पाली : प्रतिनिधी अंबा नदीतून पाली (ता. सुधागड) शहराला पाणी पुरवठा होतो. नदीतील पाणी साठून रहावे, यासाठी पाली ग्रामपंचायती मार्फत नदीमध्ये बांध घालण्यात आला आहे. मात्र वाळू माफियांनी हा बांध अक्षरशः तोडून टाकला आहे. परिणामी नदीचे पाणी कमालीचे घटले असून, पालीतील नागरिकांसमोर पाणी टंचाईचे संकट उभे ठाकले आहे. सुधागड तालुक्यातील …
Read More »संस्कारधाम विद्यालयात वार्षिक क्रीडा स्पर्धांना सुरूवात
महाड : प्रतिनिधी तालुक्यातील खरवली बिरवाडी येथील संस्कारधाम विद्यालयातील मराठी माध्यमाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेस सुरूवात झाली आहे. या स्पर्धांचे उद्घाटन कबड्डीपटू गणेश पाटील यांच्या उपस्थितीत झाले. शिस्त, जिद्द, आणि चिकाटी हे खेळाचे अविभाज्य अंग असल्याचे गणेश पाटील यांनी या वेळी सांगितले. क्रीडा शिक्षक सकपाळ यांनी या वेळी स्पर्धकांना क्रीडा शपथ …
Read More »जलशक्ती अभियानातून जिल्ह्यात 22 ग्रामपंचायतींत जलस्तोत्रे बळकट
अलिबाग : प्रतिनिधी महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फौंडेशन (एमव्हिएसटीएफ) आणि युनिसेफ इंडिया यांनी भारत सरकारच्या जल जीवन मिशन अंतर्गत जल शक्ती अभियानातून रायगड जिल्ह्यातील 7 तालुक्यांमधील 22 ग्रामपंचायतीमधील 58 महसूली गावांमध्ये 46 बांधकामे करुन जलस्तोत्रे बळकट केली. केंद्र सरकारने स्वच्छ भारत मिशन पाठोपाठ जल जीवन मिशन हा 2024 पर्यंत ग्रामीण …
Read More »अपघातग्रस्तांना मदत करणार्या ग्रुपचे सामाजिक भान, बसचालकाची एक लाखाची रक्कम केली सुपूर्द
खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मंगळवारी (दि. 3) प्रवासी बसचा अपघात झाला. या वेळी खोपोली पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात जखमी झालेल्या बसचालकाने एक लाख रुपये ड्रायव्हर सीटखाली ठेवल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते विजय भोसले यांना दिली. त्यांनी ती रक्कम बस मालकाकडे सुपूर्द केली. खोपोलीतील अपघातग्रस्तांच्या …
Read More »डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमेचे कोप्रोली ग्रामपंचायत कार्यालयात अनावरण
पेण : प्रतिनिधी तालुक्यातील कोप्रोली ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सोमवारी (दि. 2) थोर निरुपणकार महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर पाटील यांनी केले. मंदार पाटील यांनी प्रतिष्ठानच्या कार्याबद्दल माहिती दिली. जितेंद्र पाटील यांनी बैठकीतील संत शिकवणीचे महत्त्व सांगितले. सरपंच विकास पाटील, ग्रामस्थ सुरेश म्हात्रे …
Read More »खोपोलीत स्वच्छता अभियान कामाची पाहणी
खोपोली : प्रतिनिधी नगर परिषदेकडून खोपोली शहरात स्वच्छता अभियान अंतर्गत स्वच्छतेबाबत जोरदार मोहीम सुरू आहे. यात प्लास्टिक बंदी मोहीम राबविणे, कचरा विलीनीकरण, कचरा संकलन व त्याचे वर्गवारीनुसार निस्तारण आदी कामे सुरू आहेत. या कामांची प्रगती व नागरिकांच्या अडचणी व तक्रारी यांचा दैनंदिन आढावाही घेतला जात आहे. दरम्यान, एखाद्या रहिवासी भागात …
Read More »म्हसळ्यात जागतिक दिव्यांग दिन साजरा
म्हसळा : प्रतिनिधी जागतिक दिव्यांग दिनानिमित्ताने मंगळवारी (दि. 3) म्हसळे नं 1 शाळेने रॅलीचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांनी रॅलीत घोषणा देऊन समाजामध्ये जनजागृती केली. दिव्यांगांबद्दल सहानुभूती नव्हे तर विश्वास दाखवा, असे मत म्हसळा गटसाधन केंद्राचे विशेष तज्ज्ञ उमेश गोराडे यांनी या वेळी व्यक्त केले. जागतिक दिव्यांग दिन रॅलीमध्ये म्हसळा प्राथमिक …
Read More »भिवपुरी रोड स्टेशनमधील पादचारी पूल खुला न केल्याने प्रवाशांचा रूळावरून प्रवास
कर्जत : बातमीदार भिवपुरी रोड या रेल्वे स्थानकात मध्य रेल्वेने उभारलेल्या पादचारी पुलाचे काम पूर्ण झाले आहे, मात्र तो पूल प्रवाशांसाठी खुला केला नसल्याने प्रवासी रेल्वेमार्ग ओलांडून जात असून ते धोकादायक बनले आहे. त्यामुळे हा पादचारी पूल तत्काळ खुला करावा आणि येथील रेल्वेमार्गाच्या बाजूने कठडे उभे करावेत, अशी मागणी प्रवासी …
Read More »नागोठणे येथील विद्यालयात एड्स जनजागृती कार्यक्रम
नागोठणे : प्रतिनिधी जागतिक एड्स निर्मूलन दिनाचे औचित्य साधून रिलायन्स कंपनीचा सीएसआर विभाग, भाएसोचे फार्मसी महाविद्यालय आणि इंजिनिअरिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने नागोठणे येथील फार्मसी महाविद्यालयात बुधवारी (दि. 4) दुपारी एड्स जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. त्याचे उद्घाटन नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयाचे डॉ. भरत अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. रिलायन्स रुग्णालयाचे …
Read More »पाली पोटल कालव्याची दुरुस्ती कधी पूर्ण होणार?
कडाव : प्रतिनिधी राजनाला कालवा हा कर्जत तालुक्यातील शेतकर्यांसाठी वरदान ठरला आहे. हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली आल्यामुळे राजनाला कालव्याच्या परिसरातील शेतकरी भाताचे दुबार पीक घेतात, मात्र मागील चार-पाच वर्षांपूर्वी या कालव्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्यानंतर या कामातील अनियमितता आणि निकृष्ट दर्जाचे काम यामुळे येथील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. या कालव्याला …
Read More »