवाडीची इमारत कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.जांभूळपाडा येथील अंगणवाडी बांधून 36 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्यामुळे इमारत मोडकळीला आली आहे. पावसाळ्याच्या दिवासात तर अनेक ठिकाणी पाणीगळती होते. काही ठिकाणी भिंती मोडकळीस आल्या आहेत. त्यामुळे  अंगणवाडीसेविका आणि मदतनीसांना मुलांसाठी आणलेला पोषण आहार …

Read More »

मोरबे धरणपात्रातील वाळूउपसा थांबवा, बोरगाव ग्रामस्थांचे तहसीलदारांना साकडे

खोपोली ः प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील सर्वांत मोठे धरण असलेल्या मोरबे धरणपात्रात जाणार्‍या धावरी नदी परिसरात वाळूमाफियांनी धुडगूस घातला असून, या माफियांना वेळीच आवरा, अशा आशयाचे लेखी निवेदन बोरगाव खुर्द आणि सोंडेवाडी ग्रामस्थांनी खालापूर तहसील कार्यालयात दिले आहे. माथेरानच्या पायथ्याशी मोरबे धरण आहे. या धरणालगत असलेली गावे, वाड्या बफर झोनमध्ये येत …

Read More »

बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी पालीत भाविकांची गर्दी; प्रचंड वाहतूक कोंडी

पाली ः प्रतिनिधी अष्टविनायक देवस्थानांपैकी एक बल्लाळेश्वराचे स्थान असलेल्या पालीत नाताळच्या सुटीनिमित्त मोठी गर्दी होत आहे. बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. हजारोंच्या संख्येने भाविक व त्यांची वाहने दाखल होत असल्याने वाहतूक कोंडी झाली होती. नाताळपासून सुरू झालेली भाविकांची गर्दी थेट जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत राहील. कारण नाताळच्या सुट्या, नवीन …

Read More »

पोलीस ठाण्याची पडीक इमारत ठरतेय अवैध धंद्यांचे ठिकाण

खालापूर : प्रतिनिधी औद्योगिक वसाहत व बोरघाटातील वाहतुकीचा ताण तसेच शहराची झपाट्याने होणारी वाढ या कारणाने खोपोलीत 1972 मध्ये नव्याने पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली होती. सुरुवातीला रायगड जिल्हा परिषदेच्या मालकीच्या ग्रामीण विकास यंत्रणा विक्री केंद्राच्या इमारतीमध्ये भाडेपट्ट्यावर खोपोली पोलीस ठाण्याचे कार्य चालू होते, मात्र 10 वर्षांपूर्वी खोपोली पोलीस ठाणे …

Read More »

श्रीसदस्यांतर्फे श्रमदानातून वनराई बंधारा

पोलादपूर ः प्रतिनिधी तालुक्यातील तुर्भे खुर्द येथे पोलादपूर तालुक्यातील श्री सदस्यांच्या वतीने 2019 वर्षातील अखेरच्या रविवारी (दि. 29) श्रमदान करून सावित्री नदीच्या उपनदीवर वनराई बंधारा बांधण्यात आला. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या पोलादपूर परिसरातील श्री सदस्यांच्या वतीने रविवारी तालुक्यातील तुर्भे खुर्द येथील उपनदीवर सामूहिक श्रमदानातून वनराई बंधार्‍याची निर्मिती करण्यात आली. ज्येष्ठ …

Read More »

रायगड किल्ला रोप वे कंपनीला जिल्हाधिकार्‍यांची नोटीस

अलिबाग : प्रतिनिधीरायगड किल्ल्यावरील रोप वेच्या संचालक कंपनीला जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नोटीस बजावली आहे. पुरातत्व विभाग आणि संबधित यंत्रणांच्या परवानगीशिवाय रोप वे प्रकल्पाच्या क्षमतावृद्धीचे काम सुरू केल्यामुळे ही नोटीस बजावण्यात आली आहे. रायगड किल्ला प्राधीकरणचे अध्यक्ष खासदार संभाजी राजे यांनी या कामावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने …

Read More »

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ‘रमाधाम’ला भेट

शिवसेना नगरसेविका, कार्यकर्त्यांसह प्रसारमाध्यमांना पोलिसांनी रोखले खोपोली : प्रतिनिधीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (दि. 28) खोपोली येथील रमाधाम वृद्धाश्रमास भेट दिली. हा त्यांचा खासगी दौरा असल्याचे सांगत या वेळी पोलिसांनी प्रसारमाध्यमांना ‘रमाधाम’च्या प्रवेशद्वारावर रोखल्याने पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली. सुरक्षेचे कारण सांगून पोलिसांनी शिवसेनेच्या नगरसेविका व कार्यकर्त्यांनाही मज्जाव केला. रमाधाम वृद्धाश्रमातील …

Read More »

बनावट नोटा छापणारी दुकल अटकेत; अलिबागमध्ये कारवाई

अलिबाग : प्रतिनिधी बनावट नोटा छापणार्‍या दोन जणांना रायगड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली असून, त्यांच्याकडून एक लाख 14 हजार 600 रुपयांच्या बनावट नोटा, तसेच स्कॅनर प्रिंटर जप्त केले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जे. ए. शेख यांना अलिबाग शहरातील मेघा टॉकिज परिसरात काही इसम …

Read More »