कर्जत : बातमीदार नेरळमधील क्रिकेटपटूंसाठी नेरळ प्रीमियर लीग (एनपीएल)चे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेचे यंदाचे चौथे वर्ष आहे. ही स्पर्धा 27 ते 29 डिसेंबर या कालावधीत कोतवालवाडी ट्रस्टच्या मैदानावर रंगणार आहे. एनपीएलमध्ये नेरळ डेअर डेव्हील, नेरळ वॉरीअर, नेरळ सुपरकिंग, नेरळ चॅलेंजर्स, नेरळ इंडियन्स, नेरळ लायन्स, नेरळ किंग 11, नेरळ …
Read More »शिवसेनेकडून मराठी माणसाचा विश्वासघात, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची घणाघाती टीका
महाड : प्रतिनिधी हे राज्य सरकार कोकणाचं नाही किंवा मराठी माणसाचं नाही. सत्तेसाठी शिवसेनेने कोकण आणि मराठी माणसाचा विश्वासघात केल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी सोमवारी (दि. 23) महाड येथे केला. महाड येथे आमदार प्रवीण दरेकर यांचा सोमवारी जाहीर सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत …
Read More »अवसरे येथे पुण्यस्मरण सोहळ्यात हुतात्म्यांना अभिवादन
कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील दोन क्रांतिकारकांना 2 जानेवारी 1943 रोजी ब्रिटिशांनी केलेल्या गोळीबारात वीरमरण आले होते. त्या हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील या दोन हुतात्म्यांचा स्मृतिदिन कर्जत तालुक्यातील अवसरे येथे क्रांतिवीर भगत मास्तर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आला. तीन दिवसीय पुण्यस्मरण सोहळ्यात त्यांना अभिवादन करण्यात आले. या दोन्ही …
Read More »संत गाडगेबाबा यांची 63वी पुण्यतिथी परळी येथे साजरी
पाली ः प्रतिनिधी दीनदुबळे, अनाथ, अपंग, पददलित आणि पीडितांच्या सेवेत संत गाडगे महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य व्यथित केले. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक चळवळ व परिवर्तनाचा लढा अधिक व्यापकपणे उभारला. अज्ञान, अंधश्रद्धा व अस्वच्छतेचे उच्चाटन करणारे विज्ञानवादी समाजसुधारक म्हणजे संत गाडगे महाराज, असे प्रतिपादन सम्यक क्रांती विचारमंचाचे अध्यक्ष मंगेशभाऊ वाघमारे यांनी …
Read More »माथेरानच्या दस्तुरी नाक्यावर एटीएम सेवा
माथेरान ः प्रतिनिधी ऐन सुट्टीच्या हंगामात येथील एकमेव असलेल्या युनियन बँकेच्या एटीएममध्ये नेहमीच पैशांची चणचण भासते. त्यामुळे येथील दस्तुरी नाका येथे अॅक्सिस बँकेचे नवीन एटीएम मशीन सुरू करण्यात आले आहे. या एटीएम सेवेचे उद्घाटन नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी मुख्याधिकारी रामदास कोकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे, …
Read More »पेण येथे एकांकिका स्पर्धेस प्रारंभ
पेण : प्रतिनिधी येथील सन्मित्र ललित क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या कै. सुमित प्रवीण पाटील राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी ज्येष्ठ नाट्यकर्मी राजन भिसे यांच्या हस्ते झाले. नाट्यगृह हे रसिकांची भूक भागविण्याचे व विचारांची देवाणघेवाण करण्याचे साधन असल्याचे राजन भिसे यांनी या वेळी सांगितले. एकांकिका स्पर्धा आयोजित करून सन्मित्र संस्था नवोदित …
Read More »‘थर्टी फर्स्ट’साठी एसटी, रेल्वेगाड्या झाल्या हाऊसफुल्ल
पेण ः प्रतिनिधी डिसेंबर महिना ओसरताना सर्वांना वेध लागतात ते नववर्ष स्वागताचे. 25 डिसेंबरपासून शाळांना नाताळची सुटी लागल्यानंतर अनेकांना नववर्षाचे स्वागत करण्यासाठी बाहेर फिरायला जायची उत्सकता लागलेली असती. त्यामुळे अगोदरच प्रवाशांनी गाड्यांची किंवा रेल्वेची बुकिंग करून ठेवल्याने या महिन्यात कोंकणात किंवा गोव्यासारख्या ठिकाणी जाणार्या प्रवाशांना तिकीट मिळेनासे झाले आहे. मुंबईहून …
Read More »अंबा नदीवर रसायनयुक्त तवंग, वाढत्या जलप्रदूषणाने जैवविविधतेला धोका
पाली ः प्रतिनिधी पाली गावाचा पाणीप्रश्न कायमच गंभीर समस्या बनून राहिली आहे. पाली गावाला पाणीपुरवठा करणार्या अंबा नदीचे पाणी जलप्रदूषणामुळे दूषित होत असल्याचे समोर येत आहे. सुधागड तालुक्यातील वाढते जलप्रदूषण आणि रासायनिक कंपनीमधून टाकऊ रसायन हे थेट अंबा नदीत सोडल्यामुळे पिण्यायोग्य पाणी हे पूर्णतः दूषित होत आहे. अंबा नदीच्या पाण्यावर …
Read More »कडावमधून साईंच्या पालखीचे शिर्डीकडे प्रस्थान
कडाव ः वार्ताहर कर्जतमधील कडाव येथील ओम साई मित्रमंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे श्री. बाळदिगंबर गणेश मंदिर येथून यावर्षीही कडाव-शिर्डी अशा पायी पदयात्रा पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन साईबाबांच्या पालखीचे कडावमधून शिर्डीकडे प्रस्थान झाले. याप्रसंगी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. शनिवारी (दि. 21) कडावमधील श्री. बाळदिगंबर मंदिरातून …
Read More »मालमत्तेच्या नुकसानभरपाईचे वाटप सुरू
महाड : प्रतिनिधी अतिवृष्टीत नुकसान झालेली घरे, जनावरांचे गोठे आणि वीज कोसळून जखमी झालेल्यांना शासकीय मदतीचे वाटप महाड महसूल कार्यालयामार्फत सुरू झाले आहे. महाड तालुक्यातील 196 जणांना 20 लाखांची मदत प्राप्त झाली आहे. महाड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसात अनेक गावांत घरांची पडझड आणि जनावरांच्या गोठ्यांचे नुकसान झाले होते. याकरिता शासकीय …
Read More »