Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

कुस्ती संघाच्या सरचिटणीसपदी खोपोलीचे मारुती आडकर

खोपोली : प्रतिनिधी येथील ज्येष्ठ क्रीडा प्रशिक्षक व राज्य शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारप्राप्त मारुती आडकर यांची कुस्तीगीर संघाच्या विभागीय सरचिटणीसपदी फेरनियुक्ती करण्यात आली आहे. याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे. मारुती आडकर यांनी क्रीडा क्षेत्रात विशेषतः तालीम व कुस्तीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मागील पाच वर्षेही ते कोकण विभागीय कुस्तीगीर संघाचे …

Read More »

नेरळमध्ये विद्यार्थ्याचे हाताचे बोट तुटले

शाळेकडून पालकांना कोणतीही माहिती नाही कर्जत : बातमीदार कल्याण-कर्जत राज्यमार्गावरील नेरळ पेट्रोलपंप येथे हाजी लियाकत इंग्लिश मीडियम स्कूल असून, तेथे सहावीमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्याच्या हाताचे बोट शाळेतच तुटले आहे, मात्र त्याबाबत शाळा व्यवस्थापनाकडून विद्यार्थ्याच्या पालकांना कोणतीही माहिती देण्यात आली नाही. पालकांनी या विद्यार्थ्याला खासगी डॉक्टरकडे नेल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. …

Read More »

भाजप महाड तालुकाध्यक्षपदी जयवंत दळवी बिनविरोध

महाड : प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीच्या पक्षांतर्ग निवडणुकांचा कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमांतर्गत रविवारी (दि. 15) महाड तालुका अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली. त्यासाठी जयवंत शशिकांत दळवी यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस आणि निवडणूक निरीक्षक राजेश मपारा यांनी जयवंत दळवी यांची महाड तालुका अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे …

Read More »

भाजप पेण तालुकाध्यक्षपदी श्रीकांत पाटील यांची निवड

पेण : प्रतिनिधी भाजपच्या पेण तालुका मंडल अध्यक्षपदी श्रीकांत पाटील (सर) यांची निवड करण्यात आली. भाजपची संघटनात्मक निवडणूक प्रक्रिया सुरू असून या अनुषंगाने पेण तालुका मंडल अध्यक्षपदाची निवडणूक आमदार रविशेठ पाटील यांच्या वैकुंठ निवासस्थानी निवडणूक अधिकारी विनोद साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. तालुकाध्यक्षपदासाठी श्रीकांत पाटील यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने …

Read More »

कर्जत शहरात भाजपकडून राहुल गांधी यांचा निषेध

कर्जत ़: बातमीदार, प्रतिनिधी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याबद्दल कर्जत शहरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने राहुल गांधी यांचा निषेध करण्यात आला. या वेळी बोलताना भाजप जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे यांनी ‘राष्ट्रीय काँग्रेसचे राहुल गांधी यांचे विचार किती खालच्या थराचे आहेत हे दिसून आले आहे. त्यामुळे त्यांच्या विचारांची कीव …

Read More »

‘एकनाथ पांडुरंग हनुमंते’ एक धगधगते वादळ

निरपेक्ष कामाचा एक तारा अखेर निखळला नाथ पंढरी राहतो त्याप्रमाणे बुधवार 4 डिसेंबरला आपणा सर्वांमधला ’एक ऩाथ’ सर्वांना सोडून पंढरीला निघून गेला़ आणि सर्व हनुमंते परिवारासह अख्खा समाजच हळहळून गेला. नावाप्रमाणेच एक व्यक्तिमत्व. त्यांच्या नावातच सर्वकाही आहे. ’पांडुरंगाचा हा नाथ हनुमानाच्या ताकदीसारखा ़सर्वशक्तीनिशी करील सर्वांवर मात.’ त्यांच्या अशा आकस्मिक जाण्याने …

Read More »

डिझेल परताव्याची रक्कम न मिळाल्याने मच्छीमार त्रस्त

मच्छीमार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष मनोहर बैले यांचा आंदोलनाचा इशारा मुरूड : प्रतिनिधी राज्य शासनाकडून मच्छीमारांना डिझेल परताव्याची रक्कम अदा केलेली नाही. त्यामुळे मच्छीमार संतप्त झाले आहेत. डिझेल परताव्याची आमच्या हक्काची रक्कम तातडीने मिळावी, अन्यथा मोठे जनआंदोलन छेडावे लागेल, असा इशारा रायगड जिल्हा मच्छीमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर बैले यांनी दिला आहे. …

Read More »

कळंब प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका बंद

कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील कळंब प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका मागील एक महिन्यापासून बंद असून त्याचा परिणाम येथील रुग्ण सेवेवर होत आहे. त्याचप्रमाणे येथे पुरेशा प्रमाणात औषधसाठा नसल्यामुळे रुग्णांना खासगी दुकानातून औषधे घ्यावी लागत  आहेत. या आरोग्य केंद्रात औषधसाठा तातडीने उपलब्ध करून द्यावा तसेच रुग्णवाहिका सेवा सुरू करावी, अशी मागणी कळंब …

Read More »

मत्स्यव्यवसाय प्रशिक्षणासाठी 25 डिसेंबरपर्यंत मागविले अर्ज

अलिबाग ः जिमाका मत्स्यव्यवसाय विभागामार्फत सहा महिने मुदतीचे सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व डिझेल इंजिन देखभाल व परिचालन प्रशिक्षणाचे 110 वे सत्र 1 जानेवारी 2020 पासून रायगड-अलिबाग येथील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र येथे होणार आहे.  त्यासाठी मच्छिमार युवकांकडून बुधवारी (दि.25) अर्ज मागविण्यात आले आहेत. या प्रशिक्षणाचा कालावधी 01 जानेवारी ते 30 जून …

Read More »

पेणमध्ये पैठणी महोत्सव

नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांच्या हस्ते उद्घाटन पेण : प्रतिनिधी रोटरी क्ल्ब ऑफ ओरायन यांच्या वतीने पेणमधील गांधी मंदिर येथे पैठणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, या महोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी (दि. 12) नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. नगराध्यक्ष पाटील यांनी पेणमध्ये पैठणी महोत्सव भरविल्याबद्दल रोटरी क्लब ऑफ ओरायनच्या सदस्यांना …

Read More »