कर्जत : बातमीदार येथील रेल्वेस्थानकाच्या फलाट तीनच्या बाहेर असलेला पादचारी पूल आणि तिकीट खिडकी परिसरात फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे लोकल गाडी पकडण्यास आलेल्या प्रवाशांना त्रास होत असून, या अतिक्रमण करणार्यांना वेळीच आवरा, अशी सूचना कर्जत पॅसेंजर असोसिएशनने पोलीस आणि सुरक्षा यंत्रणेला केली आहे. प्रवाशांच्या मागणीनंतर कर्जत रेल्वे स्थानकाच्या भिसेगाव …
Read More »बेकायदा वाणिज्य वापरावर दंडात्मक कारवाईची गरज
खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील चौक हद्दीतील काही हॉटेल, गोडाऊन आणि शोरूम चालक बिनशेती न करता जागेचा वाणिज्य वापरासाठी बिनधोक वापर करीत असून, त्यामुळे खालापूर तहसीलला लाखो रूपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागत आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966प्रमाणे कलम 44प्रमाणे जागेचा वापर वाणिज्य कारणासाठी करायचा असेल तर बिनशेती करणे आवश्यक …
Read More »मुरूडमध्ये दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा; नागरिक त्रस्त
मुरूड : प्रतिनिधी शहरातील नागरिकांना गेल्या पाच दिवसांपासून दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारींत वाढ झाली असून, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. मुरूड शहराची लोकसंख्या 12 हजारांच्या आसपास असून या वाढत्या लोकसंख्येला नगर परिषदेतर्फे आंबोली धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. गेल्या पाच दिवसांपासून या धरणातून दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने …
Read More »पत्रकारांसाठी पेण येथे गुरुवारी कार्यशाळा
अलिबाग : प्रतिनिधी पत्र सूचना कार्यालय, मुंबईच्या वतीने गुरुवारी (दि. 26) पेण येथे पत्रकारांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. पेण-खोपोली रोडवरील हॉटेल सौभाग्यवन इंटरनॅशनल येथे होणार्या या कार्यशाळेचे उद्घाटन रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता होणार आहे. केंद्र शासनाच्या विविध विकासात्मक योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी तसेच …
Read More »स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठ्याकरिता प्रयत्न करणार -सभापती बाफना
मुलांच्या शिक्षणाकरिता इंग्लिश मीडियम शाळेची निर्मिती पेण : प्रतिनिधी नगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना स्वच्छ व नियमितपणे मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी तत्परतेने काम करणार असल्याचे शिक्षण, क्रीडा व पाणीपुरवठा सभापती दर्शन बाफना यांनी सांगितले. पेण नगरपालिकेचे नवनिर्वाचित शिक्षण, क्रीडा व पाणीपुरवठा सभापती दर्शन बाफना यांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते …
Read More »रायगडमध्ये आयुष्मान भारत योजनेचे काम धीम्या गतीने
म्हसळा : प्रतिनिधी केंद्र सरकारने आर्थिकदुर्बल कुटुंबांसाठी सुरू केलेल्या आयुष्मान भारत योजनेसाठी राज्यात काम सुरू आहे. जनगणनेतील सर्वेक्षणातील आर्थिकदुर्बल कुटुंबांना या योजनेंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचाराची सुविधा मिळणार आहे, मात्र राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत रायगड जिह्यात या योजनेतील लाभार्थींचे केवायसी नोंदणीचे व गोल्डन कार्ड वितरणाचे काम फार कमी …
Read More »सरपंचानेच ठोकले ग्रामपंचायतीला टाळे
ग्रामसेवक नसल्याने रजपे येथील दीपाली पिंगळे संतप्त कर्जत : बातमीदार तालुक्यातील रजपे ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदी सप्टेंबर 2019मध्ये दीपाली प्रमोद पिंगळे निवडून आल्या आहेत, मात्र त्यांनी वेळोवेळी विनवण्या करूनही कर्जत पंचायत समितीने त्या ठिकाणी आजतागायत ग्रामसेवक दिला नाही. त्यामुळे जनतेची कामे होत नसल्याने संतप्त झालेल्या सरपंच पिंगळे यांनी ग्रामपंचायत कार्यालयालाच टाळे …
Read More »खोपोलीतील उद्याने बंद; नगरपालिकेची करामत महावीर व विरेश्वर उद्यानांना कुलूप, कोट्यवधींचा निधी खर्चूनही नागरिकांना लाभ नाही
खोपोली : प्रतिनिधी कोट्यवधी रुपये खर्च होऊन नवनिर्माण झालेले खोपोलीतील विरेश्वर उद्यान तसेच विस्तार व डागडुजी करण्यात आलेले महावीर उद्यान बंद आहे. या दोन्ही उद्यानांच्या मुख्य गेटला नगरपालिकेकडून भलेमोठे कुलूप लावण्यात आले असून, नागरिकांना या उद्यानाचा लाभ मिळत नसल्याने प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. जवळपास एक कोटी सत्तर लाखाचा …
Read More »शिक्षणाबरोबरच मुलांवर चांगले संस्कार करणे गरजेचे -हभप मारूती महाराज राणे
कर्जत : प्रतिनिधी मराठी ही आपली मायबोली आहे. जे विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जातात, त्यांनी आधी मराठी शिक्षण घेतले पाहिजे. चांगल्या शिक्षणाबरोबरच चांगले संस्कार मुलांवर रूजविणे गरजेचे आहे, अस मत ह.भ.प. मारूती महाराज राणे यांनी कर्जत भिसेगाव येथे व्यक्त केले. भिसेगाव येथे ज्ञानेश्वरी पारायण व ज्ञानयज्ञ सोहळ्यात दिपोत्सव व सत्कार …
Read More »महाडच्या प्राध्यापकाचे महामार्गावर आंदोलन
महाड : प्रतिनिधी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात तासिका तत्वावर काम करणार्या संतोष कदम या प्राध्यापकाने आपल्या मागण्यांसाठी गुरूवारी (दि. 19) दुपारी महाविद्यालयासमोर चक्क मुंबई – गोवा महामार्गावर टायर पेटवून रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने पोलिसांनी प्रा. कदम यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, प्रा. कदम यांची …
Read More »