Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

पोलादपुरात स्ट्रॉबेरीची शेती

पोलादपूर : प्रतिनिधी मुंबईतील अनेक वर्षांच्या कापड व्यापाराला कायमचा रामराम करून पोलादपूर तालुक्यातील गावाकडे आलेले रामचंद्र दाजी कदम उर्फ कदम यांनी स्ट्रॉबेरीची शेती केली आहे. स्ट्रॉबेरीचे आकर्षक रूप पाहून पेरूच्या पिकाला पुरामुळे झालेले नुकसान भरून येण्याची आशा कदम यांना आहे. रायगड जिल्ह्याच्या पोलादपूर तालुक्यातील बोरज गावाच्या हद्दीत प्रयोगशील शेतकरी रामचंद्र …

Read More »

म्हसळ्यात 60 ते 80 रुपयांत मिळतोय कांदा

म्हसळा : प्रतिनिधी कांद्याच्या चढ्या दरामुळे सर्वसामान्यांच्या डोळ्यांत पाणी आले आहे. महागड्या दरातील कांदे स्वस्त दरात उपलब्ध करून देण्याची नामी शक्कल रहिमतपूर (सातारा) येथील टेम्पोवाला बंड्याने आखली आणि त्याचा फायदा म्हसळ्यातील गोरगरीब लोकांना होत आहे. घाऊक बाजारात कांद्याचा भाव प्रचंड वाढल्याने म्हसळा शहरातही कांद्याचे भाव 100 ते 120 रुपयांपर्यंत गेले. …

Read More »

महाडमध्ये मटका अड्ड्यावर छापा; मुद्देमालासह एक अटकेत

महाड : प्रतिनिधी महाड शहरासह परिसरातील गावांमध्ये मटका आणि इतर धंदे बेकायदेशीरपणे सुरू आहेत. काही तथाकथित पत्रकार या अवैध धंद्यांना अभय मिळावे म्हणून प्रयत्न करीत असल्याची चर्चा असतानाच शनिवारी (दि. 7) महाड शहर पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एक मटका अड्ड्यावर छापा मारून एकाला मुद्देमालासह अटक केली आहे. महाड तालुक्यात …

Read More »

अलिबाग समुद्रकिनारा चकाचक

अलिबाग : केंद्र  सरकारच्या आवाहनानुसार स्वच्छता पंधरवडाअंतर्गत 1 ते 15 डिसेंबर या कालावधीत ’प्लॉगिंग’ (डस्टिंग वेस्ट कलेक्शन) प्रोग्राम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात  अलिबाग येथील जे. एस. एम. महाविद्यालयाच्या एनसीसी आणि एनएसएस युनिटतर्फे शनिवारी (दि. 7) अलिबाग समुद्रकिनारा स्वच्छ करण्यात आला. या समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल …

Read More »

रायगडमधून दिसणार खंडग्रास सूर्यग्रहण; सन्डे सायन्स देणार चश्मे

अलिबाग ः प्रतिनिधी चंद्रग्रहण, सूर्यग्रहणाच्या बाबतीत असणार्‍या गैरसमजुती आता बर्‍यापैकी कमी झाल्या आहेत. याचमुळे ग्रहण कसे असते याबद्दल पालकांबरोबरच विद्यार्थ्यांमध्येही कुतूहल वाढत आहे. येत्या 26 डिसेंबर रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण होत असून तब्बल एका दशकानंतर भारतातून सूर्यग्रहण पाहण्याची संधी मिळणार आहे. दरम्यान, संडे सायन्सतर्फे सुरक्षितपणे सूर्यग्रहण पाहता यावे यासाठी खास चष्मे …

Read More »

नोकरीच्या बहाण्याने नागरिकांची फसवणूक

तोतया अधिकारी चार महिन्यांपासून फरार कर्जत ः प्रतिनिधी आपण मंत्रालयात गृहविभागात अव्वल सचिव आहोत, असे भासवून अनेकांची फसवणूक करण्याची घटना घडली आहे. तोतया अधिकार्‍याने सरकारी नोकरी लावण्यासाठी तसेच बदली करण्यासाठी व विकासकामांना निधी मंजूर करण्यासाठी लाखो रुपये लांबविले आहेत. दरम्यान, तोतया अधिकारी आपले पितळ उघडे पडल्याने चार महिन्यांपासून फरार आहे, …

Read More »

प्रतिकार्ड 35 किलो धान्य द्या

रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेची मागणी अलिबाग ः प्रतिनिधी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना वितरणाचे प्रमाण वाढून अंत्योदय योजनेसाठी दरमहा 35 किलो धान्य प्रतिकार्ड व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थींसाठी चार किलो तांदूळ व एक किलो गहू प्रतिव्यक्ती देण्यात यावेत, अशी मागणी अलिबाग तालुका रास्त भाव …

Read More »

म्हसळा पोलिसांना कोणी घर देता का घर?

जागा आहे, पण मागणी प्रस्ताव नाही म्हसळा : प्रतिनिधी म्हसळा पोलीस अनेक सोयीसवलतींपासून वंचित आहेत. पोलीस ठाणे आणि कर्मचारी निवासस्थानासाठी म्हसळा नगरपंचायत हद्दीत 44 गुंठे जागा आरक्षित आहे. या जागेवर पोलीस ठाण्याची इमारत उभारण्यासाठीचा प्रस्ताव 2013ला पाठविण्यात आला, मात्र अद्यापही या राखीव जागेवर ना पोलीस ठाण्याची इमारत ना कर्मचार्‍यांना निवासस्थाने …

Read More »

मुरूडमध्ये एड्स जनजागृती रॅली

मुरूड : प्रतिनिधी येथील ग्रामीण रुग्णालय आणि नूतन नर्सिंग स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने मुरूड शहरात एड्स जनजागृती रॅली काढण्यात आली. वैद्यकीय अधिकारी डॉ. सारा डोंगरकर यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर रॅलीला सुरुवात झाली. रॅलीतील विद्यार्थ्यांनी एचआयव्ही, एड्सबद्दल जोरदार घोषणाबाजी देऊन जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. या जनजागृती रॅलीदरम्यान कल्याणी दवाखान्यासमोर आणि मच्छीमार्केटमध्ये …

Read More »

पाण्यामुळे ताकई-आडोशी मार्ग निसरडा

ग्रामस्थांचा टँकरचालकांना निर्वाणीचा इशारा खालापूर : प्रतिनिधी ढेकू औद्योगिक वसाहतीमध्ये टँकरने पाणीपुरवठा करणार्‍या टँकरमधील पाणीगळती होऊन ताकई फाटा ते अत्करगाव आडोशी मार्गावर पाण्याने रस्ता निसरडा होऊन मोटरसायकलस्वारांना व पायी जाणार्‍या महिला पादचार्‍यांना अपघात होऊन जायबंदी झाले आहेत. या मार्गावरून पाणीपुरवठा करणार्‍या टँकरचे झाकण पूर्णपणे बंद करावे तसेच मार्गावर पाणी सांडणार …

Read More »