ग्रामस्थांचा टँकरचालकांना निर्वाणीचा इशारा खालापूर : प्रतिनिधी ढेकू औद्योगिक वसाहतीमध्ये टँकरने पाणीपुरवठा करणार्या टँकरमधील पाणीगळती होऊन ताकई फाटा ते अत्करगाव आडोशी मार्गावर पाण्याने रस्ता निसरडा होऊन मोटरसायकलस्वारांना व पायी जाणार्या महिला पादचार्यांना अपघात होऊन जायबंदी झाले आहेत. या मार्गावरून पाणीपुरवठा करणार्या टँकरचे झाकण पूर्णपणे बंद करावे तसेच मार्गावर पाणी सांडणार …
Read More »रोह्यात लाकडी घराला आग
रोहा ः प्रतिनिधी शहरातील आडवी बाजारपेठेतील रजनीशेठ शहा यांचे जुन्या लाकडी घराला सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास आग लागली असून ही आग विझविण्यासाठी धाटाव एमआयडीसी अग्निशमन दलाने शर्तीचे प्रयत्न करून आग रात्री उशीरापर्यंत आटोक्यात आणली आहे. या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले असून लाखो रूपयाचे नुकसान झाले आहे. आगीचे लोळ …
Read More »कर्जत तालुक्यात ‘महावितरण’ची अरेरावी
‘त्या’ वाहनांमुळे जनता अंधारात कर्जत : बातमीदार मुरबाड औद्योगिक वसाहतीमध्ये तयार करण्यात आलेले लोखंडी कर्जत तालुक्यातील रस्ता मार्गाने जेएनपीटी बंदरात नेले जात आहेत. खासगी वाहनांमधून नेल्या जाणार्या या अजस्त्र बॉयलरसाठी डिकसळनंतर नेरळमध्येदेखील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे मध्यरात्री अचानक खंडित झालेल्या वीज पुरवठ्यामुळे नेरळ परिसरातील नागरिक हैराण झाले …
Read More »पंचायत समितीची पदे आरक्षित करण्यासाठी सभा
अलिबाग ः जिमाका रायगड जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतींची पदे अनुसुचित जाती, जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, व सर्वसाधारण महिलांसाठी सोडत पध्दतीने आरक्षित करण्यासाठी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात मंगळवार, 10 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता सभा आयोजित करण्यात आली आहे. शासन ग्रामीण विभागाकडील प्राप्त अधिसुचनेनुसार ही सभा आयोजित करण्यात आली …
Read More »पेणच्या उपनगराध्यक्षपदी वैशाली कडू बिनविरोध
पेण : प्रतिनिधी पक्षांतर्गत समझोत्यानुसार दीपक गुरव यांनी राजिनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पेण नगर परिषदेच्या उपाध्यक्ष पदी शुक्रवारी (दि. 6) वैशाली संजय कडू यांची बिनविरोध निवड झाली. पेणच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी शुक्रवारी नगराध्यक्षा प्रितम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषद सभागृहात विषेश सभा घेण्यात आली. यावेळी उपनगराध्यक्ष पदासाठी वैशाली कडू यांचा …
Read More »नेरळमध्ये सत्ताधारी शिवसेनेला धक्का
उपसरपंचपदी शंकर घोडविंदे कर्जत : बातमीदार नेरळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत खांडा विकास आघाडीचे सदस्य शंकर घोडविंदे विजयी झाले. त्यांनी शिवसेनेचे धर्मानंद गायकवाड यांचा 10 विरुद्ध 8 मतांनी पराभव केला. नेरळ ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदासाठी गुरुवारी (दि. 5) निवडणुक घेण्यात आली. अध्यासी अधिकारी ग्रामपंचायतचे सरपंच रावजी शिंगवा यांच्याकडे निर्धारित वेळेत धर्मानंद …
Read More »खंडित इंटरनेटमुळे नेरळची युनियन बँक ‘आऊट ऑफ कव्हरेज’
कर्जत : बातमीदार इंटरनेट सेवा गेल्या 10 दिवसांपासूनपासून बंद असल्याने युनियन बँकेच्या नेरळ शाखेचा कारभार पुन्हा एकदा ठप्प झाला आहे. त्यामुळे बँकेचे खातेदार आणि पेन्शनर हे संतापले आहेत. युनियन बँकेच्या नेरळ शाखेत तब्बल 30 हजार खातेदार आहेत. त्यापैकी 10 हजारहुन अधिक करंट खाती असून, या नेरळमधील एकमेव राष्ट्रयीकृत बँकेत येथील …
Read More »मेढेखार येथे कबड्डी स्पर्धा
श्रीगाव : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील मेढेखार येथे जय हनुमान क्रीडा मंडळाच्या वतीने व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने 14 डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांक 21 हजार रुपये व स्व. नथुराम तुरे स्मृतिचषक, द्वितीय 15 हजार रुपये व चषक, तृतीय व चतुर्थ क्रमांकांना …
Read More »खालापूरची पाताळगंगा नदी प्रदूषित, जलसंपदेसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात
खोपोली : प्रतिनिधी खोपोली नगरपालिका क्षेत्र व खालापूर तालुक्यातील अनेक गावांच्या पाणी योजना पाताळगंगा नदीवर अवलंबून आहेत. याच नदीच्या पाण्यावर येथील औद्योगिक क्षेत्र जिवंत आहे. मात्र तालुक्याची भाग्यविधाती असलेली पाताळगंगा नदी भरमसाठ प्रदूषणमुळे बेजार झाली आहे. पाताळगंगेचे प्रदूषण दिवसागणिक वाढत असल्याने या नदीतील जलसंपदा व नदी क्षेत्रातील हजारो नागरिकांचे आरोग्य …
Read More »ढगाळ हवामानाने आंबा, काजूपीक धोक्यात
म्हसळा : प्रतिनिधी तालुक्यात गेले तीन ते चार दिवस ढगाळ वातावरण आहे. गुरूवारी (दि. 5) पहाटे तालुक्यात काही ठिकाणी अवेळी पावसाचा शिडकाव झाला आहे. यामुळे आंबा व काजू बागायतदार हैराण झाले आहेत. बदललेले वातावरण आणि पावसाचा शिडकाव यामुळे आंबा व काजू पिकांच्या मोहराचे पर्यायाने पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. …
Read More »