कर्जत ़: बातमीदार नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी वाड्यांना जोडणारा पूल मार्च 2018 मध्ये कोसळला आहे. त्या ठिकाणी नवीन पूल निर्मितीसाठी नेरळ विकास प्राधिकरणाने निधी दिला आहे, येथे नवीन पूल बांधण्यासाठी तब्बल दोनवेळा भूमिपूजने करण्यात आली आहेत, मात्र अद्याप त्या पुलाच्या कामाला सुरुवात झालेली नाही. दरम्यान, नेरळ विकास प्राधिकरण विरुद्ध आदिवासी …
Read More »एसटीचे नुकसान केल्याप्रकरणी टेम्पोचालकावर गुन्हा दाखल
पेण : प्रतिनिधी पेण-खोपोली मार्गावर धामणी गावाच्या हद्दीत एसटी बस अडवून बस चालकाला शिवीगाळी करून एसटी बसचे दोन्ही बाजूचे आरसे फोडून नुकसान केल्याप्रकरणी अज्ञात टेम्पो चालकाविरोधात पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसटी बस (एमएच-20,डी-8921) गुरूवारी (दि. 19) सकाळी 11 वाजता पेण-खोपोली मार्गाने जात होती. धामणी गावाच्या हद्दीत …
Read More »चाकूच्या धाकाने लुटणारी चौकडी जेरबंद, दीड लाखाचा माल हस्तगत
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी चाकूच्या धाक दाखवून चौक येथील कृष्णा सीताराम मुकादम (वय 43) यांच्या जवळील सोन्याची चेन, बाली आणि मोबाईल असा दिड लाखाचा ऐवज लुटणार्या चौकडीच्या खालापूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. चौकमधील गावदेवी मंदिराजवळ असलेल्या नवरत्न हॉटेल येथे शनिवारी (दि. 18) संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कृष्णा मुकादम यांना चार …
Read More »माणगाव भाजप अध्यक्षपदी संजय ढवळे यांची बिनविरोध फेरनिवड
माणगाव : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या माणगाव तालुका अध्यक्षपदी संजयआप्पा ढवळे यांची शुक्रवारी (दि. 20) बिनविरोध फेरनिवड करण्यात आली. भाजपची संघटनात्मक निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्याचा एक भाग म्हणून माणगाव तालुका भाजपची बैठक शुक्रवारी निवडणूक निर्णय अधिकारी रमेश मुंढे यांच्या अधिपत्याखाली येथील खरे मंगल कार्यालयात घेण्यात आली. त्यात नामनिर्देशन …
Read More »नुकसानग्रस्त शेतकर्यांना मदत व कोळी बांधवांना डिझेल परतावा मिळावा, आमदार रविशेठ पाटील यांची अधिवेशनात मागणी
पेण : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळावी त्याचबरोबर कोळी बांधवाना डिझेल परतावा मिळावा, अशी आग्रही मागणी आमदार रविशेठ पाटील यांनी नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केली. समुद्रामध्ये वारंवार होणार्या वादळांमुळे मच्छिमारांना मच्छी मिळणे मुश्किल झाल्यामुळे दुष्काळ जाहीर करून रायगडमधील कोळीबांधवांना डिझेल परतावा मिळावा, तसेच शेतकर्यांना नुकसान भरपाईपोटी करण्यात …
Read More »कर्जतचे शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत, महाविकास आघाडी सरकारच्या काळात बळीराजाकडे पाठ
कर्जत : बातमीदार पावसाळ्यातील भातपिकाच्या नुकसानीबद्दल मदतीचा पहिला टप्पा म्हणून राज्य शासनाने 27 नोव्हेंबर 2019 रोजी कर्जत तालुक्यातील 1612 शेतकर्यांना त्यांच्या बँक खात्यात मदत जमा केली होती. मात्र त्यानंतर आजपर्यंत नुकसानग्रस्त असलेल्या आणि शेतीचे पंचनामे झालेल्या 8432 शेतकर्यांना अद्याप शासनाची मदत मिळालेली नाही. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर कर्जत …
Read More »एक्स्प्रेस वेवरून कोसळला रसायनाने भरलेला टँकर, ट्रान्सफार्मर फुटला; तीन तास वाहतूक ठप्प
खोपोली ़: प्रतिनिधी एक्स्प्रेस वेवरून पुण्याकडून मुंबईकडे येणारा रसायन भरलेला टँकर गुरुवारी (दि. 19) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास खोपोलीजवळील पुलावरून खाली आडोशी-ताकई रस्त्यावर कोसळला. सदर टँकर विद्युत ट्रान्सफरला धडक देऊन कोसळल्याने मोठा आवाज होऊन ट्रान्सफार्मर फुटला व टँकरला आग लागली. यानंतर आडोशी रस्त्यावर आगीचे मोठमोठे लोट निघायला सुरुवात झाली. या …
Read More »अलिबाग येथील धरणे आंदोलनावर शिक्षक परिषद ठाम
विविध संघटनांचा पाठिंबा अलिबाग : प्रतिनिधी प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर राज्य शासन व रायगड जिल्हा परिषदेचे होत असलेल्या दुर्लक्षाविरोधात शिक्षक परिषद या संघटनेच्या रायगड शाखेच्या वतीने शनिवारी (दि. 21) दुपारी 12 ते 4 या वेळेत अलिबाग येथील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला विविध शिक्षक …
Read More »जैवविविधता जपणे काळाची गरज
प्राचार्य सदानंद धारप यांचे प्रतिपादन पेण : प्रतिनिधी आपल्या सभोवताली असणारी जैवविविधता जपणे ही काळाची गरज असून याबाबत जनमानसात प्रबोधन होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पेण प्रायव्हेट हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य डॉ. सदानंद धारप यांनी केले. पेण नगर परिषद सभागृहात जैवविविधता संगोपन व प्रबोधन या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन …
Read More »नवीन भाजी मंडई संकुलाचा तिढा सुटणार
खोपोलीतील व्यापारी व नगरपालिकेमध्ये चर्चा खोपोली : प्रतिनिधी खोपोली शहरातील मध्यवर्ती भाजी मार्केटच्या ठिकाणी वाहन तळासह अद्यावत भाजी मार्केट संकुल निर्मिती करण्याचा नगरपालिकेचा प्रस्ताव आहे. मात्र त्याबाबत नगरपालिका व भाजी मार्केट व्यापारी संघ यांच्यात काही मतभेद आहेत. सदर प्रकरण कोर्टात ही गेले आहे. दरम्यान, या संबंधी सर्वमान्य मार्ग काढण्यासाठी येथील …
Read More »