Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

मुलीची हत्या करणार्या क्रूर बापाला जन्मठेप

माणगाव जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल माणगाव : प्रतिनिधी आपल्या पोटच्या मुलीची हत्या केल्याप्रकरणी निर्दयी बापास माणगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी (दि. 13) जन्मठेपेची शिक्षा सुनावली. राम हरी जाधव असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव असून, त्याने पाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोलथरे गावाच्या जंगलात ऑक्टोबर 2018मध्ये मुलीची हत्या केली होती. …

Read More »

वाहने विक्रीचा गोरखधंदा

महाडमध्ये मोटरसायकलींची बेकायदेशीर विक्री; परिवहन विभाग कारवाईच्या पवित्र्यात महाड : महेश शिंदे                   महाडमध्ये प्रतिमहिना सुमारे 600 मोटरसायकलींची बेकायदेशीर विक्री होत आहे. या प्रकरणी रायगड परिवहन विभागाने महाडमधील सहा मोटरसायकल विक्रेत्यांच्या शोरूमवर धाडी टाकून त्यांना मेमो दिले आहेत. सदर प्रकरणी मेनडिलर्स अर्थात परवानाधारक विक्रेत्यावर कारवाई होणार असल्याची माहिती परिवहन अधिकारी उर्मिला …

Read More »

श्रीसदस्यांनी मुरूड तहसील कार्यालयाचा परिसर केला चकाचक

मुरूड : प्रतिनिधी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्रीसदस्यांनी शुक्रवारी (दि. 13) स्वच्छता मोहीम राबवून मुरूड तहसील कार्यालय परिसर स्वच्छ केला. तहसीलदार नमन गावित यांच्या विनंतीनुसार प्रतिष्ठानत़र्फे उदय दांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली 97 श्रीसदस्यांनी शुक्रवारी सकाळी 7 वाजता तहसीलदार कार्यालय परिसरात साफसफाईला सुरुवात केली. 11 वाजेपर्यंत त्यांनी कार्यालय परिसरातून 14 टन कचरा …

Read More »

खोपोलीच्या स्नेहल जोगळेकर ठरल्या ‘मिसेस महाराष्ट्र’

खोपोली : प्रतिनिधी दिवा पॅजन्टच्या वतीने घेण्यात आलेल्या मिसेस महाराष्ट्र इम्प्रेस 2019 या स्पर्धेत खोपोलीच्या स्नेहल जोगळेकर यांनी मिसेस कॉन्फिडन्ट व मिसेस महाराष्ट्र हे मानाचे किताब पटकावले. दिवा पॅजन्ट संस्थेतर्फे 5  ते 8 डिसेंबर या कालावधीत ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये मिसेस महाराष्ट्र इम्प्रेस 2019 ही स्पर्धा घेण्यात आली. संपूर्ण …

Read More »

तासगाव नदीवर श्रमदानातून बंधारा

माणगाव गटविकास अधिकार्‍यांच्या हस्ते जलपूजन माणगाव : प्रतिनिधी पंचायत समिती माणगाव व ग्रुप ग्रामपंचायत भागाड यांच्या संयुक्त विद्यमाने तासगाव येथील नदीवर श्रमदानातून बंधारा उभारण्यात आला असून, गटविकास अधिकारी सतीश गाढवे यांच्या हस्ते जलपूजनही करण्यात आले. माणगाव तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्याचे नियोजन गटविकास अधिकार्‍यांनी केले आहे. तालुक्यातील भागाड …

Read More »

प्रकाश रायकर म्हसळा तालुका भाजप अध्यक्षपदी

म्हसळा : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या म्हसळा तालुका अध्यक्षपदी प्रकाश गोपाळ रायकर यांची जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली निवड झाली आहे. ग्रामीण भागातील उपक्रमशील युवक म्हणून रायकर यांची ओळख आहे. या पक्षांतर्गत निवडणुकीसाठी मनोज भागवत यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. या वेळी महेश पाटील, तुकाराम पाटील, …

Read More »

स्थगिती सरकार!

रायगडातील 114 विकासकामांना ‘स्टे’ अलिबाग : प्रतिनिधी ग्रामविकास विभागाने 25-15 शिर्षकाखालील मंजूर केलेल्या, परंतु 5 डिसेंबरपूर्वी कार्यारंभ आदेश देण्यात आलेले नाहीत अशा कामांना स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे रायगड जिल्ह्यातील 114 कामांना स्थगिती देण्यात आली आहे. याबद्दल सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.  25-15 शिर्षकाखालील 5 डिसेंबरपूर्वी …

Read More »

जलसंवर्धनासाठी महिला सरसावल्या

सिद्धेश्वरमध्ये सलग तिसर्‍या वर्षी उभारला बंधारा पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील सिद्धेश्वर बुद्रुक गावातील महिलांनी पाणी संवर्धनासाठी पुढाकार घेतला आहे. या वर्षीदेखील सर्व महिलांनी मिळून येथील ओढ्यावर मातीचा बंधारा बांधून पाणी अडविले आहे. पाण्याचे महत्व लक्षात घेऊन सिद्धेश्वर बुद्रुक गावातील महिला मागील तीन वर्षांपासून पाणी अडवण्यासाठी श्रमदान करीत आहेत. हातात …

Read More »

खोपोलीत पिसाळलेल्या वळूची दहशत

खालापूर : प्रतिनिधी खोपोलीत सध्या मुक्याप्राण्यांची दहशत निर्माण झाली आहे.  शहरातील सोमजाईवाडी मागील आठवड्यात दोन पिसाळलेल्या कुत्र्याने तीन लहान मुलांचा चावा घेऊन जखमी केल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी (दि. 11) सकाळी वळू (बैल)ने 75 वर्षांच्या आजीबाईंसह विद्यार्थी व नागरिकांना जखमी केले. प्राथमिक उपचार करून या जखमींना घरी सोडण्यात आले. खोपोली …

Read More »

ट्रेलरवर एसटी बस आदळून अपघात; चारजण जखमी

पेण : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावरून पुढे चाललेला ट्रेलर अचानक थांबल्याने पाठिमागून वेगात आलेली एसटी बस ट्रेलरच्या मागील भागावर जोरात आदळली. या अपघातात एसटी बसमधील चार प्रवासी जखमी होऊन एसटी बसचे नुकसान झाले आहे. वडखळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी (दि. 10) दुपारी 2 च्या सुमारास हा अपघात झाला. ट्रेलर (एमएच-43,बीजी-9498) गोवा- …

Read More »