कर्जत : बातमीदार भिवपुरी रोड या रेल्वे स्थानकात मध्य रेल्वेने उभारलेल्या पादचारी पुलाचे काम पूर्ण झाले आहे, मात्र तो पूल प्रवाशांसाठी खुला केला नसल्याने प्रवासी रेल्वेमार्ग ओलांडून जात असून ते धोकादायक बनले आहे. त्यामुळे हा पादचारी पूल तत्काळ खुला करावा आणि येथील रेल्वेमार्गाच्या बाजूने कठडे उभे करावेत, अशी मागणी प्रवासी …
Read More »नागोठणे येथील विद्यालयात एड्स जनजागृती कार्यक्रम
नागोठणे : प्रतिनिधी जागतिक एड्स निर्मूलन दिनाचे औचित्य साधून रिलायन्स कंपनीचा सीएसआर विभाग, भाएसोचे फार्मसी महाविद्यालय आणि इंजिनिअरिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने नागोठणे येथील फार्मसी महाविद्यालयात बुधवारी (दि. 4) दुपारी एड्स जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. त्याचे उद्घाटन नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयाचे डॉ. भरत अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. रिलायन्स रुग्णालयाचे …
Read More »पाली पोटल कालव्याची दुरुस्ती कधी पूर्ण होणार?
कडाव : प्रतिनिधी राजनाला कालवा हा कर्जत तालुक्यातील शेतकर्यांसाठी वरदान ठरला आहे. हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली आल्यामुळे राजनाला कालव्याच्या परिसरातील शेतकरी भाताचे दुबार पीक घेतात, मात्र मागील चार-पाच वर्षांपूर्वी या कालव्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्यानंतर या कामातील अनियमितता आणि निकृष्ट दर्जाचे काम यामुळे येथील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. या कालव्याला …
Read More »दुचाकीची रुग्णवाहिकेला धडक; हेदवलीजवळ अपघातात एक जखमी
सुधागड : रामप्रहर वृत्त पाली-खोपोली राज्य महामार्गावरील हेदवली गावानजीक असलेल्या टॉपर कंपनीजवळ मंगळवारी (दि. 3)संध्याकाळी रुग्णवाहिका आणि दुचाकी यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णवाहिका (एमएच-04, जीपी-504) पालीकडून खोपोलीच्या दिशेने जात होती, तर दशरथ दत्तू पवार …
Read More »मुख्याध्यापकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग
रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; आरोपी फरार रेवदंडा : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील सुडकोळी येथील हायस्कूलच्या मुख्याध्यापकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची तक्रार रेवदंडा पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून आरोपी मुख्याध्यापक फरार झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. सुडकोळी येथील हायस्कूलचे मुख्याध्यापक सुदाम हाशा वाघमारे यांनी 22 नोव्हेंबर रोजी दुपारी …
Read More »पेब किल्ल्यावरून घसरून ट्रेकर दरीत
सात तासांच्या प्रयत्नांनंतर मिळाले जीवदान; सह्याद्री रेस्क्यू टीमची कामगिरी कर्जत : बातमीदार विकटगड (पेब) हा किल्ला सह्याद्रीच्या माथ्यावर वसलेला आहे. त्यामुळे या किल्ल्यावर भ्रमंतीला ट्रेकर्सची कायम पसंती असते. मंगळवारी पुण्याहून पेब किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आलेल्या ग्रुपमधील एका तरुणाचा पाय घसरून तो सुमारे 350 फूट खोल दरीत घरंगळत गेला, मात्र सह्याद्री रेस्क्यू …
Read More »रायगड वाहतूक पोलीस दलाला मिळाले बळ
अलिबाग : प्रतिनिधी रायगड पोलीस दलात चार इंटर सेफ्टर व्हेईकल दाखल झाले आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-गोवा महामार्गावर अतिवेगाने वाहन चालविणार्या बेजबाबदार चालकांना आता स्पीड गनच्या कॅमेरात टिपले जाणार आहे, तसेच वाहनाच्या मालकाकडून दंड वसूल केला जाईल. महामार्गावरील सुसाट वाहन चालविणार्यावर पोलिसांचे लक्ष राहावे यासाठी राज्य सरकारने राज्यात 92 …
Read More »रायगडकरांना आंब्याची चव उशिरा मिळणार
अलिबाग : प्रतिनिधी लांबलेला पाऊस आणि थंडीला झालेला उशीर यामुळे यंदा आंब्याला मोहर येण्याची प्रक्रिया लांबली आहे. उशिरा आलेल्या मोहरामुळे फालधारणेलाही उशिरा सुरुवात होईल. त्यामुळे यंदा रायगडकरांना हापूस आंब्याची चव उशिरा चाखायला मिळणार आहे. दुसरीकडे आंबा उशिरा बाजारात येणार असल्याने आंबा बागायतदारांचे उत्पन्नदेखील कमी होण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यात 42 …
Read More »महिला वेषधारी लुटारू पुरुषाला अटक
कर्जत : बातमीदार महिलेचा वेष परिधान करून प्रवाशांना लुटणार्या पुरुष लुटारूला कर्जत रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे लोकलमध्ये महिलांच्या डब्यात घडलेल्या लुटीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची चिन्हे आहेत. कर्जत लोकलमध्ये वांगणी ते भिवपुरी रेल्वेस्थानकांदरम्यान एक पुरुष हा महिलेसारखी वेषभूषा करून महिला प्रवाशांना लुटत असे. याबाबतची तक्रार कर्जत स्थानकात असलेल्या …
Read More »जागतिक एड्स पंधरवडानिमित्त भव्य रॅली
अलिबाग ः प्रतिनिधी जागतिक एड्स नियंत्रण दिन व पंधरवडानिमित्त आयोजित रॅलीचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण संदीप वीरभद्र स्वामी, लायन्स क्लब अध्यक्ष अंकित बंगेरा व चित्रलेखा पाटील, लायन्स क्लबच्या निहा राऊत, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक तथा जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभाग संजय माने यांच्या …
Read More »