Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

गणेशोत्सवात सजावटीसाठी प्लास्टिकच्या माळा

मखरात थर्माकोलचा सर्रास होतोय वापर महाड : प्रतिनिधी प्लास्टिक आणि थर्माकोल वापरावर बंदी असली तरी बाजारात प्लास्टिकच्या माळा सजावटीसाठी दाखल झाल्या आहेत, तर मखरांमध्येदेखील थर्माकोलचा वापर होत आहे. याबाबत नगर परिषद प्रशासन आणि प्रदूषण मंडळ भावनिक मुद्दा पुढे आणून दुर्लक्ष करीत आहेत. यामुळे प्रदूषण नियंत्रण, पर्यावरण संतुलन आणि स्वच्छतेची ऐसीतैसी …

Read More »

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी महाविद्यालयातर्फे पूरग्रस्तांना मदत

रोहा ः प्रतिनिधी कोलाड येथील डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी कला़, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने पूरग्रस्त कोल्हापूर, सांगली या भागांना अन्नधान्य देऊन राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) अंतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून मदत करण्यात आली.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर मुंडे, स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य प्रकाश सर्कले यांनी पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले होते. …

Read More »

भोगाव खुर्द ग्रामपंचायत कार्यालयात यंदापासून सार्वजनिक गणेशोत्सव

पोलादपूर : प्रतिनिधी पोलादपूर तालुक्यातील भोगाव खुर्द ग्रामपंचायत कार्यालयामध्ये 2 ते 7 सप्टेंबर या कालावधीत श्रीगणेशाची स्थापना करून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या काळात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, 4 सप्टेंबर रोजी भाजप जिल्हा संपर्क प्रमुख आमदार प्रवीण दरेकर आणि शिवसेना नेते आमदार भरत गोगावले यांच्या …

Read More »

नेरळमध्ये बाप्पा कुणाला पावणार?

ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारांचे भवितव्य पणास कर्जत : बातमीदार रायगड जिल्ह्यातील महत्त्वाच्या असलेल्या नेरळ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 72 टक्के मतदान झाले आहे. किरकोळ वाद वगळता मतदानप्रक्रिया शांततेत पार पडली. यानिमित्ताने 48 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. 3 सप्टेंबर रोजी मतमोजणी होणार असून, गणपती बाप्पा कुणाला पावणार हे त्याच दिवशी …

Read More »

पेण पालिकेतर्फे विकासकामांचा धडाका

विविध रस्त्यांमुळे दळणवळण होणार सुकर -नगराध्यक्ष प्रीतम पाटील पेण : प्रतिनिधी पेण शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून, याकरिता माजी मंत्री रविशेठ पाटील अहोरात्र झटत आहेत. पेणचा सर्वांगीण विकास कशा पद्धतीने होईल याकडे त्यांचे सातत्याने लक्ष लागून राहिले आहे, अशी माहिती नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी नगर परिषदेत झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. …

Read More »

खोडकिडा निर्मूलनासाठी कृषी शास्त्रज्ञांचा पुढाकार

कर्जत : रामप्रहर वृत्त तालुक्यातील भात पिकांमध्ये खोडकिड्यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. एस. बी. भगत यांच्या नेतृत्वाखाली शास्त्रज्ञांच्या पथकाने वदप आणि कुंडलज गावातील  शेतावर जाऊन पाहणी केली असता त्यांना भात पिकामध्ये खोडकिड्याची लागण झाल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांनी वदप …

Read More »

पेणमधील नुकसानीची केंद्रीय पथकाकडून पाहणी

पेण, अलिबाग : प्रतिनिधी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टीसह पुरामुळे पेण तालुक्यात झालेल्या जीवित व आर्थिक नुकसानीची केंद्रीय पथकाने शुक्रवारी (दि. 30) पाहणी करून माहिती जाणून घेतली. या वेळी कणे येथील ग्रामस्थांनी खारभूमी संरक्षक बंधार्‍याच्या मजबुतीकरणासाठी केंद्र शासनाने विशेष निधीची तरतूद करावी, अशी मागणी करण्यात आली. या पथकात चित्तरंजन दास, मिलिंद …

Read More »

पावसाने उमेदवार टेन्शनमध्ये…..

नेरळमध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त कर्जत : बातमीदार नेरळ ग्रामपंचायतीवर आपला झेंडा रोवण्यासाठी जोरदार चुरस दिसून येत आहे, मात्र शुक्रवार सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे आज सकाळी मतदार मतदानासाठी बाहेर निघत नव्हते. त्यामुळे निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांची धाकधूक वाढली आहे, मात्र दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतल्याने चांगले मतदान झाले. या वेळी पोलीस दलाने चोख …

Read More »

महाडमधील पूरग्रस्त भागाची केंद्रीय पथकाकडून पाहणी

महाड : प्रतिनिधी अतिवृष्टी व पुरामुळे महाड तालुक्यात झालेल्या नुकसानीची शुक्रवारी (दि. 30) केंद्रीय पथकाकडून पाहणी करण्यात आली. या पथकाने महाड शहर, वरंध घाट व शेवते येथे पाहणी केली. महाड शहरासह औद्योगिक क्षेत्र, तसेच शहराजवळील गावांत पुराचे पाणी शिरल्याने मोठी वित्तहानी झाली. व्यापार्‍यांची दुकाने आणि नागरिकांच्या घरात पाणी शिरून साहित्याचे …

Read More »

सुधागडात जुगार अड्ड्यावर धाड ; 57 जण ताब्यात, सव्वासहा लाखांचा ऐवज जप्त

पाली : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या तोंडावर सुधागड तालुक्यातील वाफेघर या गावात जुगाराच्या अड्ड्यावर रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्या मार्गदर्शनाखाली वडखळ व पाली पोलिसांनी शुक्रवारी (दि. 30) पहाटे 4 वाजता धाड टाकली. या कारवाईत 57 जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडील रोख रकमेसह सव्वासहा लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. …

Read More »