Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छतेचे कीटवाटप

पाली ः प्रतिनिधी सुधागड तालुका भाजप महिला मोर्चाने समाजोपयोगी कार्याला सुरुवात केली असून पेण-सुधागड-रोहा विधानसभा क्षेत्र सहसंयोजिका वैशाली मापारा यांच्या मार्गदर्शनाखाली सुधागड तालुक्यातील भाजपा महिला मोर्चाने राजकारण न करता समाजकारण करण्याचा विडा उचलला आहे. काही दिवसांपूर्वी रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण सुधागड दौर्‍यावर असताना सुधागड महिला मोर्चाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी धनादेश …

Read More »

पालीतील वाहतूक कोंडी ठरतेय डोकेदुखी

पाली ः प्रतिनिधी पाली शहरातील सर्वाधिक कळीचा मुद्दा वाहतूक कोंडीचा व अवैध पार्किंग ठरत आहे. पाली हे शहर अष्टविनायकापैकी एक क्षेत्र हे महत्त्व असले तरी या शहरात गणपतीचे देवस्थानव्यतिरिक्त पार्किंगची  व्यवस्थाच नसल्याने अडचण होत आहे. हटाळेश्वर चौक बाजारपेठ वाहतुकीचा प्रश्न नेहमीच वादग्रस्त राहिला आहे. या परिसरात होणार्‍या अवैध पार्किंगमुळे रस्त्याने …

Read More »

500 फूट खोल दरीत पडलेल्या पर्यटकाला जीवदान

कर्जत ः बातमीदार नवी मुंबई येथून सहा ट्रेकर्सची टीम पेब किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आली होती, परंतु त्यातील एकाचा पाय घसरून तो 500 फूट दरीत कोसळला. घटनेची माहिती मिळताच नेरळ पोलीस व माथेरान येथील सह्याद्री रेस्क्यू टीम यांनी अथक प्रयत्न करून या पर्यटकाचे प्राण वाचवले आहेत. सह्याद्रीच्या पर्वतरांगेत माथेरानजवळ शिवकालीन पेब किल्ला …

Read More »

प्रवासी शेड दुरुस्त करण्याची मागणी

मुरूड ः प्रतिनिधी मुरूड नगर परिषद हद्दीतील गणेश पाखाडीजवळील प्रवासी शेड मोडकळीस आली असून असंख्य प्रवासी व विद्यार्थ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असून मुरूड नगर परिषदेने या प्रवासी शेडची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी मानव अधिकार संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जाहिद फकजी यांनी केली आहे. गणेश पाखाडीमधील असणार्‍या प्रवासी …

Read More »

कर्जफेडीसाठी सहकार्य करा -कौसल्या पाटील

पाटणेश्वर अर्बन बँकेच्या वार्षिक सभेत कर्जदारांना आवाहन पेण ः प्रतिनिधी श्री. पाटणेश्वर अर्बन को-ऑप बँकेच्या कर्जदारांनी कर्ज फेडण्यासाठी बँकेला सहकार्य करून कर्जाची फेड मुदतीत करावी, असे आवाहन बँकेच्या अध्यक्षा कौसल्या पाटील यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना केले. श्री. पाटणेश्वर अर्बन को-ऑप बँक लि. बँकेची 21वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (दि. …

Read More »

रायगडात विसावल्या परराज्यांतील होड्या

खराब हवामानाचा फटका मुरूड : प्रतिनिधी खराब हवामानामुळे महाराष्ट्रासह परराज्यांतील शेकडो मच्छीमारी होड्या सध्या रायगड जिल्ह्यातील विविध किनार्‍यांवर विसावल्या आहेत. सप्टेंबर महिन्याच्या 2 तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रात कधी जोरदार वार्‍यांचा मारा, तर कधी मुसळधार पावसामुळे मासेमारी करून उदरनिर्वाह करणार्‍या कोळी समाजावर नैसर्गिक संकट कोसळले आहे. त्यामुळे मासेमारीसाठी कोकणात आलेल्या रत्नागिरी, पालघर …

Read More »

राष्ट्रवादीच्या यात्रेमुळे महाडमध्ये वाहतूक कोंडी

महाड : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेची शनिवारी (दि. 21) किल्ले रायगड येथे सांगता झाली. त्यानंतर महाडमध्ये आलेल्या या यात्रेमुळे नागरिकांना पाच तास वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागला. या वेळी उपस्थित नेत्यांनी व्यासपीठावरून भारतमाता की जयच्या घोषणा देऊन भाजपच्या देश-धर्मप्रेमाची कॉपी केल्याचे दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिवस्वराज्य यात्रा …

Read More »

पनवेलमध्ये उद्या रोजगार मेळावा

अलिबाग : जिमाका बेरोजगार उमेदवारांसाठी राज्य शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पनवेलच्या वतीने रविवारी (दि. 22) सकाळी 10 वाजता पनवेल येथील के. व्ही. कन्या शाळेत रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात विविध कंपन्यांचे प्रतिनिधी त्यांच्याकडील रिक्त पदांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यासाठी हजर …

Read More »

म्हसळ्यात तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई

म्हसळा : प्रतिनिधी शहरातील शाळा नं 1 समोर असलेल्या सत्यनारायण तंबाखू विक्री केंद्र व भोला पान टपरीवर गुरुवारी (दि. 19) म्हसळा पोलीस व तालुका आरोग्य विभागाने 2003च्या कलम 24नुसार कारवाई केली. शैक्षणिक संस्था व शाळांचा परिसर तंबाखूमुक्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी शाळेच्या 100 यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थाच्या …

Read More »

प्रशांत कणेरकर आत्महत्या प्रकरण

पोलीस अधिकार्‍यांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले अलिबाग : प्रतिनिधी सहाय्यक पोलीस निरीक्षक आत्महत्या प्रकरणात, राज्य गुप्तवार्ता विभागातील तीन पोलीस अधिकार्‍यांचे अटकपूर्व जामीन अर्ज अलिबाग सत्र न्यायालयाने फेटाळले. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कणेरकर यांनी 16 ऑगस्ट रोजी अलिबाग येथील पोलीस मुख्यालयात आत्महत्या केली होती. या प्रकरणी कणेरकर यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार …

Read More »