आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी खालापूर : प्रतिनिधी खोपोलीनजीकच्या साजगाव येथे सुभाष प्रीमियर या कंपनीच्या नव्याने सुरू असणार्या कामाचा ठेका मिळविण्यावरून झालेल्या हाणामारीत सहाजण जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी चार आरोपींना खोपोली पोलिसांनी अटक केली असून, फरार झालेल्या पाच आरोपींचा शोध सुरु आहे. सुभाष प्रीमियर या …
Read More »चिंचवली येथे जागेच्या वादातून हाणामारी
नवरा-बायको दोघेही जखमी, चार जणांवर गुन्हे दाखल कर्जत : बातमीदार नेरळ – कर्जत या दोन्ही शहरांचे मध्यवर्ती ठिकाण असलेले चिंचवली येथे जुन्या जागेच्या रागातून वाद निर्माण झाला. हा वाद विकोपाला जावून झालेल्या हाणामारीत नवरा, बायको दोघेही जखमी झाले आहेत. तर मारहाण करणार्या चार जणांवर नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात …
Read More »महामार्गावर महाडनजीक अपघात
महाड : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर महाडनजीक मंगळवारी (दि. 26) रात्री भरधाव कार चालक रस्त्यालगत असलेल्या एका झाडावर आपटल्याने कारचे नुकसान झाले. मात्र कार चालक किरकोळ जखमी झाला आहे. बिरवाडीयेथील रुपेश जनार्दन कदम (वय 26) याने मंगळवारी रात्री 10.45 वाजण्याच्या सुमारास भरधाव कार (एमएच-06, बीएम-4053) चालवत रस्त्यालगत एका झाडाला ठोकर दिली. …
Read More »‘इंडिया पोस्ट पेमेंट बँक मोहिमेचा लाभ घ्या’
अलिबाग : जिमाका ग्रामीण भागातील, तळागाळातील प्रत्येक ग्रामस्थाला डिजीटल बँकेचे व्यवहार समजावेत आणि तोही या प्रवाहात सामील व्हावेत, यासाठी भारतीय रायगड डाक विभागाने इंडिया पोस्ट पेमेंट बँक (आयपीपीबी) च्या सहाय्याने ग्राहकांच्या दारापर्यंत पोहोचण्याची मोहीम सुरु केली आहे. या पोस्ट पेमेंट बँकेची माहिती अधिकाधिक जनतेपर्यंत पोचवा, असे प्रतिपादन जिल्हा डाक अधिक्षक …
Read More »संपकरी डॉक्टरांचा संप अखेर मागे
अलिबाग : प्रतिनिधी ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नेमण्यात आलेल्या तज्ज्ञांचे मानधन शासनाकडून वेळेत न दिल्याने डॉक्टरांनी संप पुकारला होता. जिल्हाधिकार्यांच्या आश्वासनानंतर हा संप मागे घेण्यात आला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. बैठकीत जिल्हा शल्यचिकित्सक …
Read More »सुकेळी खिंडीजवळ मिनीडोर-कार अपघात
नागोठणे : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर सुकेळी खिंडीनजीक रविवारी (दि. 24) दुपारी 12च्या सुमारास मिनीडोर प्रवासी रिक्षा आणि कार यांच्यात समोरासमोर टक्कर झाली. या अपघातात नागोठण्यातील रिक्षाचालक गणेश जाधव यांचा मृत्यू झाला, तर दोन्ही वाहनांतील प्रवासी जखमी झाले आहेत. गणेश जाधव हे मिनीडोर रिक्षा (एमएच 06-जे 1972) घेऊन नागोठणे रेल्वेस्थानकात उतरलेल्या …
Read More »रोटरी क्लबच्या वतीने सायकल वाटप
कर्जत ः प्रतिनिधी पोशीर येथील श्रमजीवी जनता विद्यामंदिर विद्यालयात अनेक गावांतून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात, परंतु गावांमधून येणार्या विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी चार ते पाच किलोमीटरची पायपीट करावी लागते. ज्या गावात रिक्षा, एसटी जात नाही अशा गावांमधील गोरगरीब, गरजू सुमारे 50 मुलींना रोटरी क्लब ऑफ देवनार यांच्या वतीने शनिवारी सायकलचे वाटप करण्यात …
Read More »म्हसळ्यातील 1755 शेतकर्यांना मिळणार नुकसानभरपार्ई
म्हसळा : प्रतिनिधी क्यार व महा चक्रीवादळ आणि अवेळी पावसामुळे शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले. बाधित शेतकर्यांना आर्थिक साहाय्य देण्यासंदर्भात राज्यपालांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत महत्त्वाचा निर्णय झाला आहे. म्हसळा तालुक्यात भातपिकाखालील एकूण क्षेत्र 2689 हेक्टर आहे. त्यापैकी 1755 शेतकर्यांचे 530.02 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून त्यांना 42 लाख 40 हजार रुपये अनुदान …
Read More »सुतारपाडा शाळा इमारतीची दुरवस्था
कर्जत : बातमीदार तालुक्यातील सुतारपाडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीवर काही दिवसांपूर्वी झाड कोसळल्याने या शाळा इमारतीची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. अनेक दिवस उलटूनही या इमारतीची दुरुस्ती करण्यात आली नसल्याने विद्यार्थ्यांनी बसायचे कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या विद्यार्थ्यांना शाळेच्या व्हरांड्यात बसावे लागत आहे, मात्र याकडे ग्रामपंचायतीसह शाळा …
Read More »सुधागडात आरोग्यसेवेअभावी रुग्णांची गैरसोय
आरोग्यसेविकांनी मुख्यालयालगत राहण्याची नागरिकांची मागणी पाली-बेणसे ः प्रतिनिधी सार्वजनिक आरोग्यसेवेतील आरोग्यसेविकांनी मुख्यालयाच्या ठिकाणी राहणे बंधनकारक असतानाही सुधागड तालुक्यातील बहुसंख्य आरोग्यसेविका आपल्या मुख्यालयाच्या ठिकाणापासून दूर वास्तव्यास आहेत. परिणामी उपचारासाठी आलेल्या रुग्णांची गैरसोय होते. त्याबरोबरच दूरवर राहत असल्याने आरोग्यसेविकांकडूनही उत्तम सुविधा देण्यास कसूर राहते. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा सुधारण्याबरोबरच रुग्णांना वेळच्या …
Read More »