माथेरान : रामप्रहर वृत्त कर्जत तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत गौळवाडी येथे आयोजित धावण्याच्या स्पर्धेत माथेरानमधील प्राचार्य गव्हाणकर शाळेच्या विद्यार्थ्यांनी धावण्याच्या शर्यतीत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. 17 वर्षाखालील गटात हर्षाली संतोष ढेबे पहिली, तर 14 वर्षाखालील गटात प्राजक्ता प्रशांत कदम दुसरी आली. दोघीही अलिबाग येथे होणार्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र झाल्या आहेत. केंद्रप्रमुख …
Read More »पाली स्मशानभूमीत लाकडांसाठी वणवण
पाली : रामप्रहर वृत्त सुधागड पालीतील स्मशानभूमीची अत्यंत दुरावस्था झाली असून या स्मशानभूमीत सरणासाठी लाकडे नाहीत. त्यामुळे मृताच्या नातेवाईकांना लाकडांसाठी वणवण करावी लागत आहे. काहीवेळा नागोठणे किंवा रोहा येथून लाकडे आणून मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागतात. पाली ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीमध्ये झाले, मात्र येथील नागरी समस्या ‘जैसे थे’ आहेत. येथील एका व्यक्तीचे …
Read More »पाणीटंचाईने लव्हेज गावातील महिला संतप्त
खोपोली नगरपालिकेचा अभियंता नॉट रिचेबल खोपोली : प्रतिनिधी खोपोली नगरपालिका पाणीपुरवठा खात्याच्या गलथान कारभारामुळे लव्हेज ग्रामस्थांना पाणीटंचाई सामोरे जावे लागत आहे. या गावात शुक्रवारी पाणीपुरवठा झाला नाही, त्यामुळे गावातील संतप्त महिलांनी रस्त्यावर येऊन पालिका प्रशासनाच्या गलथान कारभाराविरोधात असंतोष व्यक्त केला. रायगड जिल्ह्यात श्रीमंत नगरपालिका म्हणून गवगवा असलेल्या खोपोली नगरपालिकेच्या पाणीपुरवठा …
Read More »आदिवासी बांधवांना जॉबकार्डसाठी जि. प. राबविणार विशेष मोहीम
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून, तसेच स्थलांतर रोखण्यासाठी व मोठ्या प्रमाणात आदिवासी मजुरांना कामे उपलब्ध करून देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेअंतर्गत नवीन जॉब कार्ड देणे, जॉब कार्डचे अद्यावतीकरण करणे, यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत तालुकास्तरावर 28 ते 30 नोव्हेंबर …
Read More »राहुल गांधी यांच्याविरोधात युवा मोर्चा आक्रमक
रोह्यात जोडे मारो आंदोलन धाटाव : प्रतिनिधी स्वातंत्र्यवीर सावरकराबद्दल आक्षेपार्ह विधाने करणार्या काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात भाजप युवा मोर्चा चांगलीच आक्रमक झाली आहे. दक्षिण रायगड युवा मोर्चाचे अध्यक्ष अमित घाग यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (दि. 18) रोहा शहरातील राम मारुती चौकात राहुल गांधी यांच्या प्रतिमेला काळे फासून व …
Read More »सायबर फसवणूक आयुष्य उद्ध्वस्त करू शकते -शिरीष पवार
शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन खालापूर : प्रतिनिधी सायबर फसवणूक एखाद्याचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. मात्र सतर्क राहिल्यास ऑनलाइनच्या माध्यमातून लालसेपोटी होणारी फसवणूक व अनोळखी माध्यमातून होत असणारे नुकसान टाळता येते, असे प्रतिपादन खोपोलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी गुरुवारी (दि. 17) येथे केले.सहज सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून खोपोली परिसरातील शाळांमध्ये …
Read More »प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडविण्याबाबत ग्रामविकासमंत्री सकारात्मक
शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने घेतली भेट अलिबाग : प्रतिनिधी प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाची सोडवणूक होण्यासंदर्भात बुधवारी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या शिष्टमंडळाने ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. संघटनेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या भेटीत विविध मुद्यांवर चर्चा झाली. मुख्यालयी राहण्याची अट रद्द करण्याबरोबरच पदोन्नती, रिक्त पदे …
Read More »सागर कन्या मच्छीमार संस्थेकडून आमदार रमेश पाटील यांचे आभार
मुरूड : प्रतिनिधी मच्छीमार सहकारी संस्था आणि त्यांच्या सभासदांच्या 120 अश्वशक्ती क्षमतेवरील नौकांचा डिझेल कोटा व मूल्यवर्धित कराची प्रतिपुर्ती (परतावा) देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून त्याबाबत अधिसूचना काढण्यात आली आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मस्त्य विकासमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरावा केल्याबद्दल मुरूड येथील सागर कन्या मच्छिमार संस्थेने गुरुवारी …
Read More »पंडित पाटील यांच्या वक्तव्यामुळे अलिबागेतील ओबीसी मोर्चात गोंधळ
अलिबाग : प्रतिनिधी इतरमागसवर्गीय सामजाला (ओबीसी) आरक्षण तसेच विकासनिधी त्यांच्या लोकसंख्येनुसार मिळायला हवा. देशात जातनिहाय जनगणना करण्यात यावी, या मागणीसाठी ओबीसी जनमोर्चातर्फे शुक्रवारी (दि. 18) रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. मात्र माजी आमदार पंडित पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे या मोर्चात गोंधळ उडाला. ओबीसींच्या मोर्चात सर्वच राजकीय पक्षांचे नेते …
Read More »तरुणांनी ग्रामस्थांच्या साथीने बांधले वनराई बंधारे
कर्जतच्या आषाणेमध्ये श्रमदान; जनावरांची तहान भागणार कर्जत : प्रतिनिधी एकमेकांना अडवून परस्परांची जिरविण्याऐवजी कर्जत तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायत हद्दीमधील आषाणे येथील तरुणांनी ग्रामस्थांच्या मदतीने लोकवर्गणी काढून ओहोळात तीन वनराई बंधारे बांधले. त्यासाठी सर्वांनी श्रमदानही केले. कर्जत तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायत हद्दीमध्ये आषाणे गावाच्या मागे मोठा डोंगर असून त्या डोंगरातील पाणी पावसाळ्यात खाली …
Read More »