Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

माथेरानच्या पॉईंट्सवर माहिती फलक

कर्जत : बातमीदार माथेरानच्या पॉईंट्सवर महितीफलक नसल्यामुळे पर्यटकांना त्या पॉईंटचे महत्व समजत नव्हते, यावर मात करण्यासाठी माथेरान वनविभाग सरसावले आहे. माथेरानच्या सर्व पॉईंट्सवर पॉईंटचे नाव, त्याचे वैशिष्ट्य, जंगलात आढळणारे प्राणी अशा स्वरूपातील माहिती या फलकावर दिल्यामुळे पर्यटकांना पॉईंटची मजा घेता येणार आहे. माथेरान हे पर्यटनस्थळ असून येथे पर्यटकांना हवेहवेसे वाटणारे …

Read More »

धाब्यावर ‘कडकनाथ’ला मागणी गावरान कोंबड्यांच्या सहापट भाव

खोपोली  : बातमीदार सध्या राजकिय आरोप प्रत्यारोपात कडकनाथ कोंबडा-कोंबडी हा विषय गाजत असून, ढाब्यावर काळ्या रंगाच्या कडकनाथची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. बॉयलरच्या पाचपट आणि गावरान कोंबडी हंडीच्या सहापट कडकनाथ हंडीला मुंबईच्या ग्राहकांकडून मागणी असल्याचे खालापुरातील धाबा चालक सांगत आहेत. रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी कडकनाथ कोंबडीचे पालन होत असले, तरी नगर …

Read More »

चिंचवली ग्रामपंचायतमध्ये लागणार हायमास्ट दिवे

कडाव : प्रतिनिधी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत कर्जत तालुक्यातील चिंचवली ग्रामपंचायतीला जनसुविधा योजनेंतर्गत चार हायमास्ट दिवे बसविण्यासाठी अडीच लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. चिंचवली ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात गुरुवारी (दि. 19) सकाळी भाजपचे कर्जत तालुकाध्यक्ष पंढरीनाथ राऊत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या कामाचे भूमिपूजन …

Read More »

रोह्यातील युवकांचा भाजपमध्ये प्रवेश

रोहे ः प्रतिनिधी रोहा शहारासह ग्रामीण भागातील अनेक युवकांनी शुक्रवारी (दि. 20) भाजपचे अलिबाग विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, समन्वय समिती अध्यक्ष संजय कोनकर, युवा मोर्चाचे रायगड जिल्हा अध्यक्ष अमित घाग यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. इतर पक्षांपेक्षा भाजपची विचारधारा वेगळी आहे. भाजप कार्यकर्ता पहिले देशाचे नंतर संघटनेचे …

Read More »

दोन मुलांच्या अहरणाचा प्रयत्न

मुरूड शहरात घबराटीचे वातावरण मुरूड : प्रतिनिधी शाळेत चाललेल्या दोन मुलांचे अपहरण करून त्यांना मारुती व्हॅनमधून पळवून नेण्याचा प्रयत्न शुक्रवारी सकाळी तृतीयपंथींनी  केला. मात्र या मुलांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे तो विफल ठरला असला तरी या घटनेने मुरूडमधील पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी गस्त वाढवून शहरातील नागरिकांना अधिक सुरक्षा प्रदान …

Read More »

‘स्वच्छता अभियानाने देशाचे नाव उंचावले’

कर्जत : बातमीदार स्वच्छता अभियान राष्ट्रीय पातळीवर यशस्वी झाले असून या अभियानाने देशाचे नाव जगात पोहचविले आहे, त्यामुळे आपण कायमस्वरूपी स्वच्छतेवर भर दिला पाहिजे, असे प्रतिपादन कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी येथे केले. मध्यरेल्वे प्रशासनाने 16 ते 30 सप्टेंबर या कालावधीत स्वच्छता पंधरवडा साजरा करण्याचे जाहीर केले आहे. त्या अनुषंगाने …

Read More »

गणेश मोन्नाक यांची अध्यक्षपदी निवड

मुरूड : राजपुरी ग्रुप ग्रामपंचायतची तहकूब ग्रामसभा सरपंच हिरकणी गिदी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सभागृहात घेण्यात आली. या सभेत महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी समाजसेवक गणेश मोन्नाक यांची बिनविरोध निवड करण्यात आली. गणेश मोन्नाक 2008 ते 2017 पर्यंत तंटामुक्ती समितीचे सदस्य, तर 2018 पासून उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांनी सागर रक्षक …

Read More »

कळंब येथे वीज अंगावर पडल्याने आदिवासी तरुण जखमी

कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यात बुधवारी (दि. 18) सायंकाळी विजांच्या कडकडाटसह मुसळधार पाऊस झाला. त्या वेळी भागूचीवाडी कळंब येथील आदिवासी तरुणाच्या अंगावर वीज कोसळली. त्यात जखमी झालेल्या तरुणावर कळंब येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. कळंब ग्रामपंचायत हद्दीमधील भागूचीवाडी येथील शंकर हरी निरगुडा (वय 35) हा शेतकरी बुधवारी संध्याकाळी …

Read More »

प्रत्येक घरात पाणी पोहचले पाहिजे

अ‍ॅड. महेश मोहिते यांची अधिकार्‍यांना बैठकीत सूचना; 26 गाव पाणीपुरवठा योजना रोहे ः प्रतिनिधी तालुक्यातील 26 गाव पाणीपुरवठा योजनेत समाविष्ट असलेल्या सर्व गावांना या योजनेचे पाणी पोहचत नाही, त्याची संबंधित अधिकार्‍यांनी गंभीर दखल घ्यावी. या कामात अडथळे येत असतील, तर पोलीस संरक्षण घेऊन ते दूर करावेत. या पाणीपुरवठा योजनेतील शेवटच्या …

Read More »

भाजयुमो पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या

माणगाव : प्रतिनिधी माणगाव तालुक्यात भाजप युवा मोर्चाच्या विविध पदांवर नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या असून, भाजपचे तालुकाध्यक्ष संजयअप्पा ढवळे यांनी त्यांना नियुक्तिपत्रे प्रदान केली. युवा मोर्चाच्या माणगाव तालुका उपाध्यक्षपदी हसिम अकलेकर, शहराध्यक्षपदी राजेश तेटगुरे, मोर्बा शहराध्यक्षपदी मुकेश पवार, तसेच अल्पसंख्याक मोर्चा तालुका चिटणीसपदी मुश्ताकभाई बंदकर, तालुका सरचिटणीसपदी रफिक नाडकर यांची …

Read More »