Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

कर्जतमध्ये उल्हास नदीवरील चार नव्या पुलांना मंजुरी

कर्जत : बातमीदार उल्हास नदीवर कर्जत तालुक्यात पाच नवीन पूल बांधावेत, अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. त्यातील चार पुलांच्या बांधकामाला सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजुरी दिली आहे. त्यासाठी मागील राज्य सरकारने अर्थसंकल्पात तब्बल 20 कोटींची तरतूद केली आहे. कर्जत तालुक्यातील उल्हास नदीवर नवीन पूल असावेत, अशी मागणी होत होती. …

Read More »

मुरूडमधील इंटरनेट सेवा बंद

दुय्यम निबंधक कार्यालयातील व्यवहार 10 दिवस ठप्प मुरूड : प्रतिनिधी निसर्गरम्य मुरूड शहर व परिसरात आपली हक्काची जागा असावी असे अनेकांना वाटते. त्यामुळे मुरूड तालुक्यात जागा खरेदी-विक्री व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले असून, त्याद्वारे शासनाला सर्वाधिक महसूल मिळतो, मात्र गेल्या 10 दिवसांपासून बीएसएनएलची इंटरनेट सेवा बंद असल्याने दुय्यम निबंधक कार्यालयात एकाही …

Read More »

कर्जत पालिकेकडून जलकुंभांची स्वच्छता

प्रत्येक टाकीत होता सहा इंच मातीचा थर कर्जत : बातमीदार कर्जत शहराची वाढीव नळपाणी योजना कार्यान्वित झाल्यापासून या योजनेतील जलकुंभ स्वच्छ करण्यात आले नव्हते. 20 वर्षांनंतर आता या योजनेतील जलकुंभ स्वच्छ केले जात आहेत. त्यात प्रत्येक जलकुंभामध्ये सुमारे सहा इंच मातीचा थर आढळून आला. दरम्यान, जलकुंभ स्वच्छ केल्याने कर्जत शहराला  …

Read More »

ग्रामपंचायत निवडणूक; 58 उमेदवार रिंगणात

अलिबाग : प्रतिनिधी जिल्ह्यातील पाच सार्वत्रिक ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, सरपंच व सदस्य पदाच्या 31 जागांसाठी 58 उमेदवार रिंगणात आहेत. यासाठी येत्या 8 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. महाड तालुक्यातील मुमुर्शी, भोमजई व पिंपळकोंड आणि कर्जत तालुक्यातील तिवरे व वरई तर्फे निड या पाच ग्रामपंचायतींच्या पाच सरपंच व …

Read More »

कर्जतमध्ये रानडुकरांचा उच्छाद, बेकरे गावात 50 एकरवरील भातपिकाचे नुकसान

कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील जंगलाला लागून असलेल्या बेकरे गावात रानडुकरे मुक्तपणे संचार करीत असून, रात्रीच्या वेळी भातशेतीचे नुकसान करीत आहेत. आतापर्यंत 13 शेतकर्‍यांच्या एकूण 50 एकर जमिनीवरील भातपीक डुकरांनी तुडवून टाकले आहे. या नुकसानीची शासनाने भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. बेकरे या माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या गावाला जंगलाचा वेढा …

Read More »

सापमुक्तीसाठी जंगल भ्रमंती

रहिवासी भागात आढळलेल्या सापांना मिळाला हक्काचा अधिवास खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खोपोली शहर आणि खालापूर तालुक्यातील जनमानसात सर्प आणि प्राणीप्रेमींची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. खेडोपाडी, दुर्गम वाडी वस्त्यांतच नव्हे, तर हाऊसिंग सोसायट्या आणि नागरी वस्तीत साप आढळून आला की त्याची माहिती तातडीने सर्पमित्रांना दिली जाते. सर्पमित्र मिळालेल्या जुजबी माहितीनुसार …

Read More »

अवजड वाहनांचा ‘रात्रीस खेळ चाले’; कर्जतमध्ये वीजग्राहकांना नाहक त्रास

कडाव : प्रतिनिधी कर्जत-मुरबाड राज्यमार्गावरून गेल्या आठ दिवसांपासून मोठमोठ्या अवजड वाहनांची वाहतूक सुरू असून, त्यासाठी  रात्री सात-आठ तास वीजपुरवठा बंद केला जात असल्याने जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. कर्जत-मुरबाड राज्य मार्गावरून नाशिक, शहापूर, मुरबाड येथून येणार्‍या अवजड वाहनांची संख्या वाढली आहे. सध्या कंपन्यांसाठी लागणार्‍या बॉयलर्सचे मोठमोठे पार्ट याच मार्गावरून …

Read More »

भडसावळे यांचा कृषी पर्यटनाचे जनक पुरस्काराने सन्मान

कर्जत : बातमीदार कृषी पर्यटनाची सुरुवात भारतात सर्वात आधी सुरू करून कृषी पर्यटन संकल्पना जन्माला घातल्याबद्दल आणि कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून राज्यातील शेतकर्‍यांना आर्थिक स्रोत निर्माण करून दिल्याबद्दल नेरळ येथील शेखर भडसावळे यांना कृषी पर्यटनाचे जनक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र राज्य कृषी आणि ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघ (मार्ट) …

Read More »

नागोठणे-रोहे रस्त्याचे ग्रहण सुटणार तरी कधी?

वाहनचालकांसह प्रवाशांचा सवाल नागोठणे : प्रतिनिधी नागोठणे ते रोहे मार्गात आंबेघर फाटा ते आमडोशी फाटा हा सुमारे चार किलोमीटर अंतराचा रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. या रस्त्यावरून जाताना वाहनचालकांसह प्रवाशांना जीवघेणा त्रास सहन करावा लागत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याला लागलेले ग्रहण सोडविण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी केली …

Read More »

डम्पिंग ग्राऊंडचा कचरा नाल्यात

नेरळ परिसरात पसरली दुर्गंधी कर्जत : बातमीदार नेरळ गावातील डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न सुटायचे नाव घेत नाही. कचर्‍याची विल्हेवाट लावण्यात नेरळ ग्रामपंचायत प्रशासन अपुरे पडत असल्याने डम्पिंग ग्राऊंड परिसरात मोठ्या प्रमाणात कचर्‍यापासून दुर्गंधी पसरली आहे. दरम्यान, गोळा झालेला कचरा डम्पिंग ग्राऊंडच्या बाजूने वाहणार्‍या नाल्यात टाकला जात असल्याने नाल्याची रूंदीदेखील कमी होत …

Read More »